CBSE बोर्डाचा 10 वी आणि 12 वीचा Result कधी लागणार, नवीन अपडेट जाहीर!

hanuman

Active member
CBSE Bharti 2024

CBSE 10th, 12th Exam Result 2024

CBSE बोर्डाची 10 वी आणि 12वीची परीक्षा काही दिवसांपूर्वी संपल्याआहेत. या परीक्षांना बसलेल्या विद्यार्थ्यांना आता निकालाची उत्सुकता लागली आहे. 10 वीची परीक्षा ही 13 मार्च रोजी तर 12 वीची परीक्षा ही 2 एप्रिल 2024 रोजी संपली होती (CBSE Board 10th And 12th Result 2024). सध्या या उत्तरपत्रिका तापासण्याचे काम सुरू आहे. सूत्रांनी दिलेल्या माहिती तसेच मिडीया रिपोर्ट्सनुसार, दरवर्षीप्रमाणे या वेळीही सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशनच्या दहावी आणि बारावी सायन्स, कॉमर्स आणि आर्ट्सचे निकाल लवकरच जाहीर केले जातील. निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना तो अधिकृत वेबसाइट cbse.gov.in, cbseresults.nic.in वर उपलब्ध करून दिला जाईल. विद्यार्थी त्यांचा रोल नंबर आणि जन्मतारीख याद्वारे त्या वेबसाइटवर निकाल पाहू शकतील.

2023 – 2024 शैक्षणिक वर्षाची सीबीएसई बोर्डाची 12 वीची परीक्षा फेब्रुवारी ते एप्रिल दरम्यान घेण्यात आली होती. तर 10 वीची परीक्षा मार्च दरम्यान घेण्यात आली होती. सकाळी साडेदहा ते दीड या वेळेत एकाच शिफ्टमध्ये परीक्षा आयोजीत करण्यात आली होती. 10वी आणि 12वीच्या परीक्षेसाठी यावेळी 26 देशांतील 39 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती.

गेल्या वर्षीच्या आकडेवारीवर नजर टाकली तर सीबीएसई बोर्डाचा निकाल 12 मे रोजी जाहीर झाला. मात्र, यावेळी निकालाला उशीर होणार नाही. एप्रिलअखेर निकाल जाहीर होईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. मात्र सीबीएसई बोर्डाने याबाबत अधिकृत माहिती दिलेली नाही.

CBSE Board Result: पास होण्यासाठी किती गुणांची आवश्यकता?

CBSE बोर्डाच्या परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रत्येक विषयात एकूण 33 टक्के गुण आवश्यक आहेत. जर तुमचे गुण दोन पेक्षा जास्त विषयात 33 पेक्षा कमी असतील तर विद्यार्थी नापास समजला जाईल.

CBSE Board 10th And 12th Result 2024 Link: निकाल पाहण्यासाठी लिंक

cbse.gov.in
cbseresults.nic.in
results.cbse.nic.in



: Central Board of Secondary Education (CBSE) has declared the 12th Examination Result. Candidates visit cbse.nic.in, cbse.gov.in, cbseacademic.nic.in to download the result. Click on the below link to download the result.​

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) आज, 22 जुलै 2022 रोजी इयत्ता 12वीचा निकाल जाहीर केला. सीबीएसई बोर्डाकडून या वर्षी बारावी बोर्डाच्या परीक्षेला बसलेले विद्यार्थी सीबीएसई बोर्डाच्या अधिकृत वेबसाइट cbse.nic.in, cbse.gov.in, cbseacademic.nic.in या अधिकृत वेबसाइटवर जावून बघाता येणार आहे.​
  • याशिवाय digilocker.gov.in आणि results.cbse.nic.in यावरही बघता येणार आहे.
  • निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांना त्यांचा रोल नंबर, जन्मतारीख आणि शाळा क्रमांक टाकावा लागणार आहे.
  • यंदाच्या बारावीच्या परीक्षेत एकूण 92.71 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. CBSE तर्फे यावर्षी 26 एप्रिल ते 15 जून 2022 या कालावधीत इयत्ता 12वी बोर्डाच्या परीक्षा घेण्यात आल्या होत्या.
  • यासाठी 14 लाखांहून अधिक विद्यार्थी CBSE च्या इयत्ता 12 टर्म 2 च्या परीक्षेत बसले होते. परिक्षेनंतर लाखो विद्यार्थी निकालाची आतुरतेने वाट पाहत होते.
  • त्यानंतर आता या परीक्षांचा निकाल जाहीर झाला असून, परीक्षेत यशस्वी होण्यासाठी, विद्यार्थ्यांना सर्व विषयांमध्ये किमान 33% गुण मिळणे आवश्यक आहे.

