दहावी-बारावी बोर्ड परीक्षेची माहिती मिळणार एका क्लिकवर; एमएसबीएसएचएससी अॅप विकसित | Download MSBSHSE App

hanuman

Active member
Download-MSBSHSE-App.jpg

: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने स्वतःचे अॅप विकसित केले आहे. या अॅपमुळे केवळ दहावी, बारावी परीक्षेचे वेळापत्रकच नव्हे तर परीक्षेसंबंधी आवश्यक माहिती, परिपत्रके व आनुषंगिक माहिती मिळवणे अधिक सोपे झाले आहे. या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत

एसएससी बोर्डातर्फे फेब्रुवारी मार्च २०२५ मध्ये होणाऱ्या बारावी, दहावी परीक्षेचे अंतिम वेळापत्रके राज्य मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर २१ नोव्हेंबरपासून उपलब्ध करून देण्यात आली आहेत. याशिवाय चालू शैक्षणिक वर्षाच्या परीक्षेत गणित व विज्ञानाच्या तीव्रतेच्या निकषात कोणताही बदल नाही. बोर्डाकडून विद्यार्थी, पालक, शाळा, कनिष्ठ महाविद्यालयाच्या सोयीसाठी MSBSHSC हे अॅप विकसित करण्यात आले आहे. यामध्ये दहावी, बारावी परीक्षेचे वेळापत्रक, मार्च २०२४ परीक्षेच्या ठरावीक विषयांच्या प्रश्नपत्रिका, तसेच विविध परिपत्रके उपलब्ध करून देण्यात आली आहेत. यासह राज्यातील नऊ विभागीय मंडळांची माहिती देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे.​

About this app​

The Maharashtra State Board app is your one-stop solution for all HSC and SSC related information. Whether you’re a student, institute, or employee, this app provides you with the latest timetables, notifications, and essential board links.

Download MSBSHSE App

विशेष म्हणजे हे अॅप गुगल प्ले स्टोअरवर मोफत उपलब्ध आहे. या अॅपमुळे विद्यार्थी, शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांना एका क्लिकवर सर्व माहिती मिळणार आहे.

शाळा, महाविद्यालयांसाठी सोय

या अॅपवर विद्यार्थी, शाळा व कर्मचाऱ्यांसाठी लॉगिन उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासह नमुना प्रश्नपत्रिका वेळापत्रक निकालासह आनुषंगिक बाबी देखील विद्यार्थ्यांसाठी येथे आहेत. शुल्क परतावा, अंतर्गत व प्रात्यक्षिक परीक्षा गुण यासह आनुषंगिक सुविधा शाळांसाठी आहेत. विद्यार्थ्यांसाठी परीक्षेच्या काळात लागणारे प्रमाणपत्र तसेच अन्य माहिती देखील या अॅपवर उपलब्ध करून देण्यात आली आहे.​


The post appeared first on .
 
Top
AdBlock Detected

We get it, advertisements are annoying!

Sure, ad-blocking software does a great job at blocking ads, but it also blocks useful features of our website. For the best site experience please disable your AdBlocker.

I've Disabled AdBlock