होळीचे रंग काढण्यासाठी घरगुती उपाय! – Remove Holi colours from Face, skin and hair

hanuman

Active member
Remove Holi colours from Face, skin and hair


Remove Holi colours from Face, skin and hair In Marathi – The festival of colours, Holi is here! The special day is all about spreading joy and cheer. But, when it comes to Holi colours, it can take a toll on your skin and hair. If you get indulged in a burst of colours and are worried about your skin and hair, then don’t panic, as we have got you covered. Here’s our guide on how you can remove colours from your skin and hair Eaisly.​

Remove Holi colours from Face, skin and hair


Remove Holi colours from Face, skin and hair in Marathi




होळी म्हटलं की रंग आलेच. या रंगात रंगण्याचा मोह अनेकांना आवरत नाही. मग आपण मनसोक्त रंगाचा आनंद घेतो. मात्र काही रंग इतके जिद्दी असतात की ते त्वचेवरून जाणे कठीण होते. अशावेळी मोठा प्रश्न असतो तो म्हणजे हे रंग शरीरावरून काढण्याचा. तर आता रंग काढण्यासाठी त्वचा जोरजोरात घासू नका. तर हे घरगुती उपाय करुन बघा.

लिंबू आणि कोरफड असलेले क्लींजर चेहऱ्यावरील होळीचे रंग काढून टाकण्यासाठी उत्तम काम करते. खाज आणि जळजळ न होता रंगापासून मुक्त होण्यासाठी, नेहमी असे क्लींजरला पसंती द्या. तुम्ही निवडणाऱ्या क्लींजरमध्ये यापैकी दोन्ही किंवा एक घटक असणे आवश्यक आहे.

काकडीचा रस
होळीचे रंग काढण्याचा हा सर्वात परिणामकारक उपाय आहे. काकडीच्या रसात गुलाबजल आणि एक चमचा साईडर व्हिनेगर घालून मिश्रण तयार करा. रंग असलेल्या त्वचेवर ते लावा आणि काही वेळाने चेहरा धुवा. यामुळे रंग गायब होऊन त्वचा पूर्णपणे स्वच्छ होईल.

मुळ्याचा रस
होळीचे रंग काढण्यासाठी मुळ्याचा रस अतिशय फायदेशीर आहे. त्यासाठी मुळ्याच्या रसात बेसन आणि दूध मिसळा. त्याची घट्टसर पेस्ट तयार करा. ही पेस्ट चेहऱ्याला लावून सुकल्यानंतर चेहरा धुवा. यामुळे रंग निघण्याबरोबरच त्वचा मॉईश्चराईज होईल.

दुधात कच्च्या पपईचा गर
होळीचे रंग काढण्यासाठी तुम्ही हा उपायही करू शकता. यासाठी दुधात कच्च्या पपईचा गर घाला. त्यात मुलतानी माती आणि बदामाचे तेल घालून पेस्ट बनवा. चेहऱ्याला लावून २० मिनिटांनी चेहार स्वच्छ करा.

खोबरेल तेल – चेहऱ्यावर साबण लावण्यापूर्वी खोबरेल तेल लावा. तसेच चेहऱ्यावरील हट्टी रंग दूर होण्यास मदत होते. याशिवाय तेल आणि गव्हाचे पीठ लावूनही तुम्ही लिंबाचे तुकडे चेहऱ्यावर चोळू शकता.



केसाचे संरक्षण करा, जर रंग लागलाच तर – Remove Holi Colours From Hairs


होळीच्या रंगांपासून केसांचे संरक्षण करणे खूप महत्वाचे आहे. पण तरीही, जर रंग आला तर, अंड्यातील पिवळ बलक, दही किंवा कोरफड जेल सुमारे 45 मिनिटे केसांमध्ये ठेवा. नंतर आपले डोके सौम्य शैम्पूने धुवा. केसांमधून रंग काढून टाकण्याचा हा एक अतिशय प्रभावी मार्ग आहे.

The post appeared first on .
 
Top
AdBlock Detected

We get it, advertisements are annoying!

Sure, ad-blocking software does a great job at blocking ads, but it also blocks useful features of our website. For the best site experience please disable your AdBlocker.

I've Disabled AdBlock