How to Download CBSE 12th Result

  • निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांनी प्रथम बोर्डाच्या अधिकृत वेबसाइट cbse.gov.in ला भेट द्यावी.
  • त्यानंतर मुख्यपृष्ठावर दिसणार्‍या 10वी किंवा 12वीच्या निकालाशी संबंधित लिंकवर क्लिक करावे.
  • येथे तुमचा रोल नंबर आणि जन्मतारीख आदींची माहिती प्रविष्ट करून सबमिट करा.
  • यानंतर तुम्हाला स्क्रिनवर तुमचा परीक्षेचा निकाल दिसून येईल.




CBSE Term 2 Exam Results


CBSE Exam Results : New update for CBSE Term 2 Exam Results. As per the latest news, CBSE 10th & 12th Term 2 Examination Results will be announced anytime after July 24, 2022. Further details are as follows:-​

केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान (Dharmendra Pradhan) यांनी CBSE 2022 बोर्ड निकालाबाबत बोर्डाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली आहे. या बैठकीनंतर CBSE बोर्ड 24 जुलै 2022 नंतर 10वी आणि 12 वीचा निकाल जाहीर करू शकते, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.​
  • पार पडलेल्या बैठकीत बोर्डाच्या परीक्षेचा (Exam) निकाल जाहीर करण्याबाबत चर्चा झाल्याचे सांगण्यात आले आहे.
  • त्यामुळे पालकांसह विद्यार्थांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
  • सीबीएसई बोर्डाने (CBSE Board ) घेतलेल्या परीक्षांच्या निकालबाबत बोलताना केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सीबीएसई बोर्डाने निकालाला उशीर केलेला नसल्याचे म्हटले होते.
  • तसेच लवकरच बोर्ड 10 वी आणि 12 वी बोर्डाच्या परीक्षांचा निकाल वेळेवर जाहीर करेल असे विधान केले होते.
  • मात्र, अद्यापपर्यंत बोर्डाकडून निकालाबाबतच्या तारखेबाबत अधिकृत कोणतीही घोषणा केलेली नाही.
  • मात्र, शिक्षणमंत्र्यांच्या बैठकीनंतर 24 जुलैनंतर कधीही परीक्षेचा निकाल जाहीर करू शकते अशी दाट शक्यता वर्तवली जात आहे.

दरम्यान, परीक्षांचा निकाल जाहीर होताच विद्यार्थी बोर्डाच्या अधिकृत वेबसाइट cbse.gov.in, cbresults.nic.in वरून निकाल पाहू शकणार आहेत. अलीकडेच बोर्डाने डिजिलॉकर पिन देखील जारी केला असून, या वर्षी परीक्षा दिलेले विद्यार्थी बोर्डाच्या वेबसाइटवरून तसेच डिजिलॉकरद्वारे त्यांचे निकाल पाहू शकणार आहेत. यावर्षी 35 लाख विद्यार्थांनी CBSE बोर्डाची इयत्ता 10वी आणि 12वी टर्म 2 ची परीक्षा दिली आहेत. टर्म 2 ची परीक्षा 26 एप्रिल ते 15 जून या कालावधीत घेण्यात आली होती. त्यानंतर आता पालकांना आणि विद्यार्थांना निकाल कधी लागणार याची उत्सुकता लागली आहे.​

How to Check CBSE Term 2 Exam Result

  • 1. सर्व प्रथम अधिकृत वेबसाइट cbseresults.nic.in वर जा.
  • 2. त्यानंतर 10वी किंवा 12वी वर्ग निकाल 2022 लिंकवर क्लिक करा.
  • 3. यानंतर बोर्ड रोल नंबर, जन्मतारीख आणि शाळा क्रमांक टाका.
  • 4. आता सबमिट बटणावर क्लिक करा.
  • 5.CBSE बोर्ड इयत्ता 10वी, 12वीचा निकाल 2022 स्क्रीनवर दिसून येईल.

