JEE Advanced Exam Date 2025
: इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आयआयटी कानपूरने जेईई अॅडव्हान्स २०२५ च्या परीक्षेची तारीख जाहीर केली आहे. आयआयटी प्रवेशासाठी आवश्यक संबंधित परीक्षा १८ मे २०२५ रोजी होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत
जेईई अॅडव्हान्स २०२५ परीक्षा दोन सत्रांत घेतली जाईल. पेपर १ सकाळी ९ ते दुपारी १२ आणि पेपर २ दुपारी २:३० ते ५:३० या वेळेत घेण्यात येईल. जेईई अॅडव्हान्स २०२५ च्या अधिकृत वेबसाइटवर जाहीर करण्यात आलेल्या नोटीसनुसार रविवार १८ मे २०२५ रोजी घेण्यात येईल. या परीक्षेत प्रत्येकी तीन तासांच्या कालावधीचे दोन पेपर (पेपर १ आणि पेपर २) असतील. दोन्ही पेपरमध्ये उपस्थित राहणे अनिवार्य आहे. जेईई मेन २०२५ ची परीक्षा उत्तीर्ण झालेले आणि बीई, बीटेक पेपरमधील उच्चांकी गुण मिळवणारे २ लाख ५० हजार उमेदवार जेईई अॅडव्हान्स्ड परीक्षेसाठी पात्र राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
JEE Advanced 2025 साठी पात्रता निकष:
SC, ST आणि PwD अर्जदारांसाठी पाच वर्षांच्या सूटसह (1 ऑक्टोबर 1995 रोजी किंवा नंतर) उमेदवारांचा जन्म 1 ऑक्टोबर 2000 रोजी किंवा त्यानंतर झालेला असावा. उमेदवारांनी प्रथम 2023, 2024 किंवा 2025 मध्ये 12वी (किंवा समतुल्य) परीक्षेत भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित हे मुख्य विषय म्हणून दिलेले असावेत.
जे 2022 मध्ये किंवा त्यापूर्वी इयत्ता 12 साठी बसले होते ते त्यांच्या विषयाच्या निवडीकडे दुर्लक्ष करून अपात्र आहेत. 2024 मध्ये IITs मधील पूर्वतयारी अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेतलेले उमेदवार अर्ज करू शकतात, तर ज्यांचे प्रवेश सामील झाल्यानंतर रद्द झाले होते ते पात्र नाहीत. अधिक तपशील अधिकृत JEE Advanced वेबसाइटवर उपलब्ध आहेत.
JEE Advanced 2025 साठी पात्रता निकष:
SC, ST आणि PwD अर्जदारांसाठी पाच वर्षांच्या सूटसह (1 ऑक्टोबर 1995 रोजी किंवा नंतर) उमेदवारांचा जन्म 1 ऑक्टोबर 2000 रोजी किंवा त्यानंतर झालेला असावा. उमेदवारांनी प्रथम 2023, 2024 किंवा 2025 मध्ये 12वी (किंवा समतुल्य) परीक्षेत भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित हे मुख्य विषय म्हणून दिलेले असावेत.
जे 2022 मध्ये किंवा त्यापूर्वी इयत्ता 12 साठी बसले होते ते त्यांच्या विषयाच्या निवडीकडे दुर्लक्ष करून अपात्र आहेत. 2024 मध्ये IITs मधील पूर्वतयारी अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेतलेले उमेदवार अर्ज करू शकतात, तर ज्यांचे प्रवेश सामील झाल्यानंतर रद्द झाले होते ते पात्र नाहीत. अधिक तपशील अधिकृत JEE Advanced वेबसाइटवर उपलब्ध आहेत.
JEE Main And Advanced Exams
: JEE Mains exam was conducted for admission to national level engineering institutes like Indian Institute of Technology (IIT) and others. The next stage of the process will be the JEE Advanced exam. The JEE Advanced 2023 exam will be conducted on June 4 at examination centers across the country and abroad.
देशातील आयआयटी, एनआयटी, राष्ट्रीय स्तरावरील नामांकित अभियांत्रिकी संस्थांमधील प्रवेशासाठी अनिवार्य असलेली जेईई अॅडव्हान्स परीक्षा येत्या ४ जूनला होणार आहे. या परीक्षेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया ३० एप्रिलपासून सुरू होणार आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत
जेईई मेन्समधील पात्र ठरलेल्यांची जेईई अॅडव्हान्स परीक्षा देश-विदेशातील परीक्षा केंद्रावर घेण्यात येणार आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सीद्वारे (एनटीए) यंदाच्या शैक्षणिक वर्षातील प्रवेशासाठी राष्ट्रीयस्तरावर दोन सत्रांत परीक्षा घेण्यात आली. जानेवारीमध्ये पहिले सत्र झालेले असताना नुकतेच एप्रिलमध्ये जेईई मेन्सचे दुसरे सत्र झाले होते. या दोन्ही परीक्षांना सामोरे गेलेल्या विद्यार्थ्यांच्या दोन्हींपैकी सर्वोत्तम पर्सेटाइल ग्राह्य धरून राष्ट्रीय क्रमवारी जाहीर केली जाईल. या क्रमवारीच्या आधारावर जेईई अॅडव्हान्स परीक्षेसाठी पात्रता निश्चित होणार आहे. ही परीक्षा दरवर्षी देशातील आयआयटी संस्थांद्वारे घेण्यात येते. यंदा ही जबाबदारी गुवाहाटी आयआयटीकडे आहे. गुवाहाटी आयआयटीच्या संकेतस्थळावर परीक्षेबाबतची सविस्तर माहिती देण्यात आली आहे.
परीक्षा नोंदणीला ३० पासून सुरुवात | JEE Advanced Exam Time Table 2023
दरवर्षी जेईई ॲडव्हान्स्ड परीक्षा संयोजनाची जबाबदारी आयआयटी संस्थांना दिली जात असते. त्यानुसार यावर्षी आयआयटी गुवाहाटी यांच्याकडे परीक्षेच्या संयोजनाची जबाबदारी असेल. आयोजन संस्थेने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार जेईई ॲडव्हान्स्ड परीक्षेसाठी नोंदणीप्रक्रिया ३० एप्रिलपासून सुरू होईल.
- परीक्षा अर्ज भरण्याची मुदत सात मेपर्यंत असेल.
- शुल्क भरण्याची मुदत ८ मेपर्यंत असेल.
- २९ मे ते ४ जून या कालावधीत प्रवेशपत्र उपलब्ध केले जातील.
- पहिला पेपर चार जून रोजी सकाळी नऊला, तर पेपर क्रमांक २ दुपारी २ वाजून ३० मिनिटांनी होणार आहे.
- जूनच्या अंतिम आठवड्यात निकाल जाहीर केला जाईल.
JEE Main And Advanced Exams
: The JEE Board has been set up to streamline and streamline the JEE Mains and JEE Advanced examinations. The Director-General of the National Testing Agency (NTA) will be the Member Secretary of this Board. Former Director of IIT, Madras Pvt. Bhaskar Ramamurthy is the chairman of the board. Further details are as follows:-
‘जेईई मेन्स’ आणि ‘जेईई अॅडव्हान्स’ परीक्षांची प्रक्रिया अधिक चांगली आणि पारदर्शक करण्यासाठी जेईई बोर्डाची स्थापना करण्यात आली आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सीचे (NTA) महासंचालक या बोर्डाचे सदस्य सचिव असतील. ‘आयआयटी, मद्रास’चे माजी संचालक प्रा. भास्कर राममूर्ती या बोर्डाचे अध्यक्ष आहेत.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत
- शिक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, ‘जेईई मेन्स’ आणि ‘जेईई अॅडव्हान्स’ परीक्षांची प्रक्रिया अधिक चांगली आणि पारदर्शक करण्यासाठी जेईई बोर्डाची स्थापना करण्यात आली आहे.
- नॅशनल टेस्टिंग एजन्सीचे (NTA) महासंचालक या बोर्डाचे सदस्य सचिव असतील.
- या वेळीदेखील जेईईच्या या बोर्डामध्ये विविध आयआयटी संस्थांची महत्त्वाची भूमिका आहे.
- या बोर्डामध्ये ‘आयआयटी, मुंबई’, ‘आयआयटी, गुवाहाटी’ आणि ‘आयआयटी, खरगपूर’च्या संचालकांचा समावेश आहे.
- ‘सीबीएसई’च्या अध्यक्षांचाही या बोर्डात समावेश करण्यात आला आहे.
- शिक्षण मंत्रालयातील अतिरिक्त सचिव स्तरावरील अधिकारीदेखील बोर्डात सदस्य असतील.
- याशिवाय ‘एनआयटी’ व ट्रिपल आयटीचे संचालक; तसेच गुजरात, हरियाणा, कर्नाटक आणि बिहारच्या प्रतिनिधींनाही या बोर्डात स्थान देण्यात आले आहे.
यंदापासूनच कार्यभार नव्या बोर्डाकडे
- जेईई परीक्षांसाठीचे १९ सदस्यीय बोर्ड २०२२ आणि २०२३मधील परीक्षांसाठीची व्यवस्था करील.
- परीक्षेशी संबंधित धोरण, नियम आणि व्यवस्था या बोर्डाच्या अधिकार क्षेत्रात असतील.
- जेईईशी संबंधित प्रशासकीय विषय, वित्तीय निर्णय आणि न्यायालयीन प्रकरणाची जबाबदारीदेखील या बोर्डाकडे असेल.
- जेईई व इतर स्पर्धा परीक्षांचे प्रत्यक्ष आयोजन करण्याची जबाबदारी नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडे असते.
- बोर्ड नियम, अभ्यासक्रम, प्रश्नपत्रिका निश्चित करते, तर नॅशनल टेस्टिंग एजन्सी परीक्षेचे प्रत्यक्ष आयोजन करीत असते.
- जेईईच्या नवीन बोर्डातही नॅशनल टेस्टिंग एजन्सीची भूमिका महत्त्वाची असणार आहे.
The JEE Mains exams will be held in two different phases between June and July. The first phase of JEE Mains examination will start from June 20. Following the completion of these examinations, the next phase of examinations will be held in July. Advanced examinations will be held in August for the students on the merit list in both these examinations.
- शिक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, जेईईसाठी स्थापन करण्यात आलेले नवीन बोर्ड यापूर्वीच्या जेईई बोर्डाची जागा घेईल.
- जेईईच्या जुन्या बोर्डाचा कार्यकाळ ३१ मार्चला संपुष्टात आला आहे.
- पूर्वीच्या बोर्डाच्या तुलनेत नवे बोर्ड अधिक व्यापक असल्याचेही मंत्रालयाने म्हटले आहे.
- नवीन जेईई बोर्डाचे सचिवालयदेखील असेल; तसेच त्यामार्फत जेईई परीक्षांबाबत पूर्णवेळ काम पाहिले जाणार आहे.
The post appeared first on .