MPSC PSI परीक्षेचे Call Letter, प्रवेशपत्र उपलब्ध!! | MPSC PSI Admit Card

hanuman

Active member
MPSC Instructions for Filling Application Form 2023

MPSC PSI Exam Call Letter Download




: Police Sub-Inspector Divisional Examination is scheduled Now through the Maharashtra Public Service Commission for the recruitment of Police Sub-Inspector Cadre posts under Department in Maharashtra State Police Force..​

महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील खात्यांतर्गत पोलीस उपनिरीक्षक संवर्गातील पदांच्या भरती करीता महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत पोलीस उपनिरीक्षक विभागीय परीक्षा अआयोजित केली आहे. प्रवेशपत्र उपलब्ध झाले असून खालील लिंक वरून डाउनलोड करावे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत










Previous Updates Given Below

MPSC PSI Exam Date Change :


जर तुम्ही देखील ही स्पर्धा पूर्व परीक्षा देत असाल तर या सूचना लक्षात ठेवा

  • परीक्षा कक्षात प्रवेश मिळवण्यासाठी आयोगाच्या ऑनलाईन अर्जप्रणालीच्या संकेतस्थळावरुन डाउनलोड करुन प्रिंट केलेले मूळ स्वरुपातील प्रवेशपत्र सोबत आणणे अनिवार्य आहे.
  • परीक्षा सुरु होण्यापूर्वी दीड तासआधी केंद्रावर हजर राहाणे अनिवार्य आहे.
  • तसेच स्वत:चे ओळखपत्र, आधारकार्ड, निवडणूक आयोगाचे ओळखपत्र, पासपोर्ट, पॅनकार्ड व स्मार्टकार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स यापैकी कोणतेही एक ओळखपत्र
  • परीक्षा कक्षात मोबाईल अथवा कोणतीही इलेक्ट्रॉनिक वस्तू घेऊन जाण्यास परवानगी नाही.
  • परीक्षा कक्षेत कोणतेही गैरवर्तन करण्याचा प्रकार केल्यास कारवाई करण्यात येईल.

: The Admit Certificates of the candidates registered to the Police Sub-Inspector Limited Divisional Competitive Preliminary Examination 2023 scheduled on Saturday, December 2, 2023 through the Maharashtra Public Service Commission have been made available in their account on the Commission’s online application system at . Candidates can download MPSC LDCE Hall Ticket from below link:​

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत शनिवार, दिनांक २ डिसेंबर, २०२३ रोजी नियोजित पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा पूर्व परीक्षा २०२३ करीता प्रवेश दिलेल्या उमेदवारांची

प्रवेश प्रमाणपत्रे आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीच्या संकेतस्थळावरील त्यांच्या खात्यामध्ये उपलब्ध करुन देण्यात आली आहेत.

  • परीक्षा कक्षात प्रवेश मिळविण्यासाठी आयोगाच्या संकेतस्थळावरुन डाऊनलोड करुन प्रिंट केलेले मूळ स्वरुपातील प्रवेश प्रमाणपत्र सोबत आणणे अनिवार्य आहे. त्याशिवाय परीक्षेस प्रवेश दिला जाणार नाही.​
  • परीक्षेच्या दिवशी ऐनवेळी उद्भवू शकणाऱ्या अडचणी अथवा आंदोलने, मोर्चे, वाहतूक समस्या, अतिवृष्टी इत्यादी बाबी लक्षात घेऊन, परीक्षा सुरु होण्याच्या वेळेपूर्वी किमान दीड तास अगोदर संबंधित परीक्षा उपकेंद्रावर उपस्थित राहणे तसेच, प्रत्यक्ष परीक्षा सुरु होण्याच्या वेळेपूर्वी एक तास अगोदर परीक्षा कक्षातील स्वतः च्या बैठक क्रमांकावर उपस्थित राहणे अनिवार्य आहे.​
  • परीक्षा कक्षातील अंतिम प्रवेशासाठी विहित केलेल्या वेळेनंतर कोणत्याही परिस्थितीत उमेदवारांना परीक्षा कक्षामध्ये प्रवेश दिला जाणार नाही अथवा यासंदर्भात आयोगाची कोणत्याही प्रकारची जबाबदारी राहणार नाही.​
  • आयोगाच्या संकेतस्थळावरील उमेदवारांना सर्वसाधारण सूचना, प्रवेश प्रमाणपत्रावरील सूचना तसेच आयोगाच्या संकेतस्थळावरील ‘Guidelines for Examination’ या सदराखाली उपलब्ध असलेल्या ‘महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आयोजित परीक्षांच्या वेळी उमेदवारांनी करावयाच्या कार्यवाहीबाबत मार्गदर्शक सूचना यांचे उमेदवारांनी पालन करणे अनिवार्य आहे. सदर सूचनांचे उल्लंघन करणाऱ्या उमेदवारांवर आयोगाच्या स्वेच्छाधिकारानुसार कारवाई करण्यात येईल. तसेच, प्रचलित नियम / कायद्यातील तरतुदीनुसारही कारवाई करण्यात येईल.​
  • प्रवेशप्रमाणपत्र मिळविण्यात कोणतीही अडचण उद्भवल्यास उमेदवारास आयोगाच्या contact- secretary@mpsc.gov.insupport-online@mpsc.gov.in या ईमेल व/अथवा १८००-१२३४-२७५ किंवा ७३०३८२१८२२ या दूरध्वनी क्रमांकावरुन विहित वेळेत आवश्यक मदत प्राप्त करुन घेता येईल.​


