ड्रायव्हिंग टेस्टसाठी आता RTO मध्ये जाण्याची गरज नाही, 1 जून पासून लागू होणार नवे नियम | RTO New Rule PDF

hanuman

Active member
RTO Bharti 2023 Maharashtra

RTO New Rule PDF

: वाहन चालविण्यासाठी आवश्यक असणारे ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यासाठी आतापर्यंत आरटीओत जाऊन ड्रायव्हिंग टेस्ट देणे आवश्यक होते. परंतु आता आरटीओत न जाता ड्रायव्हिंग प्रशिक्षण देणाऱ्या संस्थांमध्येच ही टेस्ट देता येणार आहे. त्यासाठी ठराविक संस्थांना त्यासाठीची मान्यता दिली जाणार आहे. रस्ते परिवहन व महामार्ग मंत्रालयाने जारी केलेले नवे नियम १ जूनपासून लागू होणार आहे. त्याशिवाय मंत्रालयाने अन्य काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहे. या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत

आता लागणार फक्त इतके शुल्क

  • लर्निंग लायसन्स : 150 रुपये
  • लर्निंग लायसन्स चाचणी शुल्क : 50 रुपये
  • ड्रायव्हिंग टेस्ट शुल्क : 300
  • ड्रायव्हिंग लायसन्स : 200 रुपये
  • लायसन्स नूतनीकरण : 200 रुपये
  • दुसऱ्या वाहनाचे अतिरिक्त लायसन्स : 500 रुपये



खासगी संस्थांच्या प्रशिक्षकासाठी काय असतील नवे नियम ?

  • किमान 1 एकर भूखंड आवश्यक (चारचाकीसाठी 2 एकर)ड्रायव्हिंग टेस्ट देण्यासाठी पुरेशी सुविधा
  • प्रशिक्षक हा किमान 12 वी उत्तीर्ण व 5 वर्षांचा अनुभव असावा.
  • हलक्या वाहनांसाठी 4 आठवड्यात 29 तासांचे प्रशिक्षण ( 8 तास थेअरी 21 तास प्रात्यक्षिक)
  • अवजड वाहनांसाठी 6 आठवड्यात 39 तासांचे प्रशिक्षण (8 तास थेअरी 31 तास प्रात्यक्षिक)


आणखी कोणते नवे नियम लागू होणार?

    • जुने वाहने बाद : प्रदूषण करणारे सुमारे 9 लाख जुने सरकारी वाहने सेवेतून बाद ठरविण्यात येणार आहे.​
    • कठोर दंड : वाहनचालक अल्पवयीन आढळल्यास तब्बल 25 हजारांचा दंड ठोठावला जाईल. तसेच त्यास २५ व्या वर्षापर्यंत लायसन्स दिले जाणार नाही. तसेच वाहनमालकांची नोंदणी रद्द केली जाईल.​
    • सुलभ अर्ज प्रक्रिया : लायसन्स काढण्याची प्रक्रिया सुलभ केली जाणार आहे. वाहनाच्या प्रकारानुसार मोजकेच कागदपत्रे लागणार आहेत.​
    • कागदपत्रांसाठी . या संकेतस्थळावर अर्ज करता येणार आहे. कागदपत्रे सादर करण्यासाठी व ड्रायव्हिंग टेस्ट देण्यासाठी मात्र आरटीओ कार्यालयात येण्याची आवश्यकता नसल्याचे सांगण्यात आले आहे.​

The post appeared first on .
 
Top
AdBlock Detected

We get it, advertisements are annoying!

Sure, ad-blocking software does a great job at blocking ads, but it also blocks useful features of our website. For the best site experience please disable your AdBlocker.

I've Disabled AdBlock