IAS ची १,३०० तर IPS ची ५८६ पदे रिक्त केंद्र सरकारने दिली माहिती!

hanuman

Active member
IAS-vs-IPS.MB_.webp

देशभरात भारतीय प्रशासकीय सेवा (आयएएस) व भारतीय पोलिस सेवेचे (आयपीएस) अनुक्रमे १,३०० व ५८६ जागा रिक्त असल्याची सविस्तर माहिती केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी गुरुवारी दिली. राज्यसभेतील प्रश्नाचे लेखी उत्तर देताना त्यांनी ही माहिती दिली. एक जानेवारी २०२४ पर्यंत आयएएससाठी ६,८५८ पदे मंजूर केली होती. त्यापैकी ५,५४२ अधिकारी कार्यरत असल्याचे सिंह यांनी स्पष्ट केले. केंद्र सरकारने आयपीएसच्या ५,०५७ पदांना मंजुरी दिलेली असून त्यापैकी ४,४६९ पदांवर अधिकारी कार्यरत आहेत, आयएएसच्या १,३१६ रिक्त पदांपैकी ७९४ हे सरळ भरती तर ५२२ पदोन्नतीची पदे आहेत. (IAS IPS Vacancies 2025 Update)

IAS-vs-IPS.MB_.webp


आयपीएसच्या ५८६ रिक्त पदांपैकी २०९ सरळ भरती व ३७७ पदोन्नतीची रिक्त पदे आहेत. भारतीय वन सेवा अर्थात आयएफएस विभागात अधिकाऱ्यांची ३,१९३ पदांना मंजुरी दिलेली आहे. त्यापैकी २,१५१ अधिकारी कार्यरत आहेत. या विभागातील १,०४२ पदांपैकी ५०३ सरळ भरती तर ५३९ पदोन्नतीची रिक्त पदे आहेत. आयएएस, आयपीएस व आयएफएस अधिकाऱ्यांच्या भरती केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे आयोजित केल्या जाणान्या नागरी सेवा परीक्षेद्वारे केली जाते. रिक्त जागेसंदर्भात माहिती देताना गत पाच वर्षांत सर्वसाधारण वर्ग, एससी, एसटी व ओबीसी वर्गातील आयएएस, आयपीएस व आयएफएस म्हणून झालेल्या नियुक्तीसंदर्भात सिंह यांनी माहिती दिली.

The post appeared first on .
 
Top
AdBlock Detected

We get it, advertisements are annoying!

Sure, ad-blocking software does a great job at blocking ads, but it also blocks useful features of our website. For the best site experience please disable your AdBlocker.

I've Disabled AdBlock