Important Instruction For MPSC LDCE PSI Exam 2023


(१) परीक्षा कक्षात प्रवेश मिळविण्यासाठी आयोगाच्या ऑनलाईन अर्जप्रणालीच्या संकेतस्थळावरुन डाऊनलोड करुन प्रिट केलेले मूळ स्वरुपातील प्रवेश प्रमाणपत्र सोबत आणणे अनिवार्य आहे.
(२) उमेदवारांनी आयोगाच्या संकेतस्थळावरील Guidelines for Examination या सदराखाली उपलब्ध असलेल्या “महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आयोजित परीक्षांच्यावेळी उमेदवारांनी करावयाच्या कार्यवाहीबाबत मार्गदर्शक सूचनांचे” कृपया काळजीपूर्वक अवलोकन करावे.
(३) परीक्षेसाठी विहित परीक्षा उपकेंद्रावर परीक्षा सुरु होण्याच्या वेळेपूर्वी दीड तास अगोदर हजर राहणे अनिवार्य असून परीक्षा कक्षातील शेवटच्या प्रवेशासाठी प्रवेश प्रमाणपत्रावर विहित केलेल्या वेळेनंतर कोणत्याही उमेदवारास कोणत्याही कारणास्तव प्रवेश अनुज्ञेय नाही.
(४) ओळखीच्या पुराव्यासाठी स्वतःचे आधारकार्ड, निवडणूक आयोगाचे ओळखपत्र, पासपोर्ट, पॅनकार्ड व स्मार्टकार्ड प्रकारचे ड्रायव्हिंग लायसन्स यापैकी किमान कोणतेही एक मूळ ओळखपत्र तसेच, उमेदवाराचे छायाचित्र व इतर मजकूर सुस्पष्टपणे दिसेल अशी मूळ ओळखपत्राची छायांकित प्रत प्रत्येक पेपरच्यावेळी स्वतंत्र सादर करणे अनिवार्य आहे.
(५) परीक्षा कक्षात मोबाईल, दूरध्वनी अथवा इतर कोणतेही दूरसंचार साधन घेऊन जाण्यास परवानगी नाही. (६) परीक्षा उपकेंद्राच्या आवारामध्ये मित्र, नातेवाईक, पालक अथवा अन्य अनधिकृत व्यक्तीना कोणत्याही परिस्थितीत प्रवेश अनुज्ञेय नाही.
(७) परीक्षेवेळी मद्य आणि/किंवा मादक अमली पदार्थाचे प्राशन केलेले आढळल्यास उमेदवारांवर उचित कायदेशीर कारवाई करण्यात येईल. तसेच, अशा उमेदवारांना आयोगाच्या स्वेच्छाधिकारानुसार आयोगामार्फत आयोजित सर्व परीक्षा निवडीकरिता प्रतिरोधित करण्यात येईल.
(८) पडताळणी/तपासणी संदर्भातील कार्यवाही झाल्यानंतर स्वतःच्या बैठक क्रमांकावर जाऊन बसणे अनिवार्य आहे. पडताळणी/तपासणीनंतर उमेदवार स्वतःच्या बैठक क्रमांकाव्यतिरिक्त अन्य ठिकाणी आढळून आल्यास आयोगाच्या सूचनांचे उल्लंघन समजून उमेदवारी रद्द करण्यासह आयोगाच्या स्वेच्छाधिकारानुसार उचित कारवाई करण्यात येईल.
(९) परीक्षा उपकेंद्रावर उपस्थित राहण्याकरीता उमेदवारांनी शक्यतो सार्वजनिक वाहतूक साधनांचा वापर करावा, खाजगी वाहनांच्या पाकिंगकरीता परीक्षा उपकेंद्रावर कोणतीही व्यवस्था करण्यात येणार नाही.
(१०) प्रश्नपुस्तिका, उत्तरपत्रिका तसेच प्रवेश प्रमाणपत्रावर दिलेल्या सर्व सूचनांचे काळजीपूर्वक अवलोकन करुन तंतोतंत पालन करणे
आवश्यक आहे. (११) उत्तरपत्रिकेवर परीक्षेचे नाव, बैठक क्रमांक, संच क्रमांक, विषय संकेतांक इत्यादी तपशील योग्य प्रकारे नमूद करावा.
(१२) परीक्षा कालावधी संपल्यानंतर सोडविलेल्या प्रश्नांची (नोंदविलेल्या उत्तरांची) संख्या नमूद करण्याकरिता कोणताही अतिरिक्त वेळ देण्यात येणार नाही.

