SBU अंतर्गत ‘प्रोजेक्ट इंजिनीअर’ पदांची भरती सुरु!

hanuman

Active member
MP SBU Bharti 2025

सॉफ्टवेअर (SBU) सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट सेंटरमध्ये भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BEL), बंगळुरू (संरक्षण मंत्रालयांतर्गत, भारत सरकारचा उपक्रम)च्या इंदौर, मध्यप्रदेश येथील सॉफ्टवेअर (SBU Indore Jobs 2025) सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट सेंटरमध्ये ‘प्रोजेक्ट इंजिनिअर आणि ट्रेनिंग इंजिनीअर’ पदांची तात्पुरत्या स्वरूपात ३ वर्षांसाठी करार पद्धतीने भरती. एकूण रिक्त पदे ४० आहेत. तसेच उमेदवाराकडे इंजिनीअरिंग पदवीच्या सर्व सेमिस्टर्सच्या गुणपत्रिका आणि पदवी प्रमाणपत्र असणे आवश्यक. CGPA ग्रेडींग गुणांमध्ये रूपांतरित करण्याचा ‘ Conversion Certificate’ अर्जासोबत देणे अनिवार्य.

MP SBU Bharti 2025




वयोमर्यादा : (दि. १ डिसेंबर २०२४ रोजी) टेनी इंजिनीअर – २८ वर्षे. प्रोजेक्ट इंजिनीअर – ३२ वर्षे. (वयोमर्यादेत सूट – इमाव – ३ वर्षे, अजा/अज – ५ वर्षे, दिव्यांग – १० वर्षे)

ट्रेनी इंजिनिअर पदांवर सुरुवातीला २ वर्षांकरिता नेमणूक दिली जाईल. जी आणखी १ वर्षाने वाढविली जावू शकते.

वेतन : पहिल्या वर्षी रु. ३०,०००/-, दुसऱ्या वर्षी रु. ३५,०००/-, तिसऱ्या वर्षी रु. ४०,०००/-.

प्रोजेक्ट इंजिनीअर पदांवर सुरुवातीला ३ वर्षांसाठी नेमणूक दिली जाईल. जी आणखी १ वर्षाने वाढविली जाईल. त्यांनी ४ वर्षं पूर्ण केल्यानंतर Retention Bonus रु. १ लाख दिला जाईल. प्रोजेक्ट इंजिनीअरसाठी पहिल्या वर्षी रु. ४०,०००/- वेतन दिले जाईल, जे दरवर्षी रु. ५,०००/- ने वाढविले जाईल.

निवड पद्धती : शॉर्ट लिस्टेड उमेदवारांची लेखी परीक्षा घेतली जाईल. प्रोजेक्ट इंजिनीअर पदांसाठी लेखी परीक्षेतून पर्सोनल इंटरव्ह्यूकरिता उमेदवार रिक्त पदांच्या १:५ या प्रमाणात निवडले जातील. लेखी परीक्षेतील ८५ गुण व इंटरव्ह्यूमधील १५ गुण देऊन अंतिम निवड केली जाईल. ट्रेनी इंजिनीअर पदांची निवड १०० गुणांच्या लेखी परीक्षेतील कामगिरीवर आधारित केली जाईल. उमेदवारांना परीक्षेचे ठिकाण आणि वेळ ई-मेलद्वारे कळविण्यात येईल.

लेखी परीक्षा/इंटरव्ह्यूकरिता निवडलेल्या उमेदवारांची यादी/अंतिम निवड यादी या वेबसाईटवर प्रसिद्ध केली जाईल.

अर्जाचे शुल्क : ट्रेनी इंजिनिअर- I रु. १७७/- (रु. १५०/- + १८ जीएस्टी). प्रोजेक्ट इंजिनिअर – रु. ४७२/- (रु. ४००/- + १८ जीएसटी) (अजा/ अज/ दिव्यांग उमेदवारांना फी माफ आहे.)



अर्जाचे शुल्क ऑनलाइन पद्धतीने SBI Collect द्वारे भरावयाचे आहे. खुला/ इमाव/ ईडब्ल्यूएस उमेदवारांनी अर्जाचे शुल्क भरल्यावर एक ‘ SBI Collect reference No.’ जनरेट होईल. तो ऑनलाइन अर्जामध्ये इतर माहिती भरण्यापूर्वी भरणे आवश्यक आहे.

शंकासमाधानासाठी ई-मेल : hrsoftware@bel.co.in फोन नं. ०८०-२२१९७१६०

विस्तृत माहिती या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.



The post appeared first on .
 
Top
AdBlock Detected

We get it, advertisements are annoying!

Sure, ad-blocking software does a great job at blocking ads, but it also blocks useful features of our website. For the best site experience please disable your AdBlocker.

I've Disabled AdBlock