शिक्षण विभागात होणार ज्येष्ठतेनुसार पदभरती! – Maharashtra Education Department Bharti 2023

hanuman

Active member
Important.jpg

Maharashtra Education Department Bharti 2023


There were currently seven in-charge supervisors working in the Municipal Education Department. Four of them have been suspended. As a result, the services will fill the posts of seven supervisors according to seniority. Meanwhile, it has come to light that complaints about private schools have increased due to vacancies. Municipal Education Department has 105 schools; Also private schools in the city have to be controlled. Municipalities and private schools need to be provided information to the government from time to time, improving the quality of schools, collecting information, etc. should be done immediately through the municipal primary department from time to time.​



महापालिका शिक्षण विभागात सध्या सात प्रभारी पर्यवेक्षक कार्यरत होते. त्यापैकी चार जणांना कार्यातून निरस्त केले आहे. परिणामी, सेवा ज्येष्ठतेनुसार सात पर्यवेक्षकांचे पद भरणार आहेत. दरम्यान, रिक्त पदांमुळे खासगी शाळांविषयीच्या तक्रारी वाढल्या असल्याची वस्तुस्थिती समोर आली आहे. महापालिका शिक्षण विभागाच्या १०५ शाळा आहेत; तसेच शहरातील खासगी शाळांवर नियंत्रण ठेवावे लागते. महापालिका व खासगी शाळा यांची माहिती वेळोवेळी सरकारला लागणारी माहिती देणे, शाळांची गुणवत्ता वाढविणे, माहिती संकलित करणे आदी कामे महापालिका प्राथमिक विभागामार्फत वेळोवेळी तत्काळ करावी लागतात.



महापालिके अंतर्गत प्राथमिक शिक्षण विभाग कार्यरत आहे. या विभागांतर्गत महापालिका व खासगी शाळा येतात. सुमारे ६७५ शाळांचे शैक्षणिक कामकाजाच्या सोयीच्या दृष्टीने काही शिक्षकांना तात्पुरत्या स्वरूपात पर्यवेक्षकपदाचा अतिरिक्त पदभार दिला होता. त्यावेळी मुख्याध्यापकांतून अनेकांनी पदोन्नती नाकारली होती. काही शिक्षकांनी घरगुती अडचणींमुळे पद नको म्हटले. त्यामुळे आठ शिक्षकांवर प्रभारी पर्यवेक्षकपदाचा भार दिला होता. ते मागील १० वर्षापासून कामकाज पाहत आहे. आता मात्र चार जणांना पर्यवेक्षकपदाचा दिलेला अतिरिक्त पदभार आयुक्ताच्या आदेशान्वये निरस्त केला आहे. त्यामुळे अनेक कामे खोळंबली आहेत.



पर्यवेक्षकांची कामे
शिक्षण समितीच्या बैठकीत पर्यवेक्षकांच्या कर्तव्य ठरवून देण्यात आले होते. महापालिककडे ८ पर्यवेक्षक आहेत. त्यांच्याकडे शहरातील महापालिकेच्या १०५ शाळांवर नियंत्रण ठेवणे, गुणवत्त वाढ करणे यासह खासगी व अनुदानित अशा सर्व शाळांचा समावेश आहे. शहरातील १०५ व ८८ इमारतींची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. याबरोबरच शाळांची वार्षिक तपासणी, अहवाल सादर करणे, शाळांच्या तक्रारींचा पंच महापालिकानामा करणे, खासगी शाळांमध्ये आरटीई अंर्तगत होणाऱ्या २५ टक्के प्रवेशाची माहिती घेणे, मुख्याध्यापकांसाठी प्रशिक्षणाचे नियोजन व नियंत्रण करणे. गोपनीय अहवाल सादर करणे, शाळेचे साहित्य वाटप झाले की नाही याची पाहणी करणे, गुणवत्ता वाढीसाठी विविध उपक्रम राबवणे. शाळेतील पोषण आहार, शाळेच्या वेळापत्रकानुसार तास घेणेण विभागात क्षेत्रीय कार्यालयानुसार पदनिर्मिती केली जाणार आहे. नियमानुसार; तसेच सरकारकडून वेळोवेळी प्राप्त झालेल्या शासन निर्णयानुसार ही नियुक्ती करण्याचे नियोजन आहे.



महापालिका शिक्षण विभागातील प्राथमिक विभागाच्या कामकाजात सुसूत्रता येण्यासाठी मुख्याध्यापकांच्या जेष्ठतेनुसार पदोन्नतीतून पर्यवेक्षकांच्या ७ रिक्त जागा भरल्य जाणार आहेत. याबाबत विभागाची पदोन्नती समितीची लवकरच बैठक घेतली जाणार आहे. ही रिक्त पदे तातडीने भरण्याच्या आयुक्तांच्या सूचना आहेत.