(१३) परीक्षा कालावधीत कोणत्याही प्रकारे गैरप्रकार करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे आढळून आल्यास अथवा आयोगाच्या कोणत्याही सूचनांचे उल्लंघन केल्यास संबंधितांवर आयोगाच्या स्वेच्छाधिकारानुसार प्रतिरोधनाची कारवाई केली जाईल. तसेच, प्रचलित नियम/कायद्यातील तरतुदीनुसारही कारवाई करण्यात येईल.
(१४) नवी मुंबई परीक्षा केंद्रावरील काही उमेदवारांची बैठक व्यवस्था प्रशासकीय कारणास्तव मुंबई शहरातील परीक्षा उपकेंद्रांवर करण्यात आली आहे. तथापि, सदर परीक्षा उपकेंद्रे नवी मुंबई परीक्षा केंद्राच्या अंतर्गतच असणार आहेत. परीक्षेसाठी सर्व उमेदवारांना हार्दिक शुभेच्छा !​


MPSC PSI Admit Card


MPSC PSI Admit Card – Maharashtra Secondary Services, Non-Gazetted Group – B (Main) Exam 2020 Hall Ticket for Candidates appearing to Physical Test Conducted for the Cadre of Police Sub-Inspector has come to the profile. The hall tickets are available in the spam folder of the e-mail ID. Candidates can download PSI Physical Test Admit Card and can read important instructions given for MPSC PSI Physical Exam 2022 :

महाराष्ट्र दुय्यम सेवा, अराजपत्रित गट – ब (मुख्य) परीक्षा 2020 या परीक्षेतील पोलीस उपनिरीक्षक या संवर्गासाठी होणाऱ्या शारीरिक – चाचणीसाठी हॉलतिकीट उमेदवार च्या प्रोफाइल ला आलेले आहेत. e-mail ID च्या spam folder मध्ये हॉलतिकीट उपलब्ध झालेले आहेत..

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत

MPSC PSI Exam Time Table 2023

शारीरिक चाचणीचे ठिकाणशारीरिक चाचणी क्रमांकदिनांकवेळ
Maharashtra Police Academy, Trambak Road, Nashik143413/02/202306:30 AM



Important Instruction For PSI Physical Test 2023


1. उपरोक्त परीक्षेसाठी आपण केलेल्या अर्जाच्या संदर्भात आपणांस असे कळविण्याचा आदेश आहे की, महाराष्ट्र दुय्यम सेवा, अराजपत्रित गट – ब (मुख्य) परीक्षा 2020 या परीक्षेतील पोलीस उपनिरीक्षक या संवर्गासाठी होणाऱ्या फक्त शारीरिक – चाचणीसाठी आपण स्वखर्चाने खाली नमूद केलेल्या ठिकाणी विहित दिनांकास व वेळेवर (सकाळी 6.30 वा.) हजर रहावे.

