NMMS शिष्यवृत्ती परीक्षेचा पात्र उमेदवारांच्या निवड याद्या कधी जाहीर होणार ? NMMS Scholarship Exam Result

hanuman

Active member
NMMS-Pune.png

NMMS Scholarship Exam Result Date

परिषदेमार्फत राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी नॅशनल मेरीट कम मिन्स स्कॉलरशीप (एनएमएमएस २०२३- २४) परीक्षेचा निकाल दि. ७ फेब्रुवारी रोजी जाहीर झाला मात्र, त्यास दीड महिन्यांचा कालावधी होत आला असून, अद्याप शिष्यवृत्तीस पात्र झालेल्या विद्यार्थ्यांची राज्य तसेच जिल्हा निवड यादी अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे दि.२४ डिसेंबर २०२३ रोजी राज्यातील विविध जिल्ह्यांतील ७३० केंद्रांवर परीक्षेचे आयोजन केले होते. राज्यभरातून २ लाख ६६ हजार ३५२ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यापैकी १ लाख १०१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, त्यांना मिळालेल्या गुणांची यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध केली आहे.

विद्यार्थ्यांचे नाव, वडिलांचे नाव, अडनाव, आईचे नाव यामधील स्पेलिंग दुरुस्ती, तसेच जन्मतारीख, जात, आधारकार्ड आदी मध्ये दुरुस्तीसाठी दि. १६ फेब्रुवारीपर्यंत मुदत दिली होती. आणि त्यानंतर शिष्यवृत्तीस पात्र झालेल्या विद्यार्थ्यांची निवड यादी परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात येईल, असे परीक्षा परिषदेमार्फत स्पष्ट केले होते. मात्र निकालास दीड महिन्याचा कालावधी झाला असून, उत्तीर्ण विद्यार्थ्यांसह पालक, शिक्षक शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थी यादीची वाट पाहत आहेत.





: The scholarship exam was organized in December 2022 for students from economically weaker sections. The final answer list along with the list of marks obtained by the students was released on the website of the Maharashtra State Examination Council.

आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती परीक्षेचे डिसेंबर २०२२ मध्ये आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांनी प्राप्त केलेल्या गुणांच्या यादीसह अंतिम उत्तरसूची प्रसिद्ध करण्यात आली. मात्र, गुणांची यादी प्रसिद्ध करून दीड महिन्यापेक्षा जास्त कालावधी झाला असून, अद्याप अंतिम निकाल जाहीर करण्यात आला नाही. त्यामुळे शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल केव्हा लागणार? अशी विचारणा विद्यार्थ्यांसह पालकांकडून होत आहे. राज्यातील ११ हजार ३५० शाळांमधील १ लाख ९७ हजार १७० विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी ७५ हजार ८४१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.​


NMMS Scholarship Exam Result


National Scholarship Exam Scheme Exam (NMMS) result has been published by msce Pune on official site@mscepune.in. According to this, 75 thousand 841 students passed the examination. Scholarships are given on the basis of merit under the examination to students of class VIII whose parents have an annual income of less than three and a half lakh rupees and studying in aided schools. Appeared students can download NMMS Result 2022, NMMS MSCE Oune Result PDF from the official site also you can check NMMS Scholarship Exam Result at below :​

राष्ट्रीय आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती परीक्षा योजना परीक्षेचा (एनएमएमएस) निकाल जाहीर करण्यात आला. निकाल डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत

राष्ट्रीय आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती परीक्षा योजना परीक्षेचा (एनएमएमएस) निकाल जाहीर करण्यात आला. त्यानुसार ७५ हजार ८४१ विद्यार्थी या परीक्षेत उत्तीर्ण झाले.पालकांचे वार्षिक साडेतीन लाख रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या आणि अनुदानित शाळेत शिकणाऱ्या आठवीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेअंतर्गत गुणवत्तेच्या आधारे शिष्यवृत्ती दिली जाते. शिष्यवृत्तीप्राप्त विद्यार्थ्यांना दरमहा एक हजार या प्रमाणे बारावीपर्यंत शिष्यवृत्तीची रक्कम दिली जाते. यंदा राज्य परीक्षा परिषदेतर्फे २१ डिसेंबरला एनएमएमएस परीक्षा घेण्यात आली होती.

