AI आता तुम्हाला नोकरीही शोधून देणार – सरकारचे पोर्टल आणखी आधुनिक होणार – AI Job Openings Search 2024

hanuman

Active member
AI Job Openings Search 2024

AI Job Openings Search 2024 – नोकऱ्या देणाऱ्या संस्था यांना एका मंचावर आणण्यासाठी केंद्र सरकारकडून ९ वर्षे जुन्या ‘नॅशनल करिअर सर्व्हिस’ (NCS Portal Jobs 2024) पोर्टलला अद्ययावत करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI Jobs) वापर करण्यात येणार आहे. पोर्टल अद्ययावत करण्यासाठी श्रम व रोजगार मंत्रालय काम करीत आहे. मंत्रालयाशी संबंधित एक अधिकाऱ्याने सांगितले की, पोर्टल अधिक प्रभावी करण्यासाठी ‘AI’ आणि मशीन लर्निंगचा वापर करण्याची योजना बनविण्यात आली आहे.

AI Job Openings Search 2024


हे पोर्टल नव्या स्वरूपात रुजू होण्यासाठी ६ ते ९ महिने लागू शकतात. अद्ययावत पोर्टलमुळे रोजगार इच्छुक तरुण, रोजगारदाता कंपन्या, करिअर सल्लागार, प्लेसमेंट संस्था आणि सरकारी विभाग या सर्वांना एकच एक डिजिटल प्लॅटफॉर्म उपलब्ध होईल. AI द्वारा संचालित होणार असल्यामुळे हे पोर्टल अधिक कार्यक्षम असेल.​

राज्ये, जिल्ह्यांसाठी मायक्रो- साईट्स अन्य एका अधिकाऱ्याने सांगितले की, अद्ययावत NCS पोर्टल मध्ये राज्ये आणि जिल्ह्यांसाठी मायक्रो-साईट्स असतील. त्यातून जिल्हा-राज्य-देश, असे नेटवर्क तयार होऊन सर्व आकडे केंद्रिकृत होतील.

The post appeared first on .
 
Top
AdBlock Detected

We get it, advertisements are annoying!

Sure, ad-blocking software does a great job at blocking ads, but it also blocks useful features of our website. For the best site experience please disable your AdBlocker.

I've Disabled AdBlock