पोलीस भरतीत २,८९७ उमेदवार अपात्र… तर तुम्ही पण राहू शकता अपात्र यादीत! – Police Bharti 2024 Result

hanuman

Active member
Police-Result-2024-.jpg

Maharashtra Police Bharti 2024 Result




मोठ्या प्रमाणावरील बेरोजगारी आणि सार्वजनिक क्षेत्रांत नोकऱ्या मिळवण्याची तरुणांची आकांक्षा यांच्यातील संघर्ष लक्षात घेऊन, सार्वजनिक रोजगार मिळविण्यासाठी कोणताही अन्यायकारक किंवा फसवणुकीचा मार्ग अवलंबला जाणार नाही याची काळजी घेतली पाहिजे, असे उच्च न्यायालयाने स्पष्ट केले. तसेच, जिल्हा पोलीस चालक पदाच्या भरतीप्रक्रियेत एकाच पदासाठी विविध जिल्ह्यांतून अर्ज करणाऱ्या २,८९७ उमेदवारांना अपात्र ठरवण्याचा निर्णय योग्य ठरवून कायम ठेवला. भरतीच्या नियमांचे उल्लंघन करून एकाच पदासाठी एकाहून अधिक जिल्ह्यातून अर्ज केल्याबद्दल निवड प्रक्रियेतून बाद करण्यात आल्याच्या निर्णयाविरोधात २०० उमेदवारांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. न्यायमूर्ती ए, एस. चांदूरकर आणि न्या. जितेंद्र जैन यांच्या खंडपीठाने याचिकाकर्त्यांना अपात्र ठरवण्याचा निर्णय योग्य ठरवून त्यांच्या याचिका फेटाळून लावल्या. तसेच पुढील सर्व अपडेट्ससाठी करा , म्हणजे पुढील सर्व अपडेट्स आपल्याला वेळेवर मिळतील.


जिल्हा पोलीस चालक पदासाठी २०१९ मध्ये काढण्यात आलेल्या जाहिरातीनंतर एक लाख १७ हजार उमेदवारांनी त्यासाठी अर्ज केले होते. त्यापैकी २,८९७ उमेदवारांनी एकाच पदासाठी अनेक जिल्ह्यांमधून वेगवेगळ्या ई-मेलवरून आणि माहिती बदलून अर्ज केले होते. मात्र, ही भरती पोलीस दलातील रिक्त पदांसाठी असून ९७.५ टक्के उमेदवारांना मोजक्या उमेदवारांच्या वर्तनाची शिक्षा दिली जाऊ शकत नाही, असे न्यायालयाने याचिकाकर्त्यांना दिलासा देण्यास नकार देताना स्पष्ट केले.​





– Police Bharti 2022 Result पोलीस भरती २०२२ सर्व जिल्ह्यांचे निकाल चेक करा – Maharashtra Police Bharti 2022 Result of Physical Examinations of various District is started to declarer now. The candidates participated in Physical Examination can Check their Online results From following given links of Districts. For More update keep visiting us.

महाराष्ट्र पोलीस भरती २०२२ चे विविध जिल्ह्यांच्या शारीरिक चाचणीचे गुण याद्या प्रकाशित होत आहे. सर्व जिल्ह्यांच्या निकालाच्या लिंक्स याच पेज वर पुढे प्रकाशित होत राहतील. तसेच खालील आपल्या जिल्ह्याच्या लिंक वरून आपण आपले मार्क्स चेक करू शकता. खालील लिंक मध्ये संबंधित जिल्ह्याची PDF डाउनलोड लिंक दिलेली आहे, त्यावर पूर्ण PDF दिलेली आहे. उमेदवारांचे नाव, चेस्ट नंबर, प्राप्त गुण इत्यादी माहिती PDF मध्ये दिलेली आहे.

मित्रांनो आपल्या सर्वांना माहिती आहे यावर्षीच्या पोलीस भरती मध्ये शारीरिक चाचणी ही फक्त 50 गुणांची ठेवण्यात आली आहे. लेखी परीक्षा ही 100 गुणांची ठेवण्यात आली आहे. यावरून असे लक्षात येते की जे उमेदवार शारीरिक चाचणी मध्ये 40 गुणांच्या वर असतील त्यांना निवड यादी मध्ये येण्यासाठी कसरत थोडी फार कमी करावी लागणार आहे.

Maharashtra Police Bharti Result 2022 – 2023


The post appeared first on .
 
Top
AdBlock Detected

We get it, advertisements are annoying!

Sure, ad-blocking software does a great job at blocking ads, but it also blocks useful features of our website. For the best site experience please disable your AdBlocker.

I've Disabled AdBlock