FMGE Exam Date: परदेशात वैद्यकीय शिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना भारतात वैद्यकीय व्यवसाय करण्यासाठी देण्यात येणाऱ्या परदेशी वैद्यकीय पदवी परीक्षेची तारीख जाहीर झाली आहे. सोमवारी सकाळी राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. या परीक्षेसाठी इच्छुक विद्यार्थ्यांना २८ ऑक्टोबर ते १८ नोव्हेंबरदरम्यान नोंदणी करता येईल.
FMGE Exam Schedule 2024
चीन आणि रशिया या देशांत वैद्यकीय शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या जास्त असते. हे विद्यार्थी शिक्षण पूर्ण केल्यानंतर भारतात वैद्यकीय व्यवसाय करण्यासाठी येतात. परंतु त्यासाठी त्यांना परदेशी वैद्यकीय पदवी परीक्षा द्यावी लागते. राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने ही परीक्षा १२ जानेवारीला होणार असल्याचे जाहीर केले होते. मात्र नोंदणी प्रक्रियेचे वेळापत्रक सोमवारी जाहीर करण्यात आले. विद्यार्थ्यांना २८ ऑक्टोबर ते १८ नोव्हेंबर रात्री ११.५५ पर्यंत अर्ज करता येईल. नोंदणी शुल्क भरण्याची मुदत २१ ते २५ नोव्हेंबर आहे. अर्जात स्वाक्षरी, अंगठा, फोटो यासंबंधी त्रुटी ६ ते ९ डिसेंबर दरम्यान सुधारता येतील. कागदपत्रांमध्ये बदलासाठी २० डिसेंबर पर्यंत मुदत आहे. प्राथमिक वैद्यकीय योग्यता प्रमाणपत्र, भारतीय दूतावासाची सत्यता पडताळणी, पात्रता प्रमाणपत्र, भारतीय नागरिकत्वाचा पुरावा यासंबंधी त्रुटी दुरुस्त करण्यासाठी विद्यार्थ्यांना २७ ते ३० डिसेंबर पर्यंत रात्री ११.५५ पर्यंत संधी देण्यात आली आहे. त्यानंतर कोणतेही बदल करता येणार नाहीत.
परदेशी वैद्यकीय पदवी परीक्षेसाठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांची प्रवेशपत्रे ८ जानेवारी २०२५ रोजी संकेतस्थळावर उपलब्ध होतील. त्यानंतर १२ जानेवारी २०२५ रोजी ही परीक्षा होणार आहे. या परीक्षेचा निकाल १२ फेब्रुवारी २०२५ रोजी जाहीर केला जाणार असल्याचे राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाच्या राष्ट्रीय परीक्षा मंडळाने स्पष्ट केले आहे.
परदेशी वैद्यकीय पदवी परीक्षेसाठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांची प्रवेशपत्रे ८ जानेवारी २०२५ रोजी संकेतस्थळावर उपलब्ध होतील. त्यानंतर १२ जानेवारी २०२५ रोजी ही परीक्षा होणार आहे. या परीक्षेचा निकाल १२ फेब्रुवारी २०२५ रोजी जाहीर केला जाणार असल्याचे राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाच्या राष्ट्रीय परीक्षा मंडळाने स्पष्ट केले आहे.
विद्यार्थ्यांसाठी हेल्पलाईन सुविधा उपलब्ध
विद्यार्थ्यांनी नोंदणी अर्ज भरण्याशी संबंधित अडचणी दूर करण्यासाठी राष्ट्रीय परीक्षा मंडळाने हेल्पलाईन सुविधा उपलब्ध करून दिली आहे. विद्यार्थ्यांना आपल्या तक्रारी
या अधिकृत संकेतस्थळावर नोंदवता येतील. तसेच, ७९९६१६५३३३३ या क्रमांकावरही तक्रारींचे निरसन करता येईल. ही सुविधा २८ ऑक्टोबर ते २८ फेब्रुवारी दरम्यान सकाळी ९.३० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत, तर परीक्षेच्या दिवशी सकाळी ७ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत उपलब्ध असेल.
The post appeared first on .