विधानसभा निवडणुकीत महायुती सरकारला महिलांनी अर्थात लाडक्या बहिणींनी मोठ्या प्रमाणात मतदान केल्याने पुन्हा एकदा राज्यात महायुतीचे सरकार आले आहे. या लाडकी बहीण योजनेसाठी महायुतीने आतापर्यंत अर्थात ६ महिन्यांत सुमारे १७ हजार कोटी रुपये वितरित केल्याची बाब माहिती अधिकारातून उघडकीस आली आहे. राज्यात सन २०२४-२५ च्या अर्थसंकल्पामधून लाडकी बहीण योजनेसाठी किती कोटींचा निधी खर्च झाला, अशी माहिती वॉचडॉग फाऊंडेशनचे ट्रस्टी तथा माहिती अधिकार कार्यकर्ता अॅड. गॉडफ्रे पिमेंटा यांनी महिला व बाल विकास विभाग यांच्याकडे अर्ज केला होता, त्या अर्जाला उत्तर देताना महिला व बाल विकास विभागाने त्यांना ही माहिती दिली. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत
लोकसभा निवडणुकीच्या अपयशानंतर राज्यात महायुती सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अमलात आणली. या योजनेंतर्गत प्रत्येक लाभार्थी महिलेच्या खात्यात १५०० रुपये जमा करण्यात येत आहेत. महायुती सरकारने २०२४- २०२५ साठी १० हजार कोटी रुपयांची तरतूद केली. हेही पैसे कमी पडतील म्हणून पुरवणी मागणीनुसार सन २०२४-२०२५ साठी लाडकी बहीण योजनेसाठी आणखी २५ हजार कोटी अशाप्रकारे एकूण ३५ हजार कोटी रुपयांची अतिरिक्त तरतूद केली आहे. यामुळे भविष्यात राज्यातील विकास कामांना खीळ बसण्याची भीती गॉडफ्रे पिमेंटा यांनी व्यक्त केली. करदात्यांच्या पैशांतून सरकार अशाप्रकारे उधळपट्टी करत असेल तर ती सर्वसामान्य नागरिकांची लूट आहे. प्रत्येक वर्षी आम्ही सरकारला कर भरतो. आणि आमच्या या करांचा सरकार असा दुरुपयोग करत असेल तर आम्ही कर भरावा की नाही, असा प्रश्न आता निर्माण झाला आहे, असे गॉडफ्रे पिमेंटा म्हणाले.
लाडक्या बहिणींच्या नावाने महायुतीने निवडणुकीआधी केलेली उधळपट्टी ही जगजाहीर आहे. या निमित्ताने राज्यातील तिजोरी रिकामी करण्याचा प्रयत्न आहे. यामुळे आता निवडून आल्यानंतर महायुती सरकारने राज्यातील जनतेला दिलेली आश्वासने कशी पूर्ण होतील, याकडे आता आमचे लक्ष राहणार आहे, असे काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी म्हटले आहे.

The post appeared first on .