१ लाख ९७ हजार १७० विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. त्यापैकी ७५ हजार ८४१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. सविस्तर निकाल या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आला आहे. निकालाच्या यादीतील विद्यार्थ्यांच्या नाव किंवा जन्मतारीख, जात, आधारकार्ड आदींमध्ये दुरुस्ती असल्यास दुरुस्तीसाठी १७ फेब्रुवारीपर्यंत ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक आहे. शिष्यवृत्तीपात्र विद्यार्थ्यांची यादी यथावकाश जाहीर करण्यात येईल, अशी माहिती परीक्षा परिषदेच्या आयुक्त शैलजा दराडे यांनी दिली.​

राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (NMMS) 2022-2023

गुणयादी बाबत सूचना…..
१) राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षेची गुणयादी दि. १०/०२/२०२३ रोजी परिषदेच्या या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आली आहे.
२) सदर यादीमध्ये विद्यार्थ्यांचे नाव, वडिलांचे नाव, आडनाव, आईचे नाव यामधील स्पेलिंग दुरुस्ती असल्यास (कोणत्याही परिस्थितीत पूर्ण नावात बदल केला जाणार नाही.) तसेच जन्मतारीख, जात, आधारकार्ड, इत्यादीमध्ये दुरुस्ती असल्यास सदर दुरुस्ती करण्यासाठी दि. १७.०२.२०२३ पर्यंत संबंधित शाळेच्या लॉगिनमध्ये ऑनलाईन अर्ज उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. ऑनलाईन आलेल्या अर्जा व्यतिरिक्त कोणत्याही पद्धतीने पाठविलेल्या दुरुस्त्या (टपाल, समक्ष, अथवा ईमेलद्वारे) तसेच विहित मुदतीनंतर प्राप्त झालेल्या दुरुस्त्या / अर्जाचा विचार केला जाणार नाही.
३) आलेल्या सर्व दुरुस्त्यांचा विचार करून शिष्यवृत्तीसाठीची निवडयादी परिषदेच्या संकेतस्थळावर यथावकाश जाहीर करण्यात येईल.
४) सदर परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना कार्बानलेस उत्तरपत्रिका देण्यात आलेली असल्याने पेपरची गुणपडताळणी केली जात नाही.
५) शिष्यवृत्तीसाठीची निवडयादी जाहीर झाल्यानंतर निवडयादीत कोणताही बदल करण्यात येणार नाही.
६) सदर परीक्षेसाठी उत्तीर्ण होण्यासाठी दोन्ही विषयात एकत्रित ४० % गुण मिळणे आवश्यक आहेत. (अनुसूचीत जाती (SC) / अनुसूचीत जमाती (ST) व दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी दोन्ही विषयात एकत्रित ३२ % गुण मिळणे आवश्यक आहेत)
७) MAT व SAT विषयातील खाली नमूद केलेल्या माध्यमातील काही प्रश्न रद्द झालेले असल्याने MAT व SAT विषयाचे गुणदान करताना एकूण 90 प्रश्नाच्या पप्रमाणात गुण देण्यात आलेले आहेत.

How To Check NMMS Maharashtra Result 2022

  • nmmsmsce.in, mscepune.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
  • नंतर NMMS 2022 – 2023 पृष्ठावर जा.
  • आता NMMS महाराष्ट्र निकाल 2022 लिंकवर क्लिक करा.
  • लगेच, NMMS महाराष्ट्र 2022 गुणवत्ता यादी pdf उघडेल.
  • आता ते डाउनलोड करा आणि निवडलेल्या विद्यार्थ्यांच्या यादीमध्ये तुमचे नाव तपासा.

The post appeared first on .
 
Top
AdBlock Detected

We get it, advertisements are annoying!

Sure, ad-blocking software does a great job at blocking ads, but it also blocks useful features of our website. For the best site experience please disable your AdBlocker.

I've Disabled AdBlock