2. शारीरिक चाचणी डिजिटल तंत्रज्ञानावर आधारित प्रणालीद्वारे घेण्यात येणार आहे. 1434 13/02/2023 | 06:30 AM

3. विहीत केलेल्या ठिकाणी विहीत दिनांक व वेळेस (सकाळी 6.30 वा. ) हजर न झाल्यास आपली शारीरिक चाचणी घेण्याचे नाकारले जाईल. शारीरिक चाचणीसाठी निश्चित केलेल्या दिनांक व वेळेत बदल करण्याबाबतची विनंती अपरिहार्य असाधारण कारणाव्यतिरिक्त, कोणत्याही परिस्थितीत मान्य करता येणार नाही.

4. वैद्यकीय कारणास्तव शारीरिक चाचणीची तारीख बदलून देण्याची विनंती करणाऱ्या उमेदवारांनी गंभीर आजार, गंभीर दुखापत इत्यादी प्रकारचे अपवाद वगळता शारीरिक चाचणीच्या दिवशी शारीरिक चाचणीच्या मैदानावर वैद्यकीय प्रमाणपत्रासह वेळेवर (सकाळी 6.30 वा.) उपस्थित राहणे आवश्यक राहील. शारीरिक चाचणीच्या दिवशी उमेदवार उपस्थित राहिला नाही, तर त्याला पुन्हा शारीरिक चाचणीची संधी देण्यात येणार नाही.

5. गंभीर आजार किंवा दुखापत अशा पुरेशा व वाजवी वैद्यकीय कारणास्तव शारीरिक चाचणीची तारीख बदलून देण्याची विनंती करणाऱ्या उमेदवारांची तपासणी मैदानावर उपस्थित असलेल्या शासनाचे वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून करण्यात येईल. अशा उमेदवारांनी शारीरिक चाचणीसाठी मैदानात हजर राहताना अस्वास्थ (Unfit) असल्याचे डॉक्टरांचे वैद्यकीय प्रमाणपत्र तसेच त्यासंदर्भात वैद्यकीय सल्ल्यानुसार केलेल्या सर्व चाचण्यांचे रिपोर्ट, निदान अहवालासह (उदा. एक्स-रे, एम. आर. आय., सिटी स्कॅन, रक्त चाचण्या, पॅथॉलॉजी रिपोर्ट इ.) सोबत आणणे अनिवार्य आहे. त्याबाबत शारीरिक चाचणी मैदानावर वैद्यकीय अधिकारी तपासणी करतील.
6. अपवादात्मक प्रकरणी उमेदवारांची शारीरिक चाचणी व मुलाखतीचा दिनांक वैद्यकीय कारणास्तव बदलून देण्याची विनंती
Scanned with OKEN Sca
आयोगाने मान्य केली आहे, अशा उमेदवारांनी शारीरिक चाचणीसाठी आयोगाकडून निश्चित करण्यात येणाऱ्या सुधारित दिनांकास व ठिकाणी वेळेवर उपस्थित राहणे बंधनकारक राहील, तद्नंतर वैद्यकीय कारणास्तव कोणतीही संधी देय राहणार नाही.
7. उमेदवारांनी सादर केलेले वैद्यकीय प्रमाणपत्रातील वैद्यकीय कारण खोटे असल्याचे आढळून आल्यास सदर उमेदवारावर आयोगाकडून घेण्यात येणाऱ्या सर्व परीक्षा व निवडीसाठी आयोगाच्या स्वेच्छाधिकारानुसार प्रतिरोधित (Debar) करण्याची कारवाई करण्यात येईल.
8. सोबतच्या परिशिष्ट-अ व परिशिष्ट- ब मध्ये नमूद केल्याप्रमाणे शारीरिक चाचणीमध्ये उत्तीर्ण होण्यासाठी किमान 50% गुण (50 गुण) आवश्यक आहेत. तेवढे गुण प्राप्त न केल्यास मुलाखत घेण्यास ‘अपात्र ठरविण्यात येईल.
9. शारीरिक चाचणीसाठी उपस्थित असलेल्या सर्व पुरुष उमेदवारांची प्रथम उंची व छाती यांची मापे व महिलांसाठी उंचीची मापे घेतली जातील. सदर मोजमापन चाचणीमध्ये पात्र ठरणाऱ्या उमेदवारांना पुढील शारीरिक चाचणीस प्रवेश दिला जाईल.
10. उंची छाती मापनाविषयी तक्रार असल्यास संबंधित उमेदवाराने त्याच दिवशी व त्याच ठिकाणी आयोगाच्या अधिकाऱ्यांकडे आपला विनंती अर्ज करावा. याबाबत योग्य विचार करुन अशा उमेदवारांच्या उंची छातीचे फेरमापन त्याच केंद्रावर विहित दिवशी घेण्यात येईल. त्यामध्ये पात्र ठरणाऱ्या उमेदवारांची शारीरिक चाचणी त्याच ठिकाणी घेण्यात येईल.