CBSE Term 2 Exam Result 2022


CBSE Exam Results : CBSE tern 2 results will come soon. These details all about the scorecard. Candidates can check their result on cbse.gov.in/ cbseresults.nic.in/ results.gov.in. Further details are as follows:-​

सीबीएसई दहावी आणि बारावीची परीक्षा एप्रिल-मे महिन्यात दोन टर्ममध्ये घेण्यात आली. दहावी आणि बारावीच्या परीक्षेत साधारण ३५ लाख विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. यावेळी विद्यार्थ्यांचा निकाल parikshasangam.cbse.gov.in वर देखील प्रसिद्ध केला जाणार आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या स्कोअरकार्डमध्ये बातमीत देण्यात आलेले तपशील पाहता येणार आहेत.​
  • सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन (Central Board of Secondary Education, CBSE) म्हणजेच सीबीएसईकडून दहावी आणि बारावीचे निकाल (CBSE टर्म 2 Result 2022) लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे.
  • दोन्ही वर्गांचा अंतिम निकाल (CBSE 10th,12th Result 2022) जुलैच्या अखेरीस जाहीर केला जाऊ शकतो.
  • मात्र, बोर्डाकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती शेअर करण्यात आलेली नाही.
  • निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना बोर्डाची अधिकृत वेबसाइट cbseresults.nic.in वर निकाल पाहता येणार आहे.
  • विद्यार्थी रोल नंबर आणि जन्मतारीख या क्रेडेन्शियल्सच्या मदतीने लॉगिन करून त्यांचे गुण तपासू शकतील.

सीबीएसई दहावी आणि बारावीची परीक्षा एप्रिल-मे महिन्यात दोन टर्ममध्ये घेण्यात आली. दहावी आणि बारावीच्या परीक्षेत साधारण ३५ लाख विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. यावेळी विद्यार्थ्यांचा निकाल parikshasangam.cbse.gov.in वर देखील प्रसिद्ध केला जाणार आहे. खाली देण्यात आलेल्या वेबसाइट्सची यादीवरुन देखील विद्यार्थी आपला निकाल पाहू शकतात.​

  • cbse.gov.in
  • cbseresults.nic.in
  • results.gov.in

३३ टक्के गुण आवश्यक

सीबीएसई परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी विद्यार्थ्यांना एकूण आणि प्रत्येक विषयात किमान ३३ टक्के गुण मिळणे आवश्यक आहे. कोणत्याही परिस्थितीत विद्यार्थी चुकले तर ते पुन्हा पडताळणी प्रक्रियेसाठी अर्ज करू शकतात किंवा कंपार्टमेंट परीक्षेला बसू शकतात. यासोबतच जर एखादी व्यक्ती कंपार्टमेंट परीक्षेत ३३ टक्के गुण मिळवू शकली नाही तर त्याला अनुत्तीर्ण घोषित केले जाईल याची नोंद घ्या.​

स्कोअरकार्डमध्ये असतील हे तपशील

  • १) विद्यार्थ्याचे नाव
  • २) शाळेचे नाव
  • ३) रोल नंबर
  • ४) प्रत्येक विषयात मिळालेले जास्तीत जास्त गुण
  • ५) प्रत्येक विषयात मिळालेले गुण
  • ६) इतर माहिती




CBSE Term 2 Exam Results 2022


CBSE Exam Results : CBSE Term 2 Exam Results 2022 will be declared soon. As per the latest news, the 10th CBSE Term 2 examination will be declared on the 13th of July 2022 & the 12th CBSE Term Exam 2022 will be declared on the 15th of July 2022. Further details are as follows:-

काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र बोर्डाचे इयत्ता दहावीचा निकाल जाहीर करण्यात आला. अशातच आता CBSE च्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत. सध्या सीबीएसई बोर्डाचे निकाल कधी लागणार? असा प्रश्न पालक आणि विद्यार्थी विचारत आहे.​
  • CBSE निकालासंदर्भात ४ जुलै ही तारीख निश्चित करण्यात आली होती मात्र आता हा निकाल लांबविण्यात आलाय.
  • एका ताज्या रिपोर्टनुसार दहावी CBSE टर्म २ चा निकाल हा येणाऱ्या १३ जूलैला जाहीर होण्याची शक्यता आहे
  • तर बारावी CBSE टर्म २ चा निकाल १५ जूलै ला जाहीर होणार, अशी माहिती समोर आली आहे.
  • अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत सुचना देण्यात आलेली नाही.

CBSE निकाल 2022 कुठे पाहाल?

अधिकृत वेबसाइट cbse.gov.in, results.gov.in. आणि cbresults.nic.in वरुन निकाल जाहीर करण्यात येईल याशिवाय विद्यार्थी परिक्षा संगम या टॅब वरुनही गुणपत्रिका डाऊललोड करु शकतात.

