लाडक्या बहिणींना एप्रिलपासून दरमहा २,१०० रुपये मिळणार? – Ladki Bahin 2100 Payment Update

hanuman

Active member
Ladki Bahin 2100 Payment Update

महायुती सरकारने लोकसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली. तीन महिन्यांतच सोलापूर जिल्ह्यातील ११ लाख महिलांसह राज्यातील अडीच कोटी महिलांनी योजनेसाठी अर्ज केले आणि राज्य सरकारने त्यांना नोव्हेंबरअखेरचा लाभ विधानसभेच्या आचारसंहितेपूर्वीच दिला (Ladki Bahin 2100 Payment Update). निवडणुकीत त्यांनी लाडक्या बहिणींना २,१०० रुपये देण्याची ग्वाही दिली. महिलांच्या जीवनात आर्थिक स्थैर्य निर्माण करून त्यांच्या गरजा पूर्ण करणं हा या योजनेचा उद्देश आहे. महिलांना त्यांच्या कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी तसेच स्वनिर्णयाची संधी मिळवण्यासाठी हा निधी उपयोगी ठरेल. राज्य सरकारचा हा निर्णय महिलांसाठी सन्मानजनक व प्रेरणादायक आहे. यामुळे महिलांच्या आयुष्यात सकारात्मक बदल होण्याची अपेक्षा आहे. “लाडक्या बहिणींचा सन्मान, सबलीकरणासाठी पुढचे पाऊल!” असे म्हणत हा उपक्रम महिलांच्या विकासाला नवी दिशा देईल.



Ladki Bahin 2100 Payment Update




याचा मोठा फायदा महायुती सरकारला झाला. याची अंमलबजावणी आता अर्थसंकल्पीय अधिवेशनात तरतूद झाल्यावर २१ एप्रिलपासून होण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात महाविकास आघाडी सरकारने लाडक्या बहिणींना तीन हजार रुपये देण्याचा शब्द दिला होता; मात्र ज्या महायुती सरकारने योजना आणली व १ जुलैपासून दरमहा १,५०० रुपये दिले त्याच सरकारवर लाडक्या बहिणींनी विश्वास दाखविला. त्याचवेळी महायुती सरकारने आमचे सरकार पुन्हा सत्तेत आल्यास लाडक्या बहिणींना दरमहा २,१०० रुपये देण्याचे वचन दिले. त्याला लाडक्या बहिणींनी साथ दिल्याचे निकालावरून स्पष्ट झाले. राज्यातील २८८ आमदारांमध्ये तब्बल १८७ आमदारांना एक लाखांहून अधिक मते मिळाली आहेत.

The post appeared first on .
 
Top
AdBlock Detected

We get it, advertisements are annoying!

Sure, ad-blocking software does a great job at blocking ads, but it also blocks useful features of our website. For the best site experience please disable your AdBlocker.

I've Disabled AdBlock