‘टीईटी’साठी ऑनलाइन २१ हजार अर्ज, ५५ परीक्षा केंद्रांवर १० ला परीक्षा; १२० पोलिसांचा बंदोबस्त | Maha TET Admit Card Download

hanuman

Active member
Maha TET Admit Card Download

: दोन वर्षांपासून रखडलेल्या ‘टीईटी’ परीक्षेला (शिक्षक पात्रता परीक्षा) अखेर मुहूर्त लागला असून, राज्यभरात १० नोव्हेंबरला ही परीक्षा होणार आहे. या परीक्षेसाठी जिल्हयातील सुमारे २१ हजार ८७ भावी शिक्षकांनी ऑनलाइन अर्ज केला आहे. त्यासाठी जिल्ह्यात ५५ केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या जॉईन करा.

५५ परीक्षा केंद्रांवर १० ला परीक्षा; १२० पोलिसांचा बंदोबस्त

२०१३ पासून टीईटी परीक्षा सुरू करण्यात आल्या. मात्र काही तांत्रिक कारणांमुळे आणि ‘टीईटी’ च्या बोगस प्रमाणपत्रांमुळे दोन ते तीन वर्षांपासून ही परीक्षा रखडली होती. यामुळे परीक्षेबाबत भावी शिक्षकांमध्ये अस्वस्थता पसरली होती. मात्र ही रखडलेली परीक्षा आता नोव्हेंबरमध्ये होत आहे. राज्यात एकाच वेळी नोव्हेंबरमध्ये शिक्षक पात्रता परीक्षा होणार आहे. पेपर क्रमांक १ (पहिली ते पाचवी), पेपर क्रमांक २ (सहावी ते आठवी) होणार आहे. पेपर क्रमांक १ हा १० नोव्हेंबरला सकाळी साडेदहा ते दुपारी एक आणि पेपर क्रमांक २ हा दुपारी दोन ते साडेचार यावेळेत होणार आहे. परीक्षेसाठी झावश्यक असलेली सर्व तयारी ही शिक्षण विभागाने केली असल्याचे प्राथमिक शिक्षणाधिकारी नितीन बच्छीक यांनी सांगितले.​

Maha TET Exam Date


Maha TET Exam Date


परीक्षेचे नियोजन असे

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा १० नोव्हेंबरला होणार आहे. नाशिक जिल्ह्यात एकूण ५५ केंद्रांवर एकाच वेळी ही परीक्षा घेतली जाणार आहे. यात पेपर क्रमांक १ साठी २१ तर, पेपर क्रमांक २ साठी ३४ केंद्रे व आठ झोन आहेत. पेपर क्रमाक एक ८ हजार ६६४, तर पेपर क्रमांक २ साठी १२ हजार ४२३ परीक्षार्थी प्रविष्ट आहेत. परीक्षेसाठी आठ व एक राखीव असे नऊ झोनल अधिकारी, ५९ सहाय्यक परिरक्षक, ५९ केंद्र संचालक यांची नेमणूक केली आहे. परीक्षा सुरळीतत पार पाडावी, यासाठी आत झोनल अधिकारी तसेच १२० पोलिस कार्यरत असणार आहेत.​

The post appeared first on .
 
Top
AdBlock Detected

We get it, advertisements are annoying!

Sure, ad-blocking software does a great job at blocking ads, but it also blocks useful features of our website. For the best site experience please disable your AdBlocker.

I've Disabled AdBlock