यावर्षी सीबीएसई दहावी आणि बारावीच्या परीक्षेत एकूण 35 लाखांहून अधिक विद्यार्थी बसले होते. यात प्रामुख्याने 21 लाख विद्यार्थी दहावीच्या परीक्षेला बसले होते 14 लाख विद्यार्थी 12 वीच्या परीक्षेला बसले होते. 26 एप्रिल ते 24 मे दरम्यान सीबीएसई दहावीची परीक्षा पार पडली तर 26 एप्रिल ते 15 जून या कालावधीत सीबीएसई बारावी वर्गाची परीक्षा घेण्यात आली होती.​


CBSE 10th Result 2022


CBSE Exam Results : CBSE Board 10th Exam term 2 Exam will be available soon. Cnadidates check their result on CBSE official; website or digilocker.gov.in or UMANG App OR SMS. Further details are as follows:-​

CBSE 10th Result 2022: वेबसाइट क्रॅश झाल्यास कुठे बघायचा निकाल? जाणून घ्या


सीबीएसई बोर्डाच्या दहावीच्या टर्म-2 परीक्षेचा निकाल लवकरच जाहीर केला जाणार आहे. दहावीचा निकाल कुठे आणि कसा पाहता येईल. अधिकृत वेबसाइट कोणती? या सर्वाची माहिती जाणून घ्या ….​

  • केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) लवकरच दहावी बोर्डाच्या टर्म-2 परीक्षेचा निकाल जाहीर करेल.
  • CBSE च्या अधिकृत वेबसाईट cbse.gov.in वर विद्यार्थ्यांना निकाल उपलब्ध होईल.
  • याशिवाय विद्यार्थी cbseresults.nic.in ला भेट देऊ शकतात.
  • तथापि, इतर अनेक मार्ग आहेत ज्याद्वारे विद्यार्थी त्यांच्या बोर्ड परीक्षेचे निकाल तपासू शकतात.

CBSE 10th Result 2022: CBSE डिजिलॉकर अॅपच्या मदतीने

  • गेल्या वर्षीप्रमाणे, यावेळी देखील CBSE बोर्ड परीक्षेचे निकाल डिजीलॉकर अॅपवर प्रसिद्ध केले जातील.
  • यासाठी विद्यार्थ्यांना त्यांचा रोल नंबर आणि जन्मतारीख देऊन लॉग इन करावे लागेल.
  • याशिवाय, विद्यार्थी डिजीलॉकरच्या अधिकृत वेबसाइट, digilocker.gov.in वर जाऊन त्यांचे निकाल तपासू शकतील.

CBSE 10th Result 2022: UMANG अॅपच्या मदतीने पाहा निकाल


केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) द्वारे दहावी आणि बारावीच्या टर्म १ बोर्ड परीक्षेचा निकाल UMANG अॅपवर देखील प्रसिद्ध केला जाईल.​

CBSE 10th Result 2022: निकाल

एसएमएसद्वारे देखील तपासता येईल. यासाठी विद्यार्थ्यांना त्यांच्या नोंदणीकृत क्रमांकावरून मंडळाच्या टोल फ्री क्रमांकावर एसएमएस करावा लागेल.​

CBSE 10वी निकाल 2022: या वेबसाइटवर देखील निकाल पहा






CBSE 10th Result 2022


CBSE Exam Results : CBSE 10th Tern 2 examination result may be announced today. Check here how to check result & how to result via SMS. Further details are as follows:-​

महत्त्वाचे- CBSE दहावीचा निकाल आज जाहीर होण्याची शक्यता!! SMS द्वारे बघता येईल निकाल…


सीबीएसई बोर्डाचा इयत्ता दहावीचा निकाल आज जाहीर होण्याची शक्यता आहे. यंदा ही परीक्षा कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर दोन सत्रात आयोजित करण्यात आली होती. कोणत्या संकेतस्थळावर निकाल कसा पाहता येईल जाणून घ्या…​

  • केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात सीबीएसई बोर्डाचा इयत्ता दहावीचा निकाल सोमवारी ४ जुलै रोजी जाहीर केला जाण्याची दाट शक्यता आहे.
  • या दृष्टीने बोर्ड अधिकाऱ्यांच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.
  • मात्र निकालाच्या तारखेसंबंधी बोर्डाकडून अधिकृत घोषणा केलेली नाही.
  • यंदा ही परीक्षा कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर दोन सत्रात आयोजित करण्यात आली होती.

