नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील गरजू विदयार्थ्यांकरिता शैक्षणिक शिष्यवृत्ती योजना प्रक्रियेस सुरुवात | NMMC Scholarship Yojana

hanuman

Active member
List Of Documents Required For NMMC Scholarship Yojana

: नमुंमपा कार्यक्षेत्रातील आर्थिक दुर्बल, विधवा / निराधार, स्थानिक प्रकल्पग्रस्त, सफाई कामगार, नाका कामगार व मागासवर्गीय घटकातील इ.1ली ते महाविदयालयीन पर्यंत शिक्षण घेत असलेल्या विदयार्थ्यांना शैक्षणिक शिष्यवृत्ती वितरण करणे हि योजना ऑनलाईन पध्दतीने सन 2024-25 या आर्थिक वर्षाकरीता राबविण्यात येत आहे. या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत

उक्त शिष्यवृत्ती योजनांकरीता अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत दि. 30/11/2024 असून या कालावधीपर्यंत विहीत नमुन्यात अर्ज ऑनलाईन पध्दतीने या संकेत स्थळावर स्विकारण्यात येत आहेत.
तथापि, नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील गरजू विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती योजनेकरीता अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत दि. 30/11/2024 रोजीपर्यंत असल्याने सदर कालावधीमध्ये ऑनलाईन अर्ज सादर करावेत. तद्नंतर प्राप्त अर्जाचा विचार करण्यात येणार नाही, याची कृपया नोंद घ्यावी. तरी नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत विविध घटकांकरीता राबविण्यात येणा-या शिष्यवृत्ती योजनांचा महानगरपालिका क्षेत्रातील गरजू लाभार्थ्यांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येत आहे.


या योजनांमध्ये –

· विधवा / घटस्फोटित महिलांच्या मुलांना शिष्यवृत्तीचे वितरण करणे.

· आर्थिक व दुर्बल घटकातील शाळेत जाणाऱ्या इयत्ता पहिली ते महाविद्यालयीन विद्यार्थांना शिष्यवृत्तीचे वितरण करणे.

· इयत्ता पहिली ते महाविद्यालयीन विदयार्थ्यांच्या शिक्षणासाठी गुणवत्ताप्राप्त मागासवर्गीय विद्यार्थांना शिष्यवृत्तीचे वितरण करणे.

· नमुंमपा क्षेत्रातील स्थानिक प्रकल्पग्रस्तांच्या कुटुंबातील इयत्ता पहिली ते महाविद्यालयीन शिक्षण घेणा-या मुलांना शिष्यवृत्तीचे वितरण करणे.

· नमुंमपा क्षेत्रातील मनपा आस्थापनेवरील सफाई कामगार व कंत्राटी पध्दतीवर असलेल्या कामगारांच्या मुलांना शिष्यवृत्तीचे वितरण करणे.

· नवी मुंबई क्षेत्रातील दगडखाण/बांधकाम/रेती/नाका कामगारांच्या मुलांना शिष्यवृत्तीचे वितरण करणे. – या योजनांचा समावेश आहे.

या योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रांमध्ये –

· उत्पन्न रु. 8 लक्ष रकमेच्या आत असलेबाबतचा मा. तहसिलदार, ठाणे यांचेकडील उत्पन्नाचा दाखला. (आर्थिकदृष्ट्या दुर्बल, विधवा / घटस्फोटित, प्रकल्पग्रस्त, सफाई व कंत्राटी कामगार व दगडखाण, नाका कामगार या घटकातील मुला-मुलींकरीता आवश्यक)

· वास्तव्य पुरावा – मालमत्ता धारक असल्यास चालू वर्षाचा मालमत्ता कर भरल्याची पावती / निवडणूक ओळखपत्र / मतदार यादीतील नांव / पाणी पट्टी / वीज बिल / 3 वर्षाचा भाडे करारनामा / पारपत्र (Pass Port) / रेशनकार्ड / राष्ट्रीयकृत बॅकेचे पासबुक / अधारकार्ड / गॅस कनेक्शन पासबुक यापैकी कोणताही एक पुरावा वास्तव्य पुरावा म्हणून सादर करावा लागेल.

· विद्यार्थ्याने मागील शैक्षणिक वर्षातील शिक्षण पूर्ण केलेले असावे. सोबत मागील वर्षाची गुणपत्रिका जोडणे आवश्यक राहील.

· मागासवर्गीय असल्यास सक्षम प्राधिका-यांकडील जातीचा दाखला आवश्यक.

· विधवा महिलेच्या प्रकरणी सक्षम प्राधिका-यांनी दिलेला तिच्या पतीचा मृत्यू दाखला / घटस्फोटीत महिलेच्या बाबतीत घटस्फोटाबाबत न्यायालयाचे आदेश जोडणे अनिवार्य राहील.

· स्थानिक प्रकल्पग्रस्त कुटूंबातील विद्यार्थ्यांकरिता (I) जमीन नवी मुंबई प्रकल्पासाठी (सिडको/एम.आय.डी.सी.) अधिग्रहण केल्याबाबत भूसंपादन अधिकारी, ठाणे यांची अवार्ड कॉपी व नमुना सातबारा किंवा स्थानिक प्रकल्पग्रस्त असल्याबाबत जिल्हा पुनर्वसन अधिकारी, ठाणे यांचा दाखला (II) नोटरी केलेला वंशावळ दाखला जोडणे आवश्यक राहील.

· नमुंमपा आस्थापनेवरील सफाई कामगार म्हणून काम करत असल्याबाबत नमुंमपा ओळखपत्र / नमुंमपा कार्यालय प्रमुख / स्वच्छता निरीक्षक यांचे प्रमाणपत्र व कंत्राटी कामगाराकरिता नमुंमपा कार्यालय प्रमुखाचे प्रमाणपत्र किंवा ओळखपत्र आवश्यक राहील.

· दगडखाण / बांधकाम / रेती / नाका कामगार यांचे मुलांकरिता अर्जदाराचा पालक हा नोंदणीकृत मालक / स्वयंसेवी संस्थेचा दगडखाण / बांधकाम / रेती / नाका कामगार असल्याबाबतचा पुरावा.

· पाल्याचे ठाणे व नजिकच्या जिल्हयातील स्वत:चे राष्ट्रीयकृत बँकेमध्ये असलेल्या खात्याचे बँक पासबुक / धनादेश यापैकी एकाची छायांकित प्रत.

· पाल्याचे स्वत:चे राष्ट्रीयकृत बँकेमध्ये असलेले खाते आधार लिंक असणे आवश्यक आहे.

· आई वडील दोघांचे आधार कार्ड / पालकाचे आधारकार्ड व असल्यास पॅनकार्ड तसेच पाल्याचे आधारकार्ड याची छायांकित प्रत आवश्यक.​

List Of Documents Required For NMMC Scholarship Yojana


List Of Documents Required For NMMC Scholarship Yojana

सदर शैक्षणिक शिष्यवृत्तीकरीता अटी व शर्ती संकेतस्थळावर उपलब्ध असून महानगरपालिकेमार्फत राबविण्यात येणा-या शिष्यवृत्ती योजनांचा महानगरपालिका क्षेत्रातील गरजू विदयार्थ्यांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक श्री. राजेश नार्वेकर यांच्या वतीने करण्यात येत आहे.​

The post appeared first on .
 
Top
AdBlock Detected

We get it, advertisements are annoying!

Sure, ad-blocking software does a great job at blocking ads, but it also blocks useful features of our website. For the best site experience please disable your AdBlocker.

I've Disabled AdBlock