टाटा ॲडव्हान्स्ड सिस्टिम्स मध्ये सरळ मुलाखतीद्वारे अनेक रोजगाराच्या संधी! – TATA Group Mega Bharti 2024

hanuman

Active member
tata-motors-logo.png

TATA Group Mega Bharti 2024

मित्रांनो सध्या टाटा ॲडव्हान्स्ड सिस्टिम्स तर्फे सरळ वॉक-इन इंटरव्ह्यूच्या आयोजीत करण्यात आपले आहे! टाटा ॲडव्हान्स्ड सिस्टिम्स लिमिटेडने हॉटेल कॅरिअडमध्ये गुरुवार (ता. २) आणि शुक्रवारी (ता. ३) पिंपरी-चिंचवडमधील फोर्ज्ब कंपनीसमोरील वॉक-इन इंटरव्ह्यूचे आयोजन केले आहे. या मुलाखतीमध्ये टीएएसएलच्या हैदराबाद आणि नागपूर फॅसिलिटीमधील जागांसाठी उमेदवारांनी आपल्या कॅड, कॅममध्ये डिप्लोमा किंवा बीटेक केलेले असणे आणि ४ ते ८ वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे.

टाटा ॲव्हान्स्ड सिस्टिम्स लिमिटेडला हैदराबाद फॅसिलिटीसाठी ऑपरेटर असेंब्ली आणि पेंटरच्या जागांसाठी उमेदवारांना तीन ते सहा वर्षांचा अनुभव असलेले आयटीआय-फिटर आणि अप्रेन्टिस उमेदवार हवे आहे. या मुलाखतीमध्ये आपल्याला दोन्ही दिवस सकाळी ९ ते सायंकाळी ५ दरम्यान उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या जाईल.

आपल्याला या मुलाखतीसाठी महाभरती तर्फे शुभेच्छा! आपल्याला यशस्वी असो ही कामना करतो.​





: Tata, the leading company in the Indian market, will now manufacture the iPhone in India. At the same time, The Tata Company has brought a lot of employment opportunities. Along with the iPhone, the company will also manufacture its cover (iPhone-casing). For this, a factory is being set up on 500 acres in Hosur. The factory employs more than 15,000 workers. However, as the company expands the factory soon, employment opportunities are likely to double.​



भारतीय बाजारपेठेतील अग्रगण्य कंपनी असलेली टाटा आता भारतात आयफोनची निर्मिती करणार आहे. त्याचबरोबर टाटा कंपनी मोठ्या रोजगाराची संधी घेऊन आली आहे. आयफोनसोबतच त्याचे कव्हर (आयफोन-केसिंग)ची निर्मितीदेखील कंपनी करणार आहे. त्यासाठी होसुर येथे 500 एकरात फॅक्टरी उभारली जात आहे. तसंच, या फॅक्टरीसाठी 15,000 हून कामगारांना रोजगार देते. मात्र, लवकरच कंपनी या कारखान्याचा विस्तार करत असल्यामुळं रोजगाराच्या संधी दुप्पट होण्याची शक्यता आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत

टाटा कंपनी आयफोन बरोबरच आयफोन-केसिंगचीही निर्मिती करणार असल्याच्या चर्चा आहे. त्यामुळं या विस्तासाठी 25,000 ते 28,000 नवीन रोजगार निर्माण होण्याची शक्यता आहे. भारतातील टाटा समूहासाठी एक मोठी गुंतवणूक ठरणार असून यामुळं देशातील इलेक्ट्रॉनिक्स उद्योगाला लक्षणीय चालना मिळेल, असं एका रिपोर्टमध्ये नमूद केलं आहे.



द इकोनॉमिक टाइम्सच्या एका रिपोर्टनुसार, कंपनीने अलीकडेच खरेदी केलेल्या आयफोन असेंबलली प्लांटची सुरुवात करण्याआधी कामगारांची चाचपणी करण्याची कंपनीची योजना आहे. टाटा इलेक्ट्रॉनिक्सनुसार, आयफोनचा हा प्लांट कंपनीला इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रात एक प्रमुख दावेदार बनण्यास मदत करेल. रिपोर्टनुसार, टाटाचा हा नवीन प्लांट मुख्यतः अॅपल फोन कम्पोनेंटचं उत्पादन करेल.