How to Check CBSE 10th Term 2 Exam Result

  • सीबीएसई दहावी रिझल्ट टर्म 2 पाहण्यासाठी सर्वात आधी अधिकृत वेबसाइट digilocker.gov.in किंवा अधिकृत मोबाइल अॅप वर जा.
  • यानंतर आपले लॉगिन तपशील नोंदवा.
  • यानंतर होमपेजवरील सेंट्रल बोर्ड ऑफ सेकेंडरी एजुकेशनच्या फोल्डर वर क्लिक करा.
  • आता ‘सीबीएसई टर्म 2 रिजल्ट फॉर क्लास 10’ लिहिलेल्या टॅबवर क्लिक करा.
  • आता स्क्रीनवर तुम्हाला प्रोविजनल मार्कशीट दिसेल.
  • यानंतर भविष्यातील संदर्भासाठी ही पीडीएफ डाऊनलोड करा आणि जपून ठेवा.

How to check CBSE 10th term 2 result 2022 via SMS


एसएमएस द्वारे कसा पाहायचा सीबीएसई दहावी टर्म – २ निकाल?

  • सीबीएसई 10वीं टर्म – 2 निकाल पाहण्यासाठी मोबाइलवर एसएमएस अॅप्लिकेशन उघडा. यानंतर एक एसएमएस टाइप करा – cbse10th<स्पेस>रोल नंबर<स्पेस>जन्मतारीख<स्पेस>शाळा क्रमांक<स्पेस>सेंटर नंबर.​
  • यानंतर हा एसएमएस ७७३८२९९८९९ क्रमांकावर पाठवा.​
  • थोड्याच अवधीत तुमच्या मोबाइलवर एक एसएमएस येईल, या तुमचा निकाल असेल.​

CBSE 10th Result


CBSE Exam Results : Latest update about CBSE 10th Class Result 2022. The CBSE 10th Class Result coming soon. Candidates check their result on cbseresults.nic.in. Further details are as follows:-

दहावी बोर्डाच्या परीक्षा २४ मे रोजी संपल्या आहेत. तर बारावी बोर्ड परीक्षा १५ जून २०२२ रोजी संपली आहे. सीबीएसई बोर्डाने इयत्ता दहावी, बारावीच्या दोन टर्म परीक्षा घेतल्या होत्या. सीबीएसईचा निकाल जुलैमध्ये जाहीर केला जाईल. सूत्रांनी तात्पुरत्या तारखाही जाहीर केल्या आहेत. उमेदवारांना अधिकृत वेबसाइटवरील अपडेटवर लक्ष ठेवण्याचा सल्ला देण्यात आला आहे.​

जुलैच्या पहिल्या आठवड्यात दहावीचा निकाल

  • आत्तापर्यंत सीबीएसई दहावी निकाल २०२२ आणि सीबीएसई बारावी निकालाच्या घोषणेबद्दल कोणतेही अधिकृत माहिती देण्यात आली नाही.
  • दरम्यान सीबीएसई दहावी टर्म-२ चा निकाल जुलैच्या पहिल्या आठवड्यात जाहीर होईल अशी अपेक्षा आहे.
  • ४ जुलैपर्यंत निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे.
  • तर बारावी बोर्ड टर्म-२ चा निकाल जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात जाहीर होईल.
  • बारावीचा निकाल १४ किंवा १५ जुलैला जाहीर होण्याची शक्यता आहे.

टर्म-१ आणि टर्म-२ चे वेटेज ठरणे बाकी

  • इयत्ता दहावीची मूल्यमापन प्रक्रिया संपली आहे.
  • काही केंद्रांवर बारावीची मूल्यांकन प्रक्रिया अद्याप प्रलंबित आहे.
  • त्याचवेळी टर्म-१ आणि टर्म-२ चे वेटेज अजून ठरवायचे असल्याचे अधिकृत सूत्रांचे म्हणणे आहे.
  • इयत्ता दहावीचा निकाल ४ जुलै २०२२ पर्यंत आणि बारावीचा निकाल १४ जुलैपर्यंत जाहीर होण्याची शक्यता आहे.

सीबीएसई टर्म २ निकाल पाहण्यासाठी वेबसाइट










CBSE 10th 12th Results 2022 | cbresults.nic.in


CBSE Exam Results : CBSE 10th & 12th examinations will be available soon by The Central Board of Secondary Education, CBSE. The results will be available on cbse.gov.in OR cbresults.nic.in websites. Further details are as follows:-​