– Maharashtra School Education Department is planning to impose a new rule for 20 percent of the posts in the education officer cadre to be filled by nomination, while 80 percent of the posts are to be filled by promotion. 50% of the posts of Deputy Education Officers will be filled through direct service and the remaining 50% through promotion and departmental competitive examination. The School Education Department has issued two separate notifications on 28th December 2022 announcing the new service entry rules for the posts of Education Officer and Deputy Education Officer cadre. MOre update about Maharashtra Education Department Bharti 2023 at below

शालेय शिक्षण विभागातील शिक्षणाधिकारी व उपशिक्षणाधिकारी संवर्गातील पदे भरण्याबाबत नवीन नियम जाहीर करण्यात आले आहेत. शिक्षणाधिकारी संवर्गातील २० टक्के पदे नामनिर्देशाने, तर ८० टक्के पदे पदोन्नतीने भरली जाणार आहेत. उपशिक्षणाधिकाऱ्यांची पदे ५० टक्के सरळसेवेने व उर्वरित ५० टक्के पदे पदोन्नती व विभागीय स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून भरण्यात येणार आहेत. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत

Education Department Bharti 2023


Maharashtra Education Department Bharti 2023


Shikshan Vibhag Bharti 2023


शालेय शिक्षण विभागाने महाराष्ट्र शिक्षण सेवेतील शिक्षणाधिकारी गट अ ( प्रशासन शाखा) पदाचे सेवा प्रवेश नियम जाहीर केले आहेत. शिक्षणाधिकारी पदासाठी सांविधानिक विद्यापीठातील कोणत्याही शाखेची पदवी किंवा शासनाने तिच्याशी समतुल्य असल्याचे घोषित केलली अन्य कोणतीही शैक्षणिक अर्हता धारण करणे आवश्यक आहे. शिक्षणाधिकारी व तत्सम पदांमध्ये शिक्षणाधिकारी (प्राथमिक, माध्यमिक) शिक्षणाधिकारी (योजना), शिक्षण निरीक्षक (बृहन्मुंबई), साहाय्यक संचालक, साहाय्यक आयुक्त, सहसचिव, विभागीय शिक्षण मंडळ, साहाय्यक संचालक ( राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद), संचालक, प्रशासन अधिकारी, इत्यादी पदांचा समावेश आहे. तसेच प्रशासन अधिकारी किंवा शिक्षणाधिकारी , महानगरापालिका शिक्षण मंडळ, प्रशिक्षण प्रमुख, समन्वयक, प्रकल्प समन्वयक, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, वरिष्ठ प्रकल्प संचालक ( शिक्षण) सारथी, ही पदे प्रतिनियुक्तीने भरण्यात येणार आहेत.

शिक्षणाधिकारी संवर्गातील पदांपैकी २० टक्के पदे नामनिर्देशाने तर, ८० टक्के पदे पदोन्नतीने भरली जाणार आहेत. त्यामुळे सध्या शिक्षण विभागात उपशिक्षणाधिकारी व तत्सम पदांवर कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांना पदोन्नतीद्वारे शिक्षणाधिकारी पदावर नियुक्तीची अधिकची संधी मिळणार आहे.
राज्य शासनाच्या शिक्षण विभागातील उपशिक्षणाधिकारी संवर्गातील पदांवरील नियुक्तीसंबंधीचे सेवाप्रवेश नियमही जाहीर केले आहेत. या पदासाठीही कोणत्याही शाखेचे पदवीधारक पात्र ठरणार आहेत. उपशिक्षणाधिकारी संवर्गातील ५० टक्के पदे नामिनिर्देशनाने भरण्यात येणार आहेत. तर, ३० टक्के पदे पदोन्नतीने आणि २० टक्के पदे विभागीय स्पर्धा परीक्षेद्वारे भरली जाणार आहेत. शालेय शिक्षण विभागाने २८ डिसेंबर २०२२ रोजी दोन स्वतंत्र अधिसूचना काढून शिक्षणाधिकारी व उपशिक्षणाधिकारी संवर्गातील अधिकारी पदांचे नवीन सेवा प्रवेश नियम जाहीर केले आहेत.​

The post appeared first on .
 
Top
AdBlock Detected

We get it, advertisements are annoying!

Sure, ad-blocking software does a great job at blocking ads, but it also blocks useful features of our website. For the best site experience please disable your AdBlocker.

I've Disabled AdBlock