2024 नविन अपडेट -अकरावीची नोंदणी पुढील आठवड्यापासून होणार!! 11th Admission 2024 – 2025

hanuman

Active member
11th-admission.jpg

11th Admission 2024 – 2025


11th Admission 2024 – 2025 : Eleventh Admission online access from Next Week – मुंबई, पुणे, नागपूर, अमरावती आणि नाशिक या महापालिका क्षेत्रांतील कनिष्ठ महाविद्यालयांतील अकरावीच्या ऑनलाईन प्रवेशाच्या पहिल्या टप्प्याची सुरुवात पुढील आठवड्यात होणार आहे. दहावीच्या निकालापूर्वी हा प्रवेशाचा टप्पा असेल. दहावीच्या निकालानंतर दुसऱ्या टप्प्याची सुरुवात होणार आहे या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत


अकरावीच्या ऑनलाईन प्रवेश प्रकियेसाठी दहावीला बसलेल्या विद्यार्थ्यांची माहिती गोळा करण्याचे काम पूर्ण झाले आहे. त्यासाठी संबंधित संस्थेला ही माहितीही पुरविण्यात आली असल्याने पुढील आठवड्यात या प्रवेशाच्या नोंदणीचा पहिला टप्पा सुरू होईल. यात विद्यार्थ्यांना लॉगीन आयडीच्या माध्यमातून आपली प्राथमिक माहिती भरण्याची प्रक्रिया करता येईल. २०२४-२५ या शैक्षणिक वर्षातील अकरावीच्या ऑनलाईन प्रवेश प्रकियेत मागील काही वर्षांमध्ये तीन ते चार महिना चालणारी प्रवेश प्रक्रिया ही आटोक्यात आणण्याचे प्रयत्न केले जाणार आहेत. यासाठी फेऱ्यांवर नियंत्रण आणले जाणार आहे. यामुळे नियोजित वेळेतच प्रवेश प्रकिया संपवली जाणार असून त्यासाठीचे नियोजन केले जात असल्याची माहिती माध्यमिक शिक्षण संचालक संपत सूर्यवंशी यांनी दिली.​

न्यायालयाचे आदेश


अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया ही गुणवत्तेच्या निकषावर करण्याचे न्यायालयाचे आदेश आहेत; मात्र या आदेशाला मागील काही वर्षांत डावलेले जाते. त्यासाठी प्रथम प्राधान्य फेरी राबवून हे आदेश पायदळी तुडवले गेले. प्रवेश फेन्ऱ्यांचे नियोजन करताना अल्पसंख्याक महाविद्यालयांच्या जागा प्रत्यार्पित करण्यासाठी सूट दिल्याने मराठी आणि गुणवत्ताधारी विद्याथ्यर्थ्यांवर वेळोवेळी अन्याय झाला असून यावेळी त्यात सुधारणा व्हाव्यात, अशी अपेक्षा आहे. यासाठी सिस्कॉम संस्थेने वेळोवेळी सूचना, अहवाल आणि अभिप्राय विभागाला दिले आहेत.​

The post appeared first on .
 
Top
AdBlock Detected

We get it, advertisements are annoying!

Sure, ad-blocking software does a great job at blocking ads, but it also blocks useful features of our website. For the best site experience please disable your AdBlocker.

I've Disabled AdBlock