सीबीएसई बोर्डाने दहावीच्या परीक्षांच्या उत्तरपत्रिकांच्या तपासणीचे काम जवळपास पूर्ण केले आहे. निकालाची तारीख लवकरच जाहीर करण्यात येईल. यावर्षी सुमारे ३५ लाख विद्यार्थी सीबीएसई दहावी आणि बारावीच्या टर्म २ परीक्षेला बसले होते.
  • केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात सीबीएसईमार्फत (Central Board of Secondary Education, CBSE) घेण्यात आलेल्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांचा निकाल लवकरच जाहीर केला जाण्याची शक्यता आहेत.
  • अद्याप केंद्रीय मंडळाकडून निकालाबाबत कोणतीही अधिकृत सूचना प्रसारित झालेली नाही.
  • विद्यार्थी-पालक मात्र निकालाकडे डोळे लावून बसले आहेत.
  • मीडिया रिपोर्ट्स नुसार, दहावीचा निकाल जून अखेरपर्यंत किंवा जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जाहीर केला जाण्याची शक्यता आहे.
  • सीबीएसई बोर्डाची बारावीची परीक्षा काही दिवसांपूर्वीच संबली आहे.
  • या परीक्षेचा निकाल जुलै महिन्यात अपेक्षित आहे.

सीबीएसई बोर्डाने दहावीच्या परीक्षांच्या उत्तरपत्रिकांच्या तपासणीचे काम जवळपास पूर्ण केले आहे. निकालाची तारीख लवकरच जाहीर करण्यात येईल. निकालाची तारीख जाहीर होतात मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळांवर cbse.gov.in किंवा cbresults.nic.in येथे निकालाच्या तारखेस निकाल जाहीर करण्यात येईल.​

How to Check CBSE 10th 12th Results 2022

  • – सीबीएसई बोर्डाचे अधिकृत संकेतस्थळ cbse.gov.in किंवा cbseresults.nic.in वर जा.
  • – दहावी किंवा बारावीच्या निकालाच्या लिंकवर क्लिक करा (ही लिंक निकालाच्या दिवशी कार्यान्वित होईल.)
  • – नोंदणी क्रमांक, रोल नंबर भरा
  • – सीबीएसईचा दहावी बारावीचा टर्म २ चा निकाल स्क्रीनवर दिसेल.
  • – तुमची गुणपत्रिका पाहा आणि डाऊनलोड करा. भविष्यातील संदर्भासाठी प्रिंटआऊट घेऊन ठेवा.

CBSE 10th Result 2022


CBSE Exam Results : Central Board of Secondary Education will be result announced soon for SSC Exam. The teachers are checking the answer sheets of the 10th examination. The Board has fixed June 20 as the deadline for this. Further details are as follows:-

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दहावी परीक्षांचे निकाल लवकरच जाहीर केले जाणार आहेत. शिक्षकांकडून दहावी परीक्षांच्या उत्तरपत्रिका तपासण्याचे काम सुरु आहे. त्यासाठी मंडळाकडून २० जूनची अंतिम मुदत निश्चित करण्यात आली आहे. कॉपी तपासण्याचा वेग वाढवण्याच्या सूचनाही बोर्डाकडून देण्यात आल्या आहेत.आता २० जूनपर्यंत उत्तरपत्रिका तपासण्याचे काम पूर्ण होईल, त्यानंतर निकाल जाहीर होण्यासाठी बोर्डाला किमान सात दिवस लागतील, असे सांगण्यात येत आहे.​

२० जूनपर्यंत तपासणी पूर्ण

  • मिळालेल्या माहितीनुसार, शिक्षकांकडून दहावी परीक्षांच्या उत्तरपत्रिका तपासण्याचे काम सुरु आहे.
  • त्यासाठी मंडळाकडून २० जूनची अंतिम मुदत निश्चित करण्यात आली आहे.
  • कॉपी तपासण्याचा वेग वाढवण्याच्या सूचनाही बोर्डाकडून देण्यात आल्या आहेत.
  • यासाठी प्रादेशिक तपासणी केंद्रांचाही वापर केला जाणार आहे.
  • त्यासाठी परीक्षेच्या गुणपत्रिका यापूर्वीच विभागीय मुख्यालयात पाठवण्यात आल्या असून, त्या विविध मूल्यमापन केंद्रांना वितरित करण्यात आल्या आहेत.
  • परीक्षा संपल्यानंतर लगेचच ही प्रक्रिया सुरू करण्यात आली होती.
  • कॉपी तपासण्याचा वेग वाढवण्यासाठी मंडळाने जूनमध्येच प्रादेशिक वितरणाचे काम सुरू केले आहे.

दहावीचा निकाल कधी लागणार?

