पोलीस भरती डबल अर्ज करणाऱ्यांची जिल्हा निहाय यादी बघा- Police bharti double form update

hanuman

Active member
Police Bharti Double Form Hami Patra Format

Police bharti double form updateमोठ्या प्रमाणावरील बेरोजगारी आणि सार्वजनिक क्षेत्रांत नोकऱ्या मिळवण्याची तरुणांची आकांक्षा यांच्यातील संघर्ष लक्षात घेऊन, सार्वजनिक रोजगार मिळविण्यासाठी कोणताही अन्यायकारक किंवा फसवणुकीचा मार्ग अवलंबला जाणार नाही याची काळजी घेतली पाहिजे, असे उच्च न्यायालयाने स्पष्ट केले. तसेच, जिल्हा पोलीस चालक पदाच्या भरतीप्रक्रियेत एकाच पदासाठी विविध जिल्ह्यांतून अर्ज करणाऱ्या २,८९७ उमेदवारांना अपात्र ठरवण्याचा निर्णय योग्य ठरवून कायम ठेवला. भरतीच्या नियमांचे उल्लंघन करून एकाच पदासाठी एकाहून अधिक जिल्ह्यातून अर्ज केल्याबद्दल निवड प्रक्रियेतून बाद करण्यात आल्याच्या निर्णयाविरोधात २०० उमेदवारांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. न्यायमूर्ती ए, एस. चांदूरकर आणि न्या. जितेंद्र जैन यांच्या खंडपीठाने याचिकाकर्त्यांना अपात्र ठरवण्याचा निर्णय योग्य ठरवून त्यांच्या याचिका फेटाळून लावल्या. जिल्हा निहाय डबल अर्ज केलेल्या उमेदवारांच्या याद्या खालील लिंक वर उपलब्ध आहे.

आपण सन 2022-2023 या पोलीस शिपाई भरतीसाठी एकापेक्षा जास्त घटकांत ऑनलाईन आवेदन अर्ज केलेले आहेत. पोलीस भरती जाहिरातीमध्ये फक्त एकाच पदासाठी फक्त एकच अर्ज करण्याची तरतूद आहे. त्यामुळे आपण विविध घटकात केलेल्या अर्जापैंकी एका पदाकरीता कोणत्याही एका घटकाचा आवेदन अर्ज पोलीस भरतीसाठी ग्राहय धरण्यात येणार आहे. त्यामुळे कोणत्याही एका घटकाची निवड करुन त्याप्रमाणे हमीपत्र भरुन देण्यासाठी वित्तक हॉल, पोलीस मुख्यालय, येथे दिलेल्या तारखेला आणावे. सोबत येताना आवेदन अर्जाची व आधारकार्ड ची छायांकित प्रत तसेच मुळ आधारकार्ड न चुकता आणावे. असा मेसेज उमेदवारांना प्राप्त झाला आहे. जिल्हा निहाय डबल फॉर्म भरलेल्या उमेदवारांच्या नावाच्या याद्या खाली दिलेल्या आहे.



Police Bharti Double Form Hami Patra Format



The post appeared first on .
 
Top
AdBlock Detected

We get it, advertisements are annoying!

Sure, ad-blocking software does a great job at blocking ads, but it also blocks useful features of our website. For the best site experience please disable your AdBlocker.

I've Disabled AdBlock