भारतात अॅपलच्या स्मार्टफोनची निर्मिती हे टाटा इलेक्ट्रॉनिक्सच्या विस्तारासाठीची प्रमुख रणनितीचा एक भाग आहे. टेक्नोलॉजी मार्केटमध्ये एनालिस्टने दिलेल्या माहितीनुसार, अॅपल कंपनी त्यांचे उत्पादन चीनपासून दूर ठेवण्यास वचनबद्ध आहे. भारताची वाढती बाजारपेठ आणि कुशल कामगार शक्ती हा कंपनीसाठी एक चांगला पर्याय ठरत आहे.



भारतीय बाजारपेठेचा विकास वेगाने होत आहे. अॅपलनेही या माहितीला दुजारा दिला आहे. कंपनीने भारतात आयफोनची विक्री करुन नेहमीच चांगला नफा कमावला आहे. जून ते सप्टेंबर या तिमाहीत अॅपलने भारतात रेकॉर्डब्रेक कमाई केली आहे. कंपनीने भारतात आयफोन, मॅक आणि अॅप्सच्या विक्रीत वाढ होत असल्याचे म्हटलं आहे, अॅपलचे सीईओ टिम कुक यांनी अलीकडेच भारतातचे महत्त्व स्वीकारले होते. त्यांनी म्हटलं आहे की, भारत एक महत्त्वपूर्ण बाजारपेठ आहे आणि अॅपल भारतात आपला व्यापार वाढवण्याचा प्रयत्न करत आहे.





If you are dreaming of a job in Tata Group, then good days are coming for you about TATA Group Mega Bharti 2023. Titan plans to hire more than 3,000 employees in engineering, design, luxury, digital, data analytics, marketing and sales and other sectors over the next five years. Titan said on Tuesday. The company is looking for skilled professionals in areas such as data analytics, cybersecurity, product management, digital marketing, and other new-age skills.​



जर तुम्ही टाटा ग्रुपमध्ये नोकरीचे स्वप्न पाहत असाल तर तुमच्यासाठी चांगले दिवस येणार आहेत. कारण टायटन कंपनीने पुढील ५ वर्षांत अभियांत्रिकी, डिझाइन, लक्झरी, डिजिटल, डेटा अॅनालिटिक्स, मार्केटिंग आणि विक्री आणि इतर क्षेत्रात ३ हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याची योजना आखली आहे. टायटन कंपनीने मंगळवारी ही माहिती दिली. कंपनी डेटा अॅनालिटिक्स, सायबर सुरक्षा, उत्पादन व्यवस्थापन, डिजिटल मार्केटिंग आणि नवीन युगातील इतर कौशल्ये यांसारख्या क्षेत्रांसाठी कुशल व्यावसायिक शोधत आहे. टायटन कंपनीच्या प्रमुख (मानव संसाधन – कॉर्पोरेट आणि रिटेल) प्रिया एम. पिल्लई म्हणाल्या, “आम्ही पुढील पाच वर्षांत १,००,००० कोटींचा व्यवसाय होण्यासाठी एक रोमांचक प्रवास सुरू करीत आहोत. आम्ही पुढील पाच वर्षांत ३ हजार नवीन लोकांची भरती करणार आहोत.



त्या म्हणाल्या की, “आमचा विश्वास आहे की, आमची माणसे वाढवण्याबरोबरच आम्ही विविध क्षेत्रातील तज्ज्ञांना संधी दिल्यास कंपनीला फायदा होईल. यामुळे कंपनीच्या वाढीला आणि नवोन्मेषाला गती मिळेल, तसेच उद्योगात आमचे स्थान मजबूत होईल.सध्या कंपनीचे ६० टक्के कर्मचारी महानगरांमध्ये कार्यरत आहेत आणि ४० टक्के दुसऱ्या आणि तिसऱ्या श्रेणीतील शहरांमध्ये आहेत.







The latest update for TATA Group Jobs. As per the latest news, Tata Group is all set to hire 45,000 people for its factory. For more details about TATA Group Jobs 2022, TATA Group Recruitment 2022, visit our website . Further details are as follows:-​

जागतिक पातळीवर मंदी आल्यामुळे जगभरातील नोकऱ्यांवर संकट निर्माण झाले आहे. कंपन्या सातत्याने कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करत आहेत. अशा परिस्थितीत टाटा समूह कर्मचाऱ्यांना नोकऱ्या देत आहे.



