CBSE New Syllabus : तिसरी ते सहावीसाठी सीबीएसईचा नवा अभ्यासक्रम

hanuman

Active member
CBSE Bharti 2024

CBSE New Syllabus


: The National Council of Educational Research and Training (NCRT) is set to release new syllabus and books for Class III to VI in the academic year 2024-25 starting from April 1. CBSE officials said on Saturday that there will be no change in the syllabus of other classes.

१ एप्रिलपासून सुरू होणाऱ्या शैक्षणिक वर्ष २०२४-२५ साठी राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद (एनसीईआरटी) तिसरी ते सहावी इयत्तेसाठी नवीन अभ्यासक्रम व पाठ्यपुस्तके प्रकाशित करणार आहे. इतर वर्गांच्या अभ्यासक्रमात आणि पाठ्यपुस्तकांमध्ये कोणताही बदल होणार नाही, असे सीबीएसईच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत

राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद (एनसीआरटी) कडून १ एप्रिलपासून सुरू होणाऱ्या शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये तिसरी ते सहावी वर्गासाठी नवीन अभ्यासक्रम आणि पुस्तके जारी केली जाणार आहेत. इतर इयत्तांच्या अभ्यासक्रमात कुठलाही बदल होणार नसल्याचे सीबीएसईच्या अधिकाऱ्यांनी शनिवारी सांगितले.


एनसीईआरटीकडून तिसरी ते सहावीपर्यंतच्या इयत्तांसाठी 1 नवीन अभ्यासक्रमावर काम सुरू आहे. लवकरच हा अभ्यासक्रम जारी केला जाणार असल्याचे नमूद करत सीबीएसईने संबंधित शाळांना याबाबत पत्र पाठवले आहे. शाळांनी वर्ष २०२३ पर्यंत एनसीईआरटीकडून प्रकाशित अभ्यासक्रमाच्या पुस्तकांऐवजी तिसरी ते सहावीच्या वर्गासाठी जारी होणाऱ्या नवीन अभ्यासक्रम व पुस्तकांचा अवलंब करावा, असे सीबीएसईचे संचालक (शैक्षणिक) जोसेफ इमॅन्युअल यांनी पत्रात म्हटले आहे. नवीन अभ्यासक्रम शिकताना जड जाऊ नये, यासाठी एनसीईआरटी सहावीच्या विद्यार्थ्यांसाठी ब्रिज कोर्स आणि तिसरीच्या वर्गासाठी संक्षिप्त दिशानिर्देश तयार केले जात आहे. एनसीईआरटीकडून अभ्यासक्रम मिळाल्यानंतर सर्व शाळांना ते ऑनलाइन पाठवले जाईल. सीबीएसईकडून शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षकांसाठी क्षमता निर्माण कार्यक्रमाचे आयोजनदेखील केले जाणार आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार शिक्षणाच्या नवीन पद्धतीची क्षमता कार्यक्रमातून ओळख करून दिली जाणार आहे. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर अभ्यासक्रमाचे ओझे कमी करण्यासाठी सहावी ते बारावीपर्यंतचा अभ्यासक्रम तर्कसंगत केला होता.​





CBSE Syllabus 2021-2022 : CBSE Board has announced a new syllabus for Class IX to XII. This syllabus can be viewed by visiting the official website of CBSE, cbseacademic.nic.in. No reduction has been made in the syllabus for the academic session 2021-22.

CBSE Syllabus 2021-2022: नववी ते बारावीचा नवा अभ्यासक्रम जाहीर – CBSE बोर्डाचा नववी ते बारावीचा नवा अभ्यासक्रम जाहीर झाला आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्ड (CBSE) ने शैक्षणिक सत्र 2021-2022 साठी नवा अभ्यासक्रम जारी केला आहे. सीबीएसईच्या अधिकृत वेबसाइट cbseacademic.nic.in वर जाऊन हा सिलॅबस पाहता येईल. शैक्षणिक सत्र 2021-2022 साठी सिलॅबसमध्ये कोणतीही कपात केलेली नाही.

सीबीएसई बोर्डाच्या दहावी, बारावीच्या अंतिम परीक्षा ४ मे ते १ जून या कालावधीत आयोजित करण्यात येणार आहे. नव्या शैक्षणिक सत्रासाठी बोर्डाने नवा पाठ्यक्रम जारी केला आहे. यात कोणतीही गोंधळाची स्थिती नाही. नववी ते अकरावीचे विद्यार्थी बोर्डाच्या ऑफिशिअल पोर्टलवर जाऊन हा सिलॅबस डाऊनलोड देखील करू शकतात. सीबीएसईने अलीकडेच परीक्षांचे सविस्तर वेळापत्रक जारी केले आहे.​


The post appeared first on .
 
Top
AdBlock Detected

We get it, advertisements are annoying!

Sure, ad-blocking software does a great job at blocking ads, but it also blocks useful features of our website. For the best site experience please disable your AdBlocker.

I've Disabled AdBlock