Earthquake Tremors In Maharashtra – नागपूर, अकोला जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य हादरे !!

hanuman

Active member
Earthquake Tremors In Maharashtra

Earthquake Tremors In Maharashtra Nagpur, Akola Distrcit


: Mild earthquake tremors were felt in Akola and Buldhana districts throughout the day on Tuesday. This earthquake has been recorded by the Central Seismological Department. But since these shocks were very mild, it was not noticed much. According to the information received from the website of the National Seismology Department, the first tremor hit Nagpur district at 2:53:39 PM. Its center was at Mohgaon in Hingana taluka. It was a very mild earthquake measuring 2.8 on the Richter scale and had a depth of 10 kilometers. Immediately after that, the second shock occurred at 3 hours 2 minutes 58 seconds. Its center was at Khedi, a village between Parshivani and Mauda talukas. The magnitude was 2.8 on the Richter scale. After this, at 6 pm, 18 minutes and 27 seconds, the third shock occurred in Akola district. Its center was 10 km from Malkapur, its magnitude was 2.9 on the Richter scale and its depth was 10 km. Since these shocks are mild in nature, hardly anyone is aware of them.​

Mild Earthquake In Hingana


Earthquake Tremors In Maharashtra


हिंगणा तालुक्यातील मोहगाव

मंगळवारी दिवसभर नागपूर, व बुलढाणा जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के जाणवत राहिले. केंद्रीय भूकंप विज्ञान विभागाद्वारे या भूकंपाची नोंद करण्यात आली आहे. मात्र हे धक्के अतिशय सौम्य असल्याने याची जाणीव फारशी झाली नाही. राष्ट्रीय भूकंप विज्ञान विभागाच्या वेबसाइटवरून मिळालेल्या माहितीनुसार पहिला हादरा नागपूर जिल्ह्यात दुपारी २ वाजून ५३ मिनिटे ३९ सेकंदाला बसला. याचे केंद्र हिंगणा तालुक्यातील मोहगाव येथे होते. रिश्टर स्केलवर २.८ एवढ्या अतिशय सौम्य क्षमतेचा हा धक्का होता व त्याची खोली १० किलोमीटर होती. त्यानंतर लगेच ३ वाजून २ मिनिटे ५८ सेकंदावर दूसरा धक्का बसला. पारशिवनी व मौदा तालुक्याच्या मध्ये खेडी या गावी त्याचे केंद्र होते. रिश्टर स्केलवर क्षमता २.८ होती. यानंतर सायंकाळी ६ वाजून १८ मिनिटे व २७ सेकंदाला अकोला जिल्ह्यात तिसरा धक्का बसला. त्याचे केंद्र मलकापूरवरून १० किमी अंतरावर होते, त्याची क्षमता रिश्टर स्केलवर २.९ होती व खोली १० किमी होती. हे धक्के सौम्य स्वरूपाचे असल्याने त्याची जाणीव फारशी कुणाला झाली नाही.

बाळापूर, शेगावातही सौम्य धक्के

नागपूरपाठोपाठ अकोला भूकंपाचे धक्के जिल्ह्यातही बसल्यानंतर बाळापूर तालुक्यात अंत्री मलकापूर येथे, तर बुलढाणा जिल्ह्यात शेगाव येथेही भूकंपाचे धक्के जाणवल्याची नोंद झाल्याचे
प्रशासनातर्फे सांगण्यात आले.

जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यात अंत्री भागात मंगळवारी सायंकाळी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. गेल्या आठवड्यात मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये भूकंप झाला होता. त्यानंतर आज अकोला जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य हादरे बसले आहेत.

लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू असताना जिल्ह्यात आज भूकंपाची घटना समोर आली. गेल्या आठवड्यात मराठवाड्यातील नांदेड, हिंगोली आदी जिल्ह्यांमध्ये भूकंप झाला होता. त्याच दिवशी अकोला जिल्ह्यात देखील भूकंप जाणवल्याची चर्चा नागरिकांमध्ये होती. मात्र, त्याची कुठलीही नोंद झाली नव्हती. दरम्यान, मंगळवारी सायंकाळी ६.२७ वाजता जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील अंत्री मलकापूर परिसरात भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. भूकंपाची तीव्रता २.९ रिश्‍टर स्केल नोंदवली गेली, अशी माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली आहे. या घटनेमुळे गावकरी चांगलेच हादरून गेले आहेत.​

The post appeared first on .
 
Top
AdBlock Detected

We get it, advertisements are annoying!

Sure, ad-blocking software does a great job at blocking ads, but it also blocks useful features of our website. For the best site experience please disable your AdBlocker.

I've Disabled AdBlock