लोकसेवा आयोगातर्फे २४ पदांसाठी लवकरच भरती, आयोगातर्फे ही अट शिथिल करण्याची शिफारस करण्यात येईल – Goa PSC Recruitment 2024

hanuman

Active member
goa-PSC-logo.png

Goa PSC Recruitment 2024 Update


: गोवा लोकसेवा आयोगातर्फे (जीपीएससी) विविध खात्यांतील २४ पदांची भरती लवकरच केली जाणार आहे. या जागा भरण्यासाठी आयोगातर्फे नुकतीच जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या जागांसाठी इच्छुकांना आयोगाच्या संकेस्थळावर ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरावे लागणार आहेत. २४ पैकी १९ जागांवर थेट, तर ५ जागांवर बदली प्रतिनियुक्तीद्वारे (ट्रान्सफर बाय डेप्युटेशन) भरती करण्यात येणार आहे, असे आयोगाने जाहिरातीत म्हटले आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत

थेट पद्धतीने भरण्यात येणाऱ्या १९ जागांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख २४ मे २०२४ असून बदली प्रतिनियुक्तीच्या पाच जागांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख २४ जून २०२४ आहे. यानुसार गोवा वैद्यकीय महविद्यालयात सहायक प्राध्यापक म्हणून ५ जागांवर बदली प्रतिनियुक्तीद्वारे भरती केली जाईल. मानसोपचार आणि मानवी वर्तन संस्थेत (आयपीएचबी) दोन मानस शास्त्रज्ञांची थेट पद्धतीने भरती होणार आहे.

याशिवाय आरोग्य संचालनालयात दोन, आर्किटेक्चर महाविद्यालयात एक, अभियांत्रिकी महाविद्यालय दहा, शासकीय तंत्रनिकेतनमध्ये एक, महिला आणि बालकल्याण खात्यात दोन, उच्च शिक्षण खात्यात एका जागेवर थेट पद्धतीने भरती होणार आहे. अर्ज केलेल्या व्यक्तींची आयोगातर्फे मुलाखत घेतली जाणार आहे. ‘अ’ गटातील जागांसाठी कोकणीचे ज्ञान असणे आवश्यक आहे. मात्र पात्र उमेदवार न मिळाल्यास आयोगातर्फे ही अट शिथिल करण्याची शिफारस करण्यात येईल, असे जाहिरातीत म्हटले आहे.​


Goa PSC Recruitment 2024

सार्वजनिक बांधकाम खात्यातील नोकर भरती वादात सापडल्यानंतर आता राज्य सरकारने राज्य कर्मचारी भरती आयोगाच्या कामाला गती दिली आहे. ‘क’ वर्गीय पदे भरण्यासाठी या आयोगाकडून जाहिरात दिल्यानंतर घ्यावयाच्या संगणकीकृत लेखी परीक्षेसाठी प्रश्नावली तयार करण्याचे काम सध्या हाती घेण्यात आले आहे. विशेष म्हणजे, परीक्षेनंतर अर्ध्या तासातच निकाल जाहीर केला जाणार आहे. या आयोगाचे सदस्य मिनिनो डिसोझा यांनी दिलेल्या माहितीनुसार, डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात सुमारे 200 पदे भरण्यासाठी लेखी परीक्षा घेण्याचा आयोगाचा विचार आहे. खरे तर ऑक्टोबरमध्येच अशी परीक्षा घेण्यात येणार होती. मात्र, विविध खात्याकडून पदांची मागणी करणाऱ्या विनंती उशिरा पोहोचल्याने आयोगाने त्यावरील प्रक्रिया पुढे ढकलली होती. पाटो-पणजी येथील स्पेसीस इमारतीमधील या आयोगाचे कार्यालय सध्या गजबजलेले आहे. लेखी परीक्षा घेण्यासाठी प्रश्नावली तयार करण्याचे काम एका स्वतंत्र यंत्रणेकडे आयोगाने सोपवले आहे. त्या यंत्रणेकडून डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात प्रश्नावली तयार होऊन मिळाल्यानंतर लेखी परीक्षेची तयारी आयोग करणार आहे. तत्पूर्वी या पदांसाठी जाहिरात दिली जाणार आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत

खातेनिवडीची उमेदवारांना संधी

राज्य कर्मचारी भरती आयोग पदे भरतीसाठी गुणवत्ता यादी तयार करणार आहे. समजा, कनिष्ठ लिपिक पदासाठी आयोगाने लेखी परीक्षा घेतली तर त्याच्या लेखी परीक्षेची गुणवत्ता यादी तयार केली जाणार आहे. त्यात पात्र ठरणाऱ्या उमेदवारांना कोणत्या खात्यात सेवा बजावायची आहे, त्या पर्यायाचा निवड करण्याची संधी दिली जाणार आहे.

