धुलिवंदनाच्या मराठमोळ्या शुभेच्छा – Dhulivandan Wishes in Marathi 2024

hanuman

Active member
dhulivandan-wishes-in-marathi-2024.jpg

Dhulivandan Wishes in Marathi 2024 – हाय फ्रेंड्स, धूलिवंदन, एक असा सण जो आनंदानी भरून असतो, आपल्याला माहीतच आहे फाल्गुन पौर्णिमेच्या रात्री विधिपूर्वक होळी पेटवली जाते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा होळी विझलेली असते, तेव्हा तेथील राख एकमेकांच्या अंगाला फासून धु खेळून नंतर आंघोळ केली जाते. यात रंगाचा वापर व्हायला लागलाय. त्यामुळे धुलीवंदनाला एकमेकांना रंग लावून धुळवड साजरी करतात. तसेच, फाल्गुन कृष्ण पंचमीच्या दिवशी रंग खेळण्याची महाराष्ट्राची परंपरा आहे आणि म्हणूनच हा दिवस रंगपंचमी म्हणून ओळखला जातो. यामुळे फाल्गुन पौर्णिमेला हुताशनी पौर्णिमा म्हणजे होळी साजरी करतात, पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी धुलीवंदन/धुळवड साजरा होतो आणि यानंतर येणाऱ्या पंचमीच्या दिवशी रंगपंचमी साजरी करतात.



Dhulivandan.jpg




Holi-Colors.jpg




सूर्याच्या दाहकतेवर करूया पाण्याचा शिडकाव
ह्रदयात मिसळूया स्नेह हास्याचा भाव,
होऊ तल्लीन सप्तसुरात,
रंगवू एकमेकांना सप्तरंगात.
धुलीवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा”

गोड धोड खाद्याचा घेऊया आस्वाद,
प्रेम भाव निर्माण करू,
मिटवूया एकमेकातला वाद
खेळूया रंग उधळूया रंग,
तुम्हाला धुळवडीच्या शुभेच्छा”

“नारिंगी रंग पळसाच्या फुलांचा
हिरवा, गुलाबी, गुलालाचा
पिचकारीत भरून सारे रंग
रंगवूया एकमेकांना
धुलीवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा!”

“भिजू दे रंग आणि अंग स्वच्छंद,
अखंड उडू दे मनि रंगतरंग
व्हावे अवघे जीवन दंग
असे उधळू आज हे रंग!
रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा”

“रंग प्रेमाचा, रंग स्नेहाचा,
रंग नात्यांचा, रंग बंधाचा,
रंग हर्षाचा, रंग उल्हासचा,
रंग नव्या उत्सवाचा,
साजरा करू होळी संगे…
रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा”

“सुखाच्या रंगांनी आपले
जीवन रंगीबेरंगी होवो,
रंग गुलाल उधळू आणि,
रंगवूया रंगपंचमीच्या रंगात हे क्षण…
रंगपंचमीच्या रंगीत शुभेच्छा! “





dhulivandan-wishes-in-marathi-2024.jpg




Holi-2.jpg




dhulivandan-wishes-in-marathi.jpg


The post appeared first on .
 
Top
AdBlock Detected

We get it, advertisements are annoying!

Sure, ad-blocking software does a great job at blocking ads, but it also blocks useful features of our website. For the best site experience please disable your AdBlocker.

I've Disabled AdBlock