MAH MBA CET 2024 चा निकाल जाहीर | MAH MBA CET Result 2024

hanuman

Active member
MAH MBA CET Result 2024

MAH MBA CET Result 2024


: Maharashtra CET Cell has announced the results of MAH MBA CET exam on Wednesday. As per the court order, the results of the remaining students have been declared while retaining the results of the petitioner students. Further details are as follows:-

एमएएच एमबीए सीईटी परीक्षेचा निकाल जाहीर –

महाराष्ट्र सीईटी सेलने शुक्रवारी एमएएच एमबीए सीईटी परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार, याचिकाकर्त्या विद्यार्थ्यांचा निकाल राखून ठेवत उर्वरित विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर करण्यात आला आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत

राज्यभरातील एमबीए अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या एमबीए-एमएमएस सीईटी परीक्षेचा निकाल सीईटी सेल कक्षाच्या वतीने जाहीर करण्यात आला आहे. तब्बल दोन महिने निकाल जाहीर झाला नसल्याने विद्यार्थ्यांमध्ये चिंतेचे वातावरण होते. अखेर बुधवारी हा निकाल जाहीर करण्यात आला आहे.

प्रवेश परीक्षा कक्षामार्फत ९ ते ११ मार्च राज्य व राज्याबाहेरील १७८ परीक्षा केंद्रावर परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेसाठी १ लाख ५२ हजार ९९९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १ लाख ३८ हजार ६८३ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. यंदा प्रथमच सीईटी सेलच्या वतीने परीक्षांसंदर्भात आक्षेप नोंदणी सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली होती. यामध्ये ४१५ विद्यार्थ्यांनी आक्षेप नोंदवले होते. त्यापैकी (युनिक) आक्षेप ९९ होते. सर्व आक्षेपांचे निराकरण करण्यात आल्यानंतर विद्यार्थ्याच्या लॉगइनमध्ये गुणपत्रिका उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती सीईटी सेलच्या वतीने देण्यात आली. दरम्यान, सीईटी सेलच्या वतीने १३ परीक्षा आतापर्यंत झाल्या आहेत. यापैकी १० अभ्यासक्रमांचा निकाल जाहीर केला आहे. यामध्ये बी एड, एमएड, बीपीएड, एमपीएड, लॉ पाच वर्ष आदी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या सीईटी परीक्षांचा निकाल जाहीर झालेला आहे.​



The post appeared first on .
 
Top
AdBlock Detected

We get it, advertisements are annoying!

Sure, ad-blocking software does a great job at blocking ads, but it also blocks useful features of our website. For the best site experience please disable your AdBlocker.

I've Disabled AdBlock