अर्ध्या तासातच निकाल

साबांखा भरती प्रक्रियेतील निकाल जाहीर करण्यास पाच महिन्यांचा कालावधी लागल्याने सध्या आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. त्यामुळे राज्य कर्मचारी भरती आयोगाने लेखी परीक्षा घेतली की परीक्षा संपल्यावर अर्ध्या तासातच निकाल जाहीर केला जाईल, अशी संगणकप्रणाली वापरली जाणार आहे. आयोगाच्या बैठकीत तसा निर्णय घेण्यात आला आहे.




पणजी, राज्य सरकार यापुढील कर्मचारी भरती ही राज्य कर्मचारी भरती आयोगाच्या माध्यमातूनच करणार आहे. केवळ खात्यांच्या माध्यमातून सुरु असलेली भरती पूर्ण करण्यासाठी तीन महिन्यांची मुदतवाढ दिली आहे, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, या मुदतवाढीमुळे यापुढील कर्मचारी भरती ही खात्यांच्या माध्यमातूनच होणार, असा गैरसमज पसरला आहे. वस्तुस्थिती तशी नाही.



खात्यांच्या माध्यमातून कर्मचारी भरतीचे काही टप्पे उरले आहेत. ते पूर्ण करण्यासाठी त्यांना आणखीन तीन महिन्यांचा कालावधी दिला आहे. विविध खात्यांनी आपल्याला लागणाऱ्या मनुष्यबळाची मागणी आयोगाकडे केली आहे. आयोग लवकरच जाहिराती देऊन ती पदे भरण्यासाठी अर्ज मागवणार आहे. खात्यांचा हस्तक्षेप या कर्मचारी भरतीत नसेल. गोवा लोकसेवा आयोगाच्या धर्तीवर हा कर्मचारी भरती आयोग स्वतंत्रपणे काम करणार आहे. सध्या सुरू असलेली कर्मचारी भरती खात्यांच्या माध्यमातून सुरू होणार आहे तर नवीन भरती आयोगाच्या माध्यमातून केली जाणार आहे.​



मुख्यमंत्री सावंत यांनी सांगितले, की दिल्लीतील गोवा सदन मध्ये पद भरती करण्यासाठी कोकणी सक्तीची करण्यात आली आहे. याआधी कोकणी सक्ती शिथिल करण्यात आली होती. यावर सक्ती कधी शिथिल केली आणि किती पदे भरण्यात येतील याबाबत विचारले असता ती माहिती आपल्याकडे आता उपलब्ध नाही, असे त्यांनी सांगितले. २ कोटी १३ लाख रुपयांच्या माहिती व प्रसिद्धी खात्याच्या खर्चाला कार्योत्तर मंजरी देण्यात आली आहे. झुआरी पुलाच्या छायाचित्रणाच्या ६५ हजार रुपयांच्या खर्चाला कार्योत्तर मंजुरी देण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालये आणि महिला बालकल्याण खात्याने कोविड काळात केलेल्या खर्चाला कार्योत्तर मंजुरी देण्यात आली.​





: The CBRT/Screening Test for the Junior Scale Officer, Associate Professor, Assistant Director, Assistant Public Prosecutor, Tutor, Junior Ophthalmic Surgeon, Planning Officer, Medical officer, Assistant Agriculture Officer positions will be conducted by the Goa Public Service Commission on 20/02/2022. Further details are as follows:-​

GPSC CBRT/ Screening Test

गोवा लोकसेवा आयोगाकडून 20/02/2022 रोजी “कनिष्ठ स्तर अधिकारी, सहयोगी प्राध्यापक, सहायक संचालक, सहायक सरकारी वकील, शिक्षक, कनिष्ठ नेत्र शल्यचिकित्सक, नियोजन अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, सहायक कृषी अधिकारी” पदांसाठी CBRT/स्क्रीनिंग चाचणी घेतली जाणार आहे. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

new-flash-gif-animation.gif




  • पदाचे नाव – कनिष्ठ स्तर अधिकारी, सहयोगी प्राध्यापक, सहायक संचालक, सहायक सरकारी वकील, शिक्षक, कनिष्ठ नेत्र शल्यचिकित्सक, नियोजन अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, सहायक कृषी अधिकारी
  • CBRT/स्क्रीनिंग चाचणी तारीख – 20/02/2022

GPSC Screening Test | GPSC Computer Based Recruitment Test


Goa PSC Recruitment CBT


Candidates should compulsory report at the venue, within the reporting time mentioned on their hall ticket. The candidates are requested to check their email for further details and those who cannot download their hall ticket by 14/02/2022, should personally report to the office of the Commission from 15/02/2022 to 17/02/2022, during office hours along with their Identity proof to collect their hall ticket. Candidates without Hall Ticket will not be allowed to answer the CBRT/ Screening Test. The candidates should make their own arrangements to reach the center within the reporting time. Syllabus for the CBRT/ Screening Test is already uploaded on Commission’s website.​




The post appeared first on .
 
Top
AdBlock Detected

We get it, advertisements are annoying!

Sure, ad-blocking software does a great job at blocking ads, but it also blocks useful features of our website. For the best site experience please disable your AdBlocker.

I've Disabled AdBlock