चंद्रपूर जिल्हा बँकेतील ३५८ लिपीक व शिपाई पदांची नोकर भरती जाहिरात प्रकाशित अर्ज “या” तारखेपासून | Chandrapur DCC Bank Bharti 2024

hanuman

Active member
Chandrapur DCC Bank Recruitment 2024

Chandrapur DCC Bank Bharti 2024


: District Central Co-operative Bank is going to recruit interested and eligible candidates to fill various vacant posts. Online applications are invited for the posts of “Clerk and Shipai”. There are a total of 358 vacancies available to fill. These applications are to be submitted directly for online Mode. No other mode of application will be accepted. The last date for submitting application is the 19 October 2024. For more details about Chandrapur DCC Bank Bharti 2024, visit our website .

Chandrapur District Central Cooperative Bank Marya., Chandrapur direct service recruitment for the posts of 261 clerks and 97 sepoys through online examination process. Online applications are being invited from the eligible candidates for the said recruitment process. The said Online Forms (Application) on website dt. 08 October 2024 from 11.00 am to noon. Available till 19 October 2024 at 12.00 PM. The said form (application) and examination fee should be filled online on the same website (Submit). More information/criteria/eligibility/conditions and other details regarding the said vacancy recruitment is available at . The last date of receipt of application will be 19/10/2024 till 12.00 PM. Applications sent directly to the bank and through post/courier will not be considered. Self​

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अंतर्गत “लिपीक व शिपाई” पदांच्या एकूण 358 (२६१ लिपीक व ९७ शिपाई) रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १९ ऑक्टोबर २०२४ आहे.​

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत
Ne.gif

  • पदाचे नावलिपीक व शिपाई
  • पदसंख्या358 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)​
  • नोकरी ठिकाण
  • वयोमर्यादा –18 ते 45 वर्षे
  • अर्ज शुल्क – लवकरच जाहीर होणार
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन​
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख१९ ऑक्टोबर २०२४

cdccbank.co.in Recruitment 2024


चंद्रपुर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्या., चंद्रपुर या बँकेत २६१ लिपीक व ९७ शिपाई या पदांची ऑनलाईन परिक्षा प्रक्रियेव्दारे सरळसेवा भरती करणेची आहे. सदर भरती प्रक्रियेसाठी पात्र उमेदवारांकडुन ऑनलाईन अर्ज मागविणेत येत आहेत. सदर Online फॉर्मस् (अर्ज) या संकेत स्थळावर दि. ०८ ऑक्टोबर २०२४ सकाळी ११.०० ते दि. १९ ऑक्टोबर २०२४ रात्री १२.०० वाजेपर्यंत उपलब्ध आहेत. सदर फॉर्मस (अर्ज) व परिक्षा शुल्क ऑनलाईन भरुन त्याच संकेतस्थळावर (Submit) करावेत. सदर रिक्त पदे भरतीचे अनुषंगाने अधिक माहिती/निकष/पात्रता/अटी शर्ती व इतर तपशिल या संकेत स्थळावर उपलब्ध आहे. अर्ज स्विकारणेची अंतिम तारीख दिनांक १९/१०/२०२४ अखेर रात्री १२.०० वाजेपर्यंत राहील. बँकेकडे थेट तथा पोस्ट/कुरिअर व्दारे आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाही. स्वा​

Chandrapur DCC Bank Vacancy 2024

पदाचे नाव पद संख्या
लिपीक261
शिपाई97

Educational Qualification For Chandrapur DCC Bank Recruitment 2024

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
लिपीककोणत्याही शाखेचा पदवीधर व MSCIT किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे
शिपाई१० वी पास.

