पेसा क्षेत्रातील कंत्राटी तत्वावर नांदेड तलाठी पदभरती-2023 यादी जाहीर

hanuman

Active member
Rashtriya Apang Kalyan Sanstha Nagpur Bharti 2024

Nanded Talathi PESA Bharti Result


: तलाठी पदभरती-२०२३ करीता जिल्हाधिकारी, नांदेड यांचे आस्थापनेवरील तलाठी संवर्गातील रिक्त पदाची जाहिरात जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमि अभिलेख महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या कार्यालयामार्फत जाहिरात क्र. तलाठी भरती/प्र.क्र.४५/२०२३ दिनांक २६.०६.२०२३ अन्वये प्रसिध्द करण्यात आलेली आहे. त्यानुसार नांदेड जिल्हयात दि. १७.०८.२०२३ ते १४.०९.२०२३ या कालावधीत TCS कंपनी मार्फत सदर पदासाठी परिक्षा घेण्यात आलेली आहे. शासन सामान्य प्रशासन विभाग निर्णय क्र. बीसीसी २०२३/प्र.क्र.५४/आरक्षण ५ दि.०५/१०/२०२४ अन्वये अधिसूचना दिनांक २९.०८.२०१९ नुसार अनुसूचित क्षेत्रातील (पेसा) अधिसूचित १७ संवर्गातील सरळसेवेच्या पदांबायत विविध विभागांमार्फत भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. सदर भरती प्रक्रियेनुसार अधिसूचित १७ संवर्गातील पदांसाठी देण्यात आलेल्या जाहिरातींमध्ये पेसा क्षेत्रातील ६९३१ रिक्त पदांचा समावेश होता. सदर जाहिरातीनुसार सुरू झालेल्या भरती प्रक्रिया उमेदवार निवडीच्या अंतिम टप्यापर्यंत येऊन पोहोचल्या होत्या. काही विभागांनी निवड प्रक्रियेचा अंतिम निकाल जाहिर केला होता, तर काही विभागांमार्फत निवडप्रक्रियेचा निकाल तयार झाला होता, परंतु जाहिर झाला नव्हता. सदर अधिसूचना मा. सर्वोच्च न्यायालयात आव्हानित झाल्यामुळे ही भरती प्रक्रिया ज्या टप्प्यावर आहे त्याच टप्प्यावर थांबविण्याच्या सूबना शासनाच्या आदेशान्वये देण्यात आल्यामुळे ही भरती प्रक्रिया थांवविण्यात आली होती. शासन सामान्य प्रशासन विभाग निर्णय क्र. बीसीसी २०२३/प्र.क्र.५४/आरक्षण ५ दि.०५/१०/२०२४ मधील निर्देशानुसार पेसा अंतर्गत रिक्त पदे निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना मानधन तत्वावर नियुक्ती देण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार नांदेड जिल्ह्यातील महसुल विभागातील गट-क संवर्गातील तलाठी पदभरती -२०२३ पेसा अंतर्गत गुणवत्तेनुसार तयार करण्यात आलेली उमेदवारांची निवड व प्रतिक्षा यादी या जिल्हयाचे संकेतस्थळ वर प्रसिध्द करण्यात येत आहे. निवड व प्रतिक्षा यादीतील कागदपत्र तपासणी साठी तयार केलेली यादी ही तात्पुरती व प्राथमीक स्वरुपातील आहे. सदरची यादी ही उमेदवारांनी mahabhumi.gov.in पोर्टलवर भरलेल्या माहितीच्या आधारावर आधारीत आहे. त्यामुळे कागदपत्र पडताळणी नंतर त्यात बदल होऊ शकेल, सदर यादीवर काही आक्षेप असल्यास ते दिनांक ०७/१०/२०२४ रोजी सांयकाळी ५.०० पर्यंत nandedrdc@gmail.com या मेलवर किंवा प्रत्यक्ष या कार्यालयात उपस्थित राहुन दाखल करावेत. त्यानंतर आलेले आक्षेप विचारात घेतले जाणार नाहीत. करिता या परिपत्रकाव्दारे नांदेड जिल्ह्यातील तलाठी भरती-२०२३ मधील पेसा अंतर्गत निवड व प्रतिक्षा यादी या जिल्हयाचे संकेतस्थळ वर प्रसिध्द करण्यात येत आहे. सदर निवड व प्रतिक्षा यादीतील उमेदवारांनी याची नोंद घ्यावी.​

Nanded PESA Talathi Document Verification date

शीर्षकवर्णनप्रारंभ तारीखशेवटची तारीखसंचिका
पेसा क्षेत्रातील कंत्राटी तत्वावर तलाठी पदभरती-2023पेसा क्षेत्रातील कंत्राटी तत्वावर तलाठी पदभरती-202306/10/202406/11/2024





Nanded Talathi Bharti Exam 2019 Final Selection & Waiting List : जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड नि तलाठी भरती परीक्षा २०१९ परीक्षेची अंतिम निवड व प्रतीक्षा यादी जाहीर केलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.​

[td]
Important Links For Nanded Talathi Bharti Result
[/td]​
[td]
pdf.svg
[/td]​

The post appeared first on .
 
Top
AdBlock Detected

We get it, advertisements are annoying!

Sure, ad-blocking software does a great job at blocking ads, but it also blocks useful features of our website. For the best site experience please disable your AdBlocker.

I've Disabled AdBlock