11. शारीरिक चाचणीसाठी येतांना शक्यतो हाफ पॅन्ट व हाफ शर्ट परिधान करावा आणि उन्हाचा त्रास होऊ नये यासाठी पी कॅप घालावी असा त्यांना सल्ला देण्यात येत आहे. कॅनव्हास शूज घालून येणेही त्यांचे हिताचे होईल. तथापि, धावण्याच्या चाचणीसाठी Spike Shoes चा वापर कोणत्याही परिस्थितीत करता येणार नाही याची कृपया जाणीवपूर्वक नोंद घ्यावी.

12. शारीरिक चाचणीसाठी येताना उमेदवारांनी स्वत:ची ओळख (Identification) पटवून देण्याकरिता स्वत:चे आधारकार्ड, पॅनकार्ड, निवडणूक आयोगाचे ओळखपत्र, पासपोर्ट किंवा ड्रायव्हिंग लायसेंन्स (फक्त स्मार्ट कार्ड प्रकारचे ) यापैकी “किमान एक ” ओळखपत्र मूळ प्रतीत व त्याच्या दोन स्वयंसाक्षांकित छायांकित प्रती सोबत आणणे आवश्यक आहे.

13. मोबाईल फोन, डिजीटल डायरी, मायक्रोफोन इत्यादी दूरसंचार साधने शारीरिक चाचणीच्या दिवशी शारीरिक चाचणीच्या परिसरात आणण्यास व स्वत: जवळ बाळगण्यास सक्त मनाई आहे.

14. “आयोगाचे अध्यक्ष, सदस्य किंवा अधिकारी यांच्यावर प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष दडपण आणण्याचा कोणताही प्रयत्न केल्यास अशा उमेदवाराला आयोगाच्या निवडीपासून अपात्र ठरविण्यात येईल” या आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या उमेदवारांना सर्वसाधारण सूचनामधील सूचना क्रमांक 9.1 (19) मधील तरतूदीकडे आपले लक्ष विशेषत्वाने वेधण्यात येत आहे

. 15. शारीरिक चाचणीच्या सरावासाठी राज्यातील पोलीस कवायत मैदानाचा उपयोग करता येईल. तसेच पोलीस निदेशकाची मदत देण्यात येईल. यासाठी पोलीस मुख्यालयातील संबंधित पोलीस उप आयुक्त, पोलीस मुख्यालय आणि जिल्ह्यांच्या ठिकाणी पोलीस अधीक्षकांशी संपर्क साधावा.

16. शारीरिक चाचणीस येताना शारीरिक चाचणीसाठी बोलविण्यात आल्याचे प्रस्तुत पत्र सोबत आणणे अनिवार्य आहे.

17. मुलाखत स्वतंत्रपणे घेण्यात येणार आहे. यास्तव, शारीरिक चाचणीतून मुलाखतीस पात्र ठरणाऱ्या उमेदवारांना मुलाखतीचा दिनांक, वेळ व ठिकाण स्वतंत्रपणे कळविण्यात येईल.

18. कोरोना विषाणूच्या (COVID-19) प्रादुर्भावाच्या अनुषंगाने केंद्र व राज्य शासन तसेच स्थानिक प्राधिकरणाकडून वेळोवेळी जारी करण्यात आलेल्या सूचना / आदेश यांचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे.

19. शारीरिक चाचणीच्या वेळी गैरप्रकाराचा प्रयत्न करणारा उमेदवार कोणत्याही टप्प्यावर निवड होण्यास अपात्र ठरेल आणि / किंवा इतर योग्य अशा शिक्षेला पात्र ठरेल या बाबीची विशेषत्वाने नोंद घ्यावी.​

Instruction For PSI Appearing Candidates – Read Before Going For PSI Exam 2022




Download Call Letter From Below Link For MPSC PSI Exam 2022


The post appeared first on .
 
Top
AdBlock Detected

We get it, advertisements are annoying!

Sure, ad-blocking software does a great job at blocking ads, but it also blocks useful features of our website. For the best site experience please disable your AdBlocker.

I've Disabled AdBlock