घरांच्या किमतीत यंदाही होणार वाढ, बाजारमूल्यात साधारण ८ ते १० टक्क्यांनी वाढ झाली – New Home & plot Rates 2024 – 2025

hanuman

Active member
Jalgaon Home Rates


प्रत्येकाचे आपले घरकुल असावे, असे स्वप्न असतात. जळगाव शहरासह जिल्ह्याच्या विस्तार झपाट्याने वाढला आहे. शहराच्या चारही दिशेने व्यापारी संकुल, घरे, अपार्टमेंट मोठ्या संख्येने वाढली आहे. चौफेर विकास झाला आहे. तसेच केंद्र व राज्य सरकारच्या घरकुल योजनेचा देखील अनेकांनी लाभ घेतला. काही दिवसांपासून घरे बांधकाम करण्यासाठी लागणाऱ्या विविध वस्तूंमध्ये देखील वाढ झाली असल्याने घरे, व्यापारी संकुलाचे व्यवहार करून देणारे एजंट (मध्यस्ती) यांनीही दरवाढ केली आहे. जळगावची बाजारपेठ अनेक गोष्टीमध्ये प्रसिध्द आहे.

Jalgaon Home Rates


यंदा जमीन तथा घर खरेदी करणे आवाक्याबाहेर जाणार आहे. कारण १ एप्रिलपासून जमिनीच्या बाजारमूल्यात ८ ते १० टक्क्याची वाढ होणार आहे. त्यामुळे घर खरेदी करणे सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर जाणार आहे. गेल्या वर्षापेक्षा २०२३ ते २४ या महसूल वर्षात जनतेची नवीन घरे घेण्याकडे मोठा कल दिसून आला. त्यामुळे शासनाच्या तिजोरीत २८ मार्च २०२४ पर्यंत ४७.२४ कोटी जमा झाले आहेत. शासनाचे उद्दीष्ट ४९ कोटी रुपये होते. यंदा महसुलात दोन दिवस बाकी असताना मोठ्या प्रमाणात नागरिकांनी घरे- जमीन खरेदीचे व्यवहार जुन्या दरात करावेत, यासाठी ३० व ३१ मार्च रोजी शनिवारी व रविवारी शासकीय कार्यालये सरू राहणार आहेत त्यानंतर जमीनीच्या बाजारमूल्यात वाढ होणार असल्याचे सांगण्यात आले. यावर्षी बाजारमूल्यात साधारण ८ ते १० टक्क्यांनी वाढ झाली असल्याने घर, जमीन खरेदी विक्रीच्या व्यवहारात वाढ होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातील दुय्यम निबंधक तथा विवाह नोंदणी अधिकारी एस. आर. ठाकरे यांनी​

The post appeared first on .
 
Top
AdBlock Detected

We get it, advertisements are annoying!

Sure, ad-blocking software does a great job at blocking ads, but it also blocks useful features of our website. For the best site experience please disable your AdBlocker.

I've Disabled AdBlock