दहावीच्या निकाल २९ किंवा ३० जून निकाल जाहीर होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. तथापि, सीबीएसई अधिकार्‍यांकडून तात्पुरत्या तारखेबद्दल देखील कोणते संकेत देण्यात आले नाहीत. परीक्षा संपल्यानंतर २० दिवसांत बोर्ड निकालाची तारीख जाहीर करेल, एवढीच अपडेट देण्यात आली आहे. सीबीएसई दहावीच्या टर्म २ च्या परीक्षा २४ मे रोजी संपल्या. याला आता २० दिवस उलटून गेले आहेत. दरम्यान उत्तरपत्रिका तपासण्याचे काम कमी वेगाने सुरु आहे. आता २० जूनपर्यंत कॉपी तपासण्याचे काम पूर्ण होईल, त्यानंतर निकाल जाहीर होण्यासाठी बोर्डाला किमान सात दिवस लागतील, असे सांगण्यात येत आहे.​


CBSE 10th 12th Exams Result


CBSE Exam Results : Results for the 10th and 12th board exams are expected in the first week of July. This year, CBSE has made 2 boards and the final results will include Term 1 & Term 2. Term 1 result has already been announced. and now board direct will announced a final result. Further details are as follows:-

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (Central Board of Secondary Education, CBSE) परीक्षा संपत असताना 30 लाखांहून अधिक विद्यार्थी त्यांच्या इयत्ता 10 वी आणि 12 वीच्या बोर्ड परीक्षेच्या निकालाच्या प्रतीक्षेत आहेत. इयत्ता 10 वी टर्म 2 च्या परीक्षा संपल्यामुळं मूल्यांकन प्रक्रिया सुरू असून 12 वी’च्या परीक्षा 15 जून पर्यंत चालू राहतील. या वर्षी CBSE नं दोन बोर्ड केले असून अंतिम निकालामध्ये टर्म 1 आणि टर्म 2 चा समावेश असणार आहे.​

  • टर्म 1 चा निकाल आधीच जाहीर झालाय. आता बोर्ड थेट अंतिम निकाल जाहीर करणार आहे.
  • सीबीएसईनं यापूर्वी जूनअखेर किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यात निकाल जाहीर करणार असल्याचं सांगितलं होतं.
  • मात्र, अचूक तारखा न सांगता बोर्डानं म्हटलं होतं की, ‘आम्ही वेळेत निकाल जाहीर करण्याचा प्रयत्न करीत आहोत.
  • सध्याच्या ट्रेंडनुसार, कॉलेज प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यासाठी इयत्ता 10 वीपूर्वी इयत्ता 12 वीचे निकाल जाहीर केले जातात.’
  • यंदा बोर्ड अनेक बाबींच्या आधारे अंतिम निकाल देणार आहे. CBSE नं मूल्यमापन केंद्रांची संख्याही वाढवलीय.
  • प्रत्येक दिवशी तपासल्या जाणाऱ्या प्रतींची संख्या वाढवण्याच्या उद्देशानं अधिकाधिक शिक्षकांना तपासणी प्रक्रियेत सहभागी करून घेण्याचं मंडळाचं नियोजन आहे. निष्पक्षता सुनिश्चित करण्यासाठी प्रश्नपत्रिकांचे संच रंगीत असणार आहेत.
  • म्हणजेच, एका व्यक्तीनं प्रत तपासल्यानंतर, ती मूल्यांकनकर्त्यांमध्ये आंतर तपासली जाईल.
  • यामुळं एकूण किंवा चुकीच्या गणनेमध्ये कोणतीही चूक होणार नाही याची खात्री होईल.
  • काही त्रुटी आढळल्यास त्या दुरुस्त केल्या जातील, असंही सीबीएसईनं म्हटलंय.
  • तसेच विद्यार्थी टर्म 1 आणि टर्म 2 या दोन्ही वेळेस गैरहजर राहिल्यास बोर्ड विद्यार्थ्यांच्या निकालाची गणना करू शकणार नाही.
  • अशा विद्यार्थ्यांना पुढील वर्षी परीक्षेला बसावं लागणार आहे.

CBSE X Term 1 Exam Result Announced


CBSE Exam Results : CBSE X Term 1 Exam Result Announced The CBSE Board has sent an email to the schools in this regard. However, no official notification has been issued in this regard. However, students of Term 1 X have been appealed to contact the schools for their results. Further details are as follows:-​

सीबीएसई दहावी टर्म १ परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. सीबीएसई बोर्डातर्फे शाळांना यासंदर्भात ईमेल पाठविण्यात आला आहे. असे असले तरी यासंदर्भात अधिकृत नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले नाही. तरी टर्म १ दहावीच्या विद्यार्थ्यांनी आपल्या निकालासाठी शाळांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.​

