महाराष्ट्र दिनानिमित्त द्या मराठमोळ्या शुभेच्छा! – Maharashtra Din Quotes in Marathi – Maharashtra din 2024

hanuman

Active member
Maharashtra Din Quotes in Marathi – “महाराष्ट्र दिन” हे दिवस प्रत्येक वर्षी १ मे रोजी महाराष्ट्र राज्यात उत्साहात साजरा केला जातो. ह्या दिवशी १९६० मध्ये महाराष्ट्राची स्वतंत्र राज्याची स्थापना झालेली आहे, याची स्मृती आपल्या मनात ठेवतो. ह्या दिवशी आपल्या मराठी भाषेच्या आणि संस्कृतीच्या वैभवाची आठवण करण्याचा आणि राज्याच्या समृद्ध वारसाची ओळख करण्याचा प्रयत्न केला जातो. ह्या दिवशीच आंतरराष्ट्रीय कामगार दिनही साजरा केला जातो. १९६० मध्ये या दिवशी महाराष्ट्र आणि गुजरात, या दोन्ही नवीन राज्यांची स्थापना झाली. मुंबई हे शहर मराठी भाषा बोलणार्‍या अनेक लोकांचे निवासस्थान असल्याने, हे शहर महाराष्ट्र राज्यात आले.





बहु असोत सुंदर संपन्न की महा…
प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा…
जय महाराष्ट्र महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

भीती न आम्हा तुझी मुळी ही गडगडणाऱ्या नभा
अस्मानाच्या सुलतानीला जवाब देती जीभा
सह्याद्रीचा सिंह गर्जतो, शिवशंभू राजा
दरीदरीतून नाद गुंजला, महाराष्ट्र माझा





महान संतांची जन्मभूमी, विज्ञानाने जेथे केली प्रगती प्रेम, आदर, स्नेह आणि

माणुसकी हीच आहे आमची संस्कृती. महाराष्ट्र दिनाच्या मनापासून शुभेच्छा.. जय महाराष्ट्र..!





जन्मलो ज्या मातीस ती माती मराठी…
गुणगुणलो जे गीत गीत मराठी…
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

महाराष्ट्राची यशो गाथा,
महाराष्ट्राची शौर्य कथा,
पवित्र माती लावू कपाळी,
धरणी मातेच्या चरणी माथा
जय महाराष्ट्र
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

अभिनान आहे मराठी असल्याचा
माझ्या मातीचा माझ्या महाराष्ट्राचा
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !

जय जय महाराष्ट्र माझा..
गर्जा महाराष्ट्र माझा..
महाराष्ट्रदिन
निमित्त आपणास
हार्दिक शुभेच्छा..!

दरी दरीतून नाद गुंजला,
महाराष्ट्र माझा,
जय जय महाराष्ट्र माझा..
गर्जा महाराष्ट्र माझा..
महाराष्ट्रदिन निमित्त हार्दिक शुभेच्छा..!



तू माझी नसली तरी,
मी तुझाच आहे..
कारण तू
महाराष्ट्राची आहे,
आणि महाराष्ट्र माझा आहे…
जय महाराष्ट्र!



माझा माझा महाराष्ट्र माझा,
मनोमनी वसला शिवाजी राजा,
वंदितो या भगव्या ध्वजा,
गर्जतो, गर्जतो महाराष्ट्र माझा…
गर्जा महाराष्ट्र माझा…!



भीती ना आम्हा तुझी मुळीही गडगडणाऱ्या नभा,
आस्मानाच्या सुलतानीला,
जवाब देती जीभा..
सह्याद्रीचा सिंह गर्जतो,
शिवशंभू राजा..
दरीदरीतून नाद गुंजला,
महाराष्ट्र माझा..
जय जय महाराष्ट्र माझा…
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!



“अखंड राहो सदा हे शिवराष्ट्र
जयघोष करूया जय जय जय जय महाराष्ट्र.”
“अभिमान आहे मराठी असल्याचा,
गर्व आहे महाराष्ट्रीय असल्याचा….
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा”



“दगड झालो ना तर सह्याद्रीचा होईल,
माती झालो तर महाराष्ट्राची होईल,
तलावर झालो ना तर भवानी मातेची होईल,
आणि मानव जन्म मिळाला तर महाराष्ट्रातच होईल.”

The post appeared first on .
 
Top
AdBlock Detected

We get it, advertisements are annoying!

Sure, ad-blocking software does a great job at blocking ads, but it also blocks useful features of our website. For the best site experience please disable your AdBlocker.

I've Disabled AdBlock