टाटा समूहाची अभियांत्रिकी आणि बांधकाम (EPC) क्षेत्रात या वर्षी देशातील आघाडीच्या अभियांत्रिकी महाविद्यालयांमधून नोकर भरती करणार आहे. टाटा प्रोजेक्ट्सचे मुख्य अधिकारी गणेश चंदन यांनी इकॉनॉमिक टाईम्सला सांगितले की, टाटा प्रोजेक्ट्स 2022-23 मध्ये सुमारे 400 नवीन पदवीधरांची नियुक्ती करणार आहे. या नियुक्त्यांमध्ये, भारतीय तंत्रज्ञान संस्था (IITs) आणि राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था (NITs) मधील 255 पदवीधर असतील.



डिप्लोमाधारकांना इतर सरकारी पॉलिटेक्निक कॉलेजमधून नियुक्ती मिळेल. टाटा ग्रुपने 2021-22 मध्ये टाटा प्रोजेक्टद्वारे 250 पदवीधरांची भरती केली होती, ज्यामध्ये IIT आणि NIT मधील सुमारे 80 पदवीधरांना संधी मिळाली होती.

गणेश चंदन यांच्या मते, टाटा प्रोजेक्ट कंपनी अभियांत्रिकी कॅम्पसच्या माध्यमातून नोकर भरती करत आहे. गेल्या पाच वर्षांत, कंपनीने 1,000 पदवीधर अभियंते आणि विज्ञान पदवीधरांना 5,700 कायमस्वरूपी कर्मचारी वर्गात जोडले आहे.

दरवर्षी कंपनी अभियांत्रिकी संस्थांमधून महिलांची नियुक्ती करत आहे आणि यावर्षी त्यांची संख्या सुमारे 25 टक्के आहे. पाच वर्षांपूर्वी, सुमारे 4,000 कर्मचार्‍यांमध्ये महिलांचा वाटा 3 टक्के होता. हे प्रमाण आता 8 टक्क्यांपर्यंत वाढले आहे.




काही वर्षांपूर्वीपर्यंत भारतात मोबाईलचे उत्पादन होत नव्हते, पण आता जवळपास 200 मोबाईल कंपन्या भारतात त्यांचे फोन तयार करत आहेत आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे जगातील सर्वात मोठी मोबाईल फॅक्टरी भारतात आहे, जी फक्त सॅमसंगची आहे. देशात मोबाईलचे उत्पादन होत असले तरी त्याचे सुटे भाग आणि कच्च्या मालासाठी चीन किंवा तैवानवर अवलंबून राहावे लागते. आता टाटा समूह ही साखळी तोडण्याच्या तयारीत आहे. काही महिन्यांपूर्वी अशी बातमी आली होती की टाटा समूह भारतात मोबाईल पार्ट्स तयार करेल आणि आता असे वृत्त आहे की टाटा समूह मोबाईल पार्ट्स फॅक्टरीसाठी 45,000 लोकांची भरती करण्याच्या तयारीत आहे. एका रिपोर्टनुसार, आयफोनचे पार्ट्स सर्वप्रथम टाटाच्या कारखान्यात तयार केले जातील.
  • तामिळनाडूतील होसूर येथे असलेल्या टाटा समूहाच्या प्लांटमध्ये पुढील १८ ते २४ महिन्यांत ४५ हजार महिला कर्मचाऱ्यांना नियुक्त केले जाईल.
  • ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, कारखान्यात सध्या 10,000 कामगार आहेत, बहुतेक महिला आहेत.
  • होसूर येथील टाटा समूहाचा कारखाना ५०० एकरांवर पसरलेला आहे.
  • या वर्षी सप्टेंबरमध्ये, आदिवासी समाजातून आलेल्या 5,000 महिलांना या प्लांटमध्ये नोकऱ्या मिळाल्या.
  • या संदर्भात टाटा समूहाच्या कोणत्याही अधिकाऱ्याने किंवा अॅपलने अद्याप कोणतीही पुष्टी केलेली नाही.

या प्लांटमध्ये काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांना 16 हजार रुपये मासिक वेतन मिळणार आहे. याशिवाय राहण्याची व भोजनाची व्यवस्थाही मोफत करण्यात आली आहे. या महिलांच्या शिक्षणाचा खर्चही टाटा समूह उचलणार आहे.​



The post appeared first on .
 
Top
AdBlock Detected

We get it, advertisements are annoying!

Sure, ad-blocking software does a great job at blocking ads, but it also blocks useful features of our website. For the best site experience please disable your AdBlocker.

I've Disabled AdBlock