बृहन्मुबंई महानगरपालिकेतील ‘कनिष्ठ लघुलेखक ‘ पदांकरिता पडताळणी वेळापत्रक जाहीर, डाउनलोड करा अर्ज नमुना । BMC Document Verification Schedule

hanuman

Active member
BMC Document Verification Schedule 2024

BMC Document Verification Schedule 2024


: To fill up 226 vacancies in Brihanmubai Municipal Corporation in the category of ‘Junior Stenographer’, multiple choice objective online examination has been conducted on 22.12.2023 and the result has been published on 13.03.2024. In respect of verification of educational certificates/documents, the candidates in the provisional shortlist circulated are directed to appear for verification of all their original educational certificates and other necessary documents/certificates between 08.04.2024, 10.04.2024 and 12.04.2024. Know More about BMC Document Verification Schedule, List Of Documents Required For BMC Document Verification Process at below​

बृहन्मुबंई महानगरपालिकेतील ‘कनिष्ठ लघुलेखक (इं-नि-म)’ या संवर्गातील 226 रिक्त पदे भरण्याकरीता दि. 22.12.2023 रोजी बहुपर्यायी वस्तुनिष्ठ ऑनलाईन परीक्षा घेऊन, दि. 13.03.2024 रोजी निकाल प्रसिध्द करण्यात आला आहे. शैक्षणिक प्रमाणपत्रे / कागदपत्रांच्या पडताळणीसापेक्ष प्रसारित करण्यात आलेल्या तात्पुरत्या निवडयादीमधील उमेदवारांना खालील तक्ता-अ येथे नमूद केल्याप्रमाणे त्यांच्या सर्व मूळ शैक्षणिक प्रमाणपत्रे तसेच इतर आवश्यक कागदपत्रांच्या / प्रमाणपत्रांच्या पडताळणीकरीता दि.08.04.2024, दि. 10.04.2024 व दि. 12.04.2024 या कालावधीमध्ये उपस्थित राहण्याचे निर्देश देण्यात येत आहेत. उमेदवाराने खालील तक्त्यात नमुद केलेल्या वेळेस व दिनांकादिवशीच पडताळणीकरीता उपस्थित राहणे बंधनकारक आहे. पडताळणीकरीता अनुपस्थित राहणा-या उमेदवारांचे नाव निवडयादीमधून कमी करण्यात येईल, याची कृपया नोंद घ्यावी.
  • newicon.gif

BMC Document Verification Schedule


BMC Document Verification Schedule


List Of Documents Required For BMC Document Verification Process


कागदपत्रे पडताळणीकरीता उपस्थित राहणा-या उमेदवारांकरीता आवश्यक सूचना :
1. सोबत जोडण्यात आलेल्या विहित नमुन्यातील अर्जामध्ये माहिती भरुन, सदर अर्ज सोबत आणणे आवश्यक आहे.
2. शालांत परीक्षा गुणपत्रक व शालांत परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.
3. शालांत परीक्षा प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.
4. सर्व सेमीस्टरच्या गुणपत्रिकांसह, पदवी परीक्षा गुणपत्रक व पदवी परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.
5. मान्यताप्राप्त विद्यापिठाचे प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण प्रमाणपत्र तसेच टक्केवारी नमुद करणारे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.
6. मराठी व इंग्रजी टंकलेखनाची विहित गतीची परीक्षा उत्तीर्ण असल्याचे शासनाचे व्यावसायिक प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.
7. मराठी व इंग्रजी लघुलेखनाची विहित गतीची परीक्षा उत्तीर्ण असल्याचे शासनाचे व्यावसायिक प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.
8. ‘एम.एस.सी.आय.टी’ परीक्षा उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र किंवा शासन निर्णय क्र. मातंस/2012/प्र.क्र.277/39 दि.04.02.2013 अन्वये दिलेल्या निर्देशानुसार संगणक / माहिती तंत्रज्ञान विषयक परीक्षा उत्तीर्ण केल्याचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. 9. सक्षम प्राधिका-यांनी दिलेले जातीचे प्रमाणपत्र व असल्यास, जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.
10. जन्मदिनांक समाविष्ट असलेले शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्मदाखला सादर करणे आवश्यक आहे.
11. ‘कनिष्ठ लघुलेखक (इं-नि-म)’ या संवर्गातील रिक्त पदे भरण्याकरीता प्रसारित केलेल्या क्र. एमपीआर/3130 दि.11.08.2023 अन्वयेच्या जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या अर्हतेनुसार, उमेदवाराने धारण केलेल्या सर्व शैक्षणिक आणि इतर आवश्यक प्रमाणपत्रे तसेच सामाजिक आरक्षणांतर्गत आवश्यक असलेली सर्व मूळ प्रमाणपत्रे पडताळणीसाठी सादर करणे आवश्यक आहेत.


The post appeared first on .
 
Top
AdBlock Detected

We get it, advertisements are annoying!

Sure, ad-blocking software does a great job at blocking ads, but it also blocks useful features of our website. For the best site experience please disable your AdBlocker.

I've Disabled AdBlock