Welcome To DailyEducation

DailyEducation is an open-source platform for educational updates and sharing knowledge with the World of Everyday students.

साताऱ्यात होणार MIDC चे प्रादेशिक कार्यालय, अनेक रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार! – Satara MIDC Bharti 2024

hanuman

Active member
Satara MIDC Bharti 2024

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या कामकाजात वाढत्या औद्योगीकरणामुळे मोठ्या प्रममाणात वाढ झाली आहे. बहुतांशी जिल्ह्यात दोन ते तीन जिल्ह्यांसाठी एमआयडीसीचे एकच कार्यालय असल्याने उद्योजकांची अडचण होत आहे. याची दखल घेऊन उद्योगमंत्री उदय सामंत यांनी निर्णय घेऊन सात जिल्ह्यांत प्रादेशिक कार्यालये स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये सातारा जिल्ह्याचा समावेश आहे. यासाठी ९२ पदांची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला आहे (Satara MIDC Bharti 2024). एमआयडीसीची दोन ते तीन जिल्ह्यांसाठी एकच कार्यालय असल्याने उद्योजकांच्या विविध कामांसाठी त्यांना कोल्हापूर प्रादेशिक कार्यालयात जावे लागत होते. त्यामुळे वेळ आणि पैशाचा अपव्यय होत होता. साताऱ्यात एमआयडीसीचे प्रादेशिक कार्यालय व्हावे, यासाठी जिल्ह्यातील उद्योजकांनी यापूर्वीच्या उद्योगमंत्र्यांकडे सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवला होता. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत

Satara MIDC Bharti 2024


मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशननेही पाठपुरावा ठेवला होता. अखेर या पाठपुराव्याला यश आले आहे. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आज औद्योगिक विकास महामंडळाची सात प्रादेशिक कार्यालये सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये सातारा, सोलापूर, बारामती, नगर, जळगाव, अकोला व चंद्रपूरचा समावेश आहे. या कार्यालयांचा आकृतिबंध दहा महिन्यांच्या आत वित्त विभागाकडून मंजूर करून घेतला जाणार आहे, तसेच या कार्यालयांसाठी ९२ पदांची निर्मिती केली जाणार आहे. त्याचा खर्चही औद्योगिक विकास महामंडळाच्या निधीतून भागविण्याची सूचना केली आहे विविध पदांमध्ये प्रादेशिक अधिकारी सात, व्यवस्थापक पाच क्षेत्र व्यवस्थापक एक, उपरचनाकर सात, प्रमुख भूमापक सात, सहायक क्षेत्र व्यवस्थापक १४, सहायक १७, लिपिक टंकलेखक १७, वाहनचालक सात, शिपाई १० पदांचा समावेश आहे. साताऱ्यात प्रादेशिक कार्यालय करण्याचा निर्णय झाल्याने येथील उद्योजकांची अनेक दिवसांपासूनच मागणी पूर्ण झाली आहे.​

The post appeared first on .
 
Back
Top
AdBlock Detected

We get it, advertisements are annoying!

Sure, ad-blocking software does a great job at blocking ads, but it also blocks useful features of our website. For the best site experience please disable your AdBlocker.

I've Disabled AdBlock