Documents Required For BARTI Exam Verification
Documents Required For BARTI Exam Verification: डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, (बार्टी) पुणे मार्फत ऑनलाईन प्रशिक्षण संस्था विकल्प निवड पोर्टलद्वारे, विद्यार्थ्यांना प्रशिक्षण संस्था निवडीकरीता विकल्प उपलब्ध करून देण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी त्यांच्या इच्छेनुसार/पसंतीनुसार योजना निहाय नामनिर्देशित (Empanel) केलेल्या प्रशिक्षण संस्थेची निवड केली आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांनी पसंती दिलेल्या प्रशिक्षण संस्थाकडे जाऊन मूळ कागदपत्रे तपासणी करण्याबाबत ईमेल व confirmation Slip द्वारे कळविण्यात येत आहे. यामध्ये MPSC (State Service, MES, JMFC, Group B and C), IBPS तसेच पोलीस व मिलिटरी भरती पूर्व प्रशिक्षणासाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांनी प्राप्त ईमेल व confirmation Slip नुसार संबधीत प्रशिक्षण संस्थेकडे दिनांक २१/११/२०२४ पासून दिनांक २७/११/२०२४ पर्यंत कागदपत्राची तपासणी करणे बंधनकारक आहे.
ज्या विद्यार्थ्यांनी दिनांक २७/११/२०२४ पर्यंत कागदपत्रे तपासणी केली नसेल अशा विद्यार्थ्याची निवड रद्द करून प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना संधी देण्यात येणार आहे. याबाबत कोणतेही निवेदन किंवा अर्ज स्वीकारण्यात येणार नाही. सन २०२४-२५ करिता निवड झालेल्या ज्या विद्यार्थ्यांनी यापूर्वी UPSC/MPSC/IBPS/ Police and Military Bharti व fellowship या योजनांचा लाभ घेतलेला आहे अशा विद्यार्थ्याची निवड रद्द करण्यात आली आहे. दुबार लाभार्थ्यांना confirmation Slip याबाबत कोणताही ईमेल प्राप्त होणार नाही याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी. तसेच प्रशिक्षणाच्या कोणत्याही टप्यात दुबार लाभार्थी असल्याचे आढळून आल्यास निवड रद्द करून नियमानुसार कार्यवाही करण्यात येईल. सदर घोषणापत्रकाद्वारे सोबत जोडलेल्या परिशिष्ट अ, ब, क नुसार विद्यार्थ्यांनी कागदपत्रे तपासणी दरम्यान कागदपत्रे सादर करणे बंधनकारक असेल याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी.
Barti Document Verification List
Download List Of Documents Required For BARTI Exam 2024
The post appeared first on .