सीबीएसई बोर्डाने शाळांना ईमेलकरुन यासंदर्भातील माहिती दिली. दहावीच्या शाळा कोडच्या सत्र २०२१-२२ च्या सत्र १ परीक्षेच्या निकालासंदर्भात यात सूचना करण्यात आली आहे. असे असले तरीही सीबीएसई इयत्ता दहावी निकाल २०२२ च्या घोषणेबाबत अधिकृत नोटिफिकेशनची वाट पाहिली जात आहे. सीबीएसई टर्म १ इयत्ता दहावीच्या परीक्षा ३० नोव्हेंबर ते ११ डिसेंबर २०२१ या कालावधीत घेण्यात आल्या. विद्यार्थी संबंधित शाळा प्राधिकरणाला भेट देऊन त्यांचे स्कोअर कार्ड गोळा करू शकतात. स्कोअरकार्डमध्ये विद्यार्थ्यांच्या विषयनिहाय गुणांचा तपशील असू शकतो. शाळा अधिकारी त्यांच्या अधिकृत शैक्षणिक मेल आयडीद्वारे निकाल पाहू शकतात.

अधिकृत वेबसाईटवर निकाल जाहीर झालेला नाही

यावेळी सीबीएसईने दहावी टर्म १ परीक्षेचा निकाल अधिकृत वेबसाइटवर निकाल जाहीर केलेला नाही. बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवर निकाल जाहीर होतील, अशी शक्यता यापूर्वी वर्तवली जात होती. शाळांकडून विद्यार्थ्यांचा निकाल डाउनलोड करून विद्यार्थ्यांना दिला जाऊ शकतो. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी आपापल्या शाळांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.​


CBSE Board Term 1 Result


CBSE Exam Results : According to some media reports, an official affiliated with the CBSE Board has released important information regarding the outcome of CBSE Term 1. According to the report, CBSE Term 1 results are expected to be released this week. Further details are as follows:-​

काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, CBSE बोर्डाशी संबंधित एका अधिकाऱ्याने CBSE टर्म 1 च्या निकालाशी संबंधित एक महत्त्वाची माहिती जारी केली आहे. अहवालानुसार, CBSE टर्म 1 चा निकाल या आठवड्यात जाहीर होण्याची अपेक्षा आहे. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांना CBSE बोर्डाच्या अधिकृत वेबसाइटवर लक्ष ठेवण्याचा सल्ला देण्यात आला आहे.​

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव बघता मागील वर्षीच्या CBSE बोर्डाच्या परीक्षा (CBSE Board Exams) रद्द करण्यात आल्या. मात्र यंदा परीक्षा रद्द कराव्या लागू नयेत म्हणूनच CBSE बोर्डाकडून दहावी आणि बारावी बोर्डाची परीक्षा दोन टर्ममध्ये (CBSE Board terms exams) घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार CBSE च्या पहिल्या टर्मच्या परीक्षा (CBSE Board Term 1 Exams) घेण्यात आल्या आहेत. मात्र परीक्षेला तब्बल तीन महिने उलटून गेले तरी अजून निकाल (CBSE Board Term 1 Result) जाहीर करण्यात आला नाही. मात्र आता CBSE च्या पहिल्या टर्मचा निकाल लवकरच लावण्यात येणार आहे अशी माहिती मिळाली आहे.

There is confusion among CBSE board students. The Board has not yet announced the results of the Term 1 Exam and has announced the CBSE Term 2 Exam Time Table. The CBSE Term 1 exams were held in December 2021 and since then the students have been waiting for the results.

CBSE बोर्डाची परीक्षा नवीन शैक्षणिक धोरण 2020 अंतर्गत घेतली जात आहे. त्यामुळेच दहावी आणि बारावीच्या परीक्षा दोन टर्म आणि ऑफलाइन पद्धतीनं घेतल्या जात आहेत. CBSE बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी गेल्या 2 महिन्यांपासून बोर्डाच्या परीक्षेबाबत कोणतीही अधिकृत माहिती जाहीर केलेली नाही. CBSE च्या अधिकृत वेबसाइट cbse.nic.in वर बोर्ड परीक्षा 2022 शी संबंधित सर्व अपडेट्स तपासण्याचं आवाहन करण्यात येत आहे.

निकाल तयार

According to the report, CBSE Term 1 results have been prepared and may be released by March 10, 2022. The result of CBSE Board will be announced on the official website. In case of website crash, 10th and 12th class students can view the results via SMS (CBSE Result by SMS) or on Digilocker (CBSE Result on Digi Locker).​

The post appeared first on .
 
Top
AdBlock Detected

We get it, advertisements are annoying!

Sure, ad-blocking software does a great job at blocking ads, but it also blocks useful features of our website. For the best site experience please disable your AdBlocker.

I've Disabled AdBlock