Chandrapur DCC Bank Bharti 2024

Salary Details For Chandrapur DCC Bank Job 2024

पदाचे नाव वेतनश्रेणी
लिपीक२७५०-२२५-३८७५-२७५-५२५०-३२५-६८७५-४००-८८७५-४५०-१११२५-५००-१३६२५
शिपाई२३१०-१६५-३१३५-२००-४१३५-२५०-५३८५-३००-६८८५-३५०-८६३५

Chandrapur DCC Bank Arj 2024 Important Dates

अ. क्र.तपशील दिनांक
संकेतस्थळावर अर्ज भरणे०८ ऑक्टोबर २०२४ सकाळी ११.००
ऑनलाईन परीक्षा शुल्क व अर्ज स्वीकारण्याचा अंतिम दिनांक१९/१०/२०२४ अखेर रात्री १२.०० वाजेपर्यंत
ऑनलाईन परीक्षा प्रवेशपत्र डाउनलोड करण्याची दिनांक बँकेच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल
ऑनलाईन परीक्षा दिनांकबँकेच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल
कागदपत्रे पडताळणी व मुलाखत दिनांकऑनलाईन परिक्षा निकालानंतर बँकेच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल

How To Apply For Chandrapur DCC Bank Application 2024

  • या भरतीकरिता अर्ज उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून थेट अर्ज करावे.
  • अर्ज करण्यापूर्वी, उमेदवारांनी सूचना काळजीपूर्वक वाचावी.
  • अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
  • तसेच, अर्ज करण्याची शेवटची तारीख १९ ऑक्टोबर २०२४ आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

-: महत्वाच्या सूचना :- Important Instruction For Chandrapur DCCB Vacancy 2024


१) उमेदवाराने आपल्या अर्ज भरल्याची प्रत व परीक्षा शुल्क भरल्याची पावती स्वतः जवळ सांभाळून ठेवावी

२) उमेदवारांनी ऑनलाईन परिक्षा शुल्काची रक्कम ऑनलाईन पद्धतीने भरणा करावे लागेल.

३ ) उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज भरतांना त्यांनी शैक्षणिक पात्रता स्वतःच्या ईमेल आयडी मोबाईल क्रमांक व आधारकार्ड क्रमांक अचूक भरणे आवश्यक आहे.

४ ) उमेदवारांनी पदासाठी आवश्यक पात्रता धारक असल्याची खात्री करूनच अर्ज भरावा.

५ ) प्रस्तुत पदांकरीता केवळ उक्त संकेतस्थळावरून ऑनलाईन पध्दतीने अर्ज भरून विहित परिक्षा शुल्क भरलेले अर्ज ग्राह्य धरण्यात येतील. इतर कोणत्याही प्रकारे केलेले अर्ज ग्राह्य धरण्यात येणार नाहीत

६ ) सदर संकेतस्थळाला भरती प्रक्रियेच्या दरम्यान वेळोवेळी भेट देऊन भरती प्रक्रियेची माहितीबाबत अद्ययावत राहण्याची जबाबदारी उमेदवाराची राहील

७ ) उमेदवाराने नोंदणीकृत कार्यालयाच्या पत्त्यावर परीक्षेची पावती/प्रवेशपत्राची पावती किंवा झेरॉक्स प्रत पाठवू नये.

८ ) उमेदवाराने भरलेले परिक्षा शुल्क कोणत्याही परिस्थितीत परत केले जाणार नाही.


भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.​

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.​


Important Links For cdccbank.co.in Notification 2024

📑
PDF जाहिरात
👉
ऑनलाईन अर्ज करा
✅
अधिकृत वेबसाईट




Chandrapur DCC Bank Bharti 2023 Update


: Chandrapur DCC bank said that , we filed an affidavit in the court stating that we are ready to recruit jobs from TCS, an institution appointed by the Cooperative Department. On October 20, 2023, the court disposed of all petitions related to selection of recruitment agencies. Now all eyes are on when the bank will implement the recruitment process. With the recruitment process set to take place, it is once again a good day in the circle of bank directors.​



जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने शासन नियुक्त टीसीएस (टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस) कंपनीच्या माध्यमातून परिक्षा घेवून नोकर भरती केली जाईल असे शपथपत्र न्यायालयात सादर केल्याने दोन वर्षांपासून रखडलेला ३६० पदांच्या नोकर भरतीचा मार्ग अखेर माेकळा झाला आहे. त्यामुळे आता बँकेच्या नोकर भरती प्रक्रियेला गती येणार आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत



येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील नोकर भरती मागील दोन वर्षांपासून विविध कारणांनी रखडली आहे. दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांच्यासह नोकर भरती प्रकरणी केलेल्या असंख्य तक्रारींमुळे जिल्हा बँकेची नोकर भरती रखडली होती. बॅंकेतील ३६० पदांच्या नोकरभरतीला राज्य शासनाने स्थगिती दिली होती. बॅंकेने राज्य शासनाच्या निर्णयाला उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आव्हान दिले. न्यायालयाने ३ मार्च २०२३ रोजी स्थगितीचा आदेश रद्द केला. त्यानंतर लगेच बॅंकेच्यावतीने भरती प्रक्रिया राबविण्यास सुरुवात केली. दरम्यान बँकेने जेएसआर एक्सामिनेशन सर्व्हिस प्रा. लि. या एजन्सीची नोकरभरतीची प्रक्रिया राबविण्यासाठी निवड केली. याच एजन्सीने यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बॅंकेची नोकरभरती प्रक्रिया राबविली. या भरती प्रक्रियेत अनियमितता झाली, अशा तक्रारी झाल्या. त्यानंतर या एजन्सीची चौकशी सुरू झाली आहे.

तत्पूर्वी, दुसरीकडे सहा मार्च २०२३ बॅंकेला सहकार विभागाकडून एक पत्र आले. त्यात सहकार आयुक्तांच्या स्तरावर पात्र संस्थांची तालिका तयार होईपर्यंत बॅंक स्तरावर ऑनलाइन भरती प्रक्रियेसाठी संस्था निवडीची कारवाई करू नये, असे स्पष्ट आदेश देण्यात आले. सहकार विभागाने पात्र एजन्सीची निवड करताना १० वर्षांच्या अनुभवाची अट टाकली. त्यामुळे वर्कवेल इन्फो टेक्नी. प्रा. लि. पुणे ही एजन्सी न्यायालयात गेली. न्यायालयाचा अंतिम आदेश होईपर्यंत पात्र संस्थांची तालिका अंतिम करण्याची प्रक्रिया पूर्ण करता येणार नाही. राज्यातील काही जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकांमध्ये रिक्त पद भरणे आवश्यक आहे. त्यामुळे न्यायालयाचा निकाल येईपर्यंत टीसीएस किंवा आयबीपीएस यांच्याकडून ऑनलाइन पद्धतीने नोकर भरती करावी, असे सहकार विभागाने सुचविले आहे. त्यामुळे नोकर भरतीच्या प्रक्रियेतील गुंतागुंत वाढली आहे.

प्रकरण न्यायायलाय होते. शेवटी बॅंकेच्यावतीने आम्ही सहकार खात्याने नियुक्त केलेल्या टीसीएस या संस्थेकडून नोकर भरती करण्यास तयार आहोत, असे शपथपत्र न्यायालयात दाखल केले. न्यायालयाने २० ऑक्टोंबर २०२३ रोजी नोकर भरती संस्था निवडीसंदर्भातील सर्व याचिका निकाली काढल्या. आता बॅंक नोकर भरतीची प्रक्रिया कधी राबविणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. भरती प्रक्रिया होणार यामुळे आता बँक संचालकांच्या वर्तुळात पुन्हा एकदा सुगीचे दिवस आले आहेत.​





Chandrapur DCC Bank Bharti 2023: Chandrapur District Central Bank recruitment process was conducted in 2013 for the post of Constable and Clerk. A complaint was filed with the Bribery Department alleging that financial transactions were made to increase marks in the interview.​

तब्बल सहा वर्षानंतर चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेतील शिपाई आणि लिपीक पदाच्या नोकरभरती गैरव्यवहार प्रकरणात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. विशेष म्हणजे या प्रकरणातील तक्रारकर्त्यांनाच आरोपी करण्यात आले आहे. यामुळे सहकार क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.

चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेतील २४ शिपाई आणि लिपीक पदासाठी सन २०१३ मध्ये भरती प्रक्रिया घेण्यात आली. मात्र मुलाखतीत गुण वाढवून देण्यासाठी आर्थिक व्यवहार झालाचा आरोप करीत लाचलुतपत विभागाकडे तक्रार दाखल करण्यात आली होती.

या प्रकरणात तत्कालीन अध्यक्ष शेखर धोटे, मुख्य कार्यकारी अधिकारी विजय खेडीकर, संचालक रवींद्र शिंदे नंदाताई अल्लूरवार, पांडुरंग जाधव, ललित मोटघरे, प्रभाताई वासाडे, लक्ष्मी पाटील, अशोक वाहने, निवड समितीतील तीन अधिकारी, एमकेसीएलचे प्रतिनिधी अभंग आरोपी होते. राजकीय दबावामुळे या प्रकरणाची चौकशी संथ गतीने सुरू होती. दरम्यानच्या काळात माजी आमदार एड. वामनराव चटप यांनी या प्रकरणाची सीआयडी चौकशी करावी, यासाठी न्यायालयात याचिका दाखल केली होती.

फिर्यादी झाले आरोपी

बँकेच्या निवड समितीतील सदस्य असलेले रवींद्र शिंदे यांनी आर्थिक देवाणघेवाण संबंधित असलेला असलेला व्हिडिओ लाचलुतपत प्रतिबंधक विभागाकडे सादर केला होता. मात्र हा व्हिडिओ सादर करताना त्यांच्याकडून दिरंगाई झाली होती. त्यामुळे तक्रारकर्ते असतानाही शिंदे यांना आरोपी करण्यात आले.

राज्यात सत्तांतर झाले अन्..

सन २०१३ मध्ये घडलेल्या या प्रकरणाची संथ गतीने चौकशी सुरू होती. राज्यात सत्तांतर झाले आणि या प्रकरणाची फाईल उघडण्यात आली. सहकार खात्याची परवानगी मिळताच गुरुवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने जिल्हा सत्र न्यायालयात या प्रकरणातील ११ आरोपींच्या विरोधात दोषारोप पत्र दाखल केले आहे.


Chandrapur DCC Bank Bharti 2023


The latest update for CDCC Bank Bharti 2022. As per the latest news, The moratorium on the recruitment of Chandrapur District Central Co-operative Bank has been lifted. CDCC Bank Recruitment 2022 will be soon. Further details are as follows:-​

जिल्ह्यातील शेतकरी, शेतमजूर, नोकरदार व सामान्य नागरिकांची बँक (CDCC Bank) असलेली चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील नोकर भरतीवर असलेली स्थगिती 23 ऑक्टोबर 2022 च्या पत्रानुसार राज्य शासनाच्या सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागामार्फत हटविण्यात आली आहे. परिणामी जिल्ह्यातील बेरोजगारांना सुवर्णसंधी प्राप्त झाली असून, बेरोजगारांमध्ये आनंदाचे वातावरण असल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष संतोष रावत यांनी दिली आहे.
Ne.gif

CDCC Bank Recruitment 2023


चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत (CDCC Bank) पुरेसा कर्मचारी वर्ग उपलब्ध नसल्याने त्याचा विपरित परिणाम बँकेच्या दैनंदिन कामकाजावर होत आहे. त्यामुळे नोकर भरतीकरिता बँकेतर्फे राज्य शासनाच्या सहकार विभागाकडे रितसर परवानगी मागण्यात आलेली होती. 17 फेब्रुवारी 2022 च्या सहकार आयुक्तांच्या पत्रानुसार बँकेला 360 पदे सरळ सेवेव्दारे भरण्याची मंजुरी प्राप्त झाली होती. मात्र, भरती प्रक्रिया सुरु असतानाच 12 मे 2022 ला याच विभागातर्फे सरळ सेवेने भरावयाच्या पदास स्थगिती देण्यात आली होती.​

Chandrapur DCC Bank Recruitment 2023


Chandrapur DCC Bank Bharti 2022


Chandrapur DCC Bank Vacancy 2023

  • चंद्रपुर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (CDCC Bank) मुख्यालयातील 6 विभाग, 4 विभागीय कार्यालय व 82 शाखांसह 11 पे ऑफीस, असे एकुण 93 शाखा कार्यरत आहेत.
  • बँकेला एकूण 885 पदे मंजूर असून, आजस्थितीत बँकेत विविध श्रेणीत 501 कर्मचारी कार्यरत आहे.
  • आजच्या स्थितीत 384 पदे रिक्त आहेत व 31 मार्च 2023 पर्यंत 13 पदावरील अधिकारी, कर्मचारी सेवानिवृत्त होत आहेत.
  • सद्यस्थितीत बँकेच्या 93 शाखांमार्फत 501 कर्मचारी घेऊन बँकेचे कामकाज चालविणे म्हणजे तारेवरची कसरत आहे.
  • अशा परिस्थीतीत कर्मचारी भरती न झाल्यास बँकेचे कामकाज बंद पडून ग्राहक सेवेत अडचण निर्माण होऊन शाखा बंद पडण्याची शक्यता आहे, असेही रावत यांनी सांगितले आहे.
  • अकारण राजकारण करुन बँकेला वेठीस धरल्या गेले.
  • मात्र, राज्य शासनाने भरतीबाबत लोकहितार्थ निर्णय घेतला.
  • राज्य शासनाच्या निर्देशांचे पालन करून सर्व भरती प्रक्रिया पारदर्शक पध्दतीने राबवू, अशी प्रतिक्रिया रावत यांनी व्यक्त केली आहे.


Previous Update –

Chandrapur DCC Bank Recruitment Postponed


Chandrapur DCC Bank Bharti 2022 : The state government’s co-operation department had approved the recruitment of 360 posts to the Chandrapur district central bank. However, two previous recruitment cases were disputed. A CBI probe into the scam was demanded by postponing recruitment. Recruitment has finally been postponed. Further details are as follows:-​

राज्य शासनाच्या सहकार खात्याने चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेला 360 पदांच्या नोकर भरतीला मंजुरी दिली होती. परंतु, याआधीचे दोन नोकर भरती प्रकरण वादग्रस्त ठरले होते. नोकर भरतीला स्थगिती देवून या घोटाळ्यांची सीबीआय चौकशी करण्याची मागणी करण्यात आली होती. अखेर नोकर भरतीला स्थगिती देण्यात आली आहे.
  • बँकेच्या संचालक मंडळाचा कार्यकाळ पूर्ण झाला आहे. बँकेत अनेक आर्थिक घोटाळे झाले आहेत.
  • त्यामुळे नोकर भरतीला स्थगिती देवून या घोटाळ्यांची सीबीआय चौकशी करावी, अशी मागणी खा. बाळू धानोरकर व आ. प्रतिभा धानोरकर यांनी केली होती.
  • आता विशेष कार्य अधिकारी व सहनिबंधक महाराष्ट्र शासन यांनी या भरतीला स्थगिती दिली आहे.
  • जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नोकर भरती सोबत गोंदिया, भंडारा जिल्ह्यातील बँकेच्यादेखील समावेश आहे.

चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या विद्यमान संचालक मंडळाचा recruitment Postpond कार्यकाळ सन 2012 ते 2017 पर्यंत होता. याकाळात दोन वेळा नोकरी भरती करण्यात आली. ही नोकर भरती वादग्रस्त ठरली आहे. या मोठ्या प्रमाणात आर्थिक घोटाळा झाल्याची आरोप भरती प्रक्रियेदरम्यान झाला आहे. तसेच या काळात बँक अनेक घोटाळ्यांनी गाजली. एका अध्यक्षाला तुरुंगात जावे लागले. ही शेतकर्‍यांची बँक आहे. परंतु, शेतकर्‍यांच्या हिताचे निर्णय घेण्याऐवजी काही संचालक आपले हितसंबंध जोपासत आहे. संचालक मंडळाचा कार्यकाळ आधीच संपला आहे. सर्वोच्च न्यायालयाने जून 2021 रोजी दिलेल्या आदेशात कार्यकाळ संपलेल्या बँकांवर प्रशासक नियुक्त करुन निवडणूक घेण्याचे आदेश दिले आहे.​

  • परंतु चंद्रपूर मध्यवर्ती बँकेवर अद्याप प्रशासक नियुक्त झाला नाही, याकडे खासदार धानोरकरांनी लोकसभेचे लक्ष वेधले होते.
  • याउलट सहकार खात्याने 360 जणांच्या नोकर भरती मान्यता देवून घोटाळ्यांना खतपाणी घालण्याचे काम केले आहे.
  • याशिवाय बँकेचे मुख्याधिकारी यांच्यावर यापूर्वीच बँकेतील घोटाळा प्रकरणात दोन फौजदारी खटले दाखल आहे.
  • अशा व्यक्तीला सामान्य व्यवस्थापकपदी घेऊ नये, असे रिजर्व बँक, नाबार्ड, सहकार विभागाचे निर्देश आहे.
  • परंतु, याकडे दुर्लक्ष करुन बँकेच्या विद्यमान संचालक मंडळाने त्यांना मुदत वाढ दिली.
  • या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन सहकार विभागाने दिलेल्या आदेशानुसार नोकरभरतीला स्थगिती दिली आहे.

Chandrapur DCC Bank Bharti 2022


: The state government’s co-operation department has approved the recruitment of 165 posts to Chandrapur district central bank. Further details are as follows:-

चंद्रपूर जिल्हा बँक भ्रष्टाचाराच्या विळख्यात गुंतलेली आहे.चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या विद्यमान संचालक मंडळाचा कार्यकाळ सन २०१२ ते २०१७ पर्यंत होता. सुप्रीम कोर्टानं प्रशासक नेमण्याचे आदेश दिले. मात्र, अद्याप प्रशासक नेमण्यात आलेला नाही. राज्य शासनाच्या सहकार खात्याने चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बॅंकेला 165 पदांच्या नोकर भरतीला मंजुरी दिली आहे.​

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत .

Chandrapur DCC Bank Recruitment 2022


चंद्रपूरमधील (Chandrapur) वरोरा भद्रावतीच्या काँग्रेस आमदार प्रतिभा धानोरकर (Pratibha Dhanorkar) यांनी चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या (Chandrapur DCC Bank) कारभारासंदर्भात विधानसभेत विविध प्रश्न मांडले आहेत. धानोरकर यांनी चंद्रपूर जिल्हा बँकेत 165 पदांची भरती करण्यास सहकार मंत्र्यांनी दिली असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. तर, दुसरीकडे चंद्रपूर जिल्हा बँकेची चौकशी करण्यासाठी उच्च स्तरीय समिती नेमण्यात यावी, असं देखील त्या म्हणाले आहेत. चंद्रपूर जिल्हा बँक भ्रष्टाचाराच्या विळख्यात अडकली असल्याचं देखील प्रतिभा धानोरकर यांनी विधानसभेत मांडलं. जिल्हा बँकेतील गैरव्यवहार करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी देखील त्यांनी केलीय. बँकेचा सध्याचा चार्ज ज्यांच्याकडे आहे त्या सीईओंकडून तो चार्ज काढून घ्यावा, अशी मागणी प्रतिभा धानोरकर यांनी ठाकरे सरकारकडे केली आहे. प्रतिभा धानोरकर यांच्या मागणीवर राज्य सरकार काय निर्णय घेणार हे पाहावं लागणार आहे.​

DCC Bank Chandrapur Bharti 2022


यापूर्वीच्या दोन नोकर भरती वादग्रस्त

चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँक व्यवस्थापक यांच्यावर फसवणुकीच्या दोन प्रकरणात 420 चे गुन्हे असून देखील त्यांना बढती देण्यात आली असल्याची बाब प्रतिभा धानोरकर यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली आहे. याआधीच्या दोन नोकर भरती प्रक्रिया वादग्रस्त ठरल्या आहेत. चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या विद्यमान संचालक मंडळाचा कार्यकाळ सन 2012 ते 2017 पर्यंत होता. परंतु, आता पर्यंत संचालक मंडळ बरखास्त झाले नाही. त्याउलट दोन वेगवेगळ्या प्रकरणात 420 कलमाचा आरोपाचा गुन्हा दाखल होऊन देखील मुख्य व्यवस्थापक ती व्यक्ती पदावर कार्यरत आहे. ही बाब अतिशय गंभीर असून तात्काळ चौकशी समिती गठीत करून प्रशासक नेमावा अशी मागणी आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी विधानसभेत केली.​

The post appeared first on .
 
Top
AdBlock Detected

We get it, advertisements are annoying!

Sure, ad-blocking software does a great job at blocking ads, but it also blocks useful features of our website. For the best site experience please disable your AdBlocker.

I've Disabled AdBlock