गुढी पाडव्याचा शुभ मुहूर्त; जाणून घ्या यंदाची तिथी, पूजेची वेळ – Gudi Padwa 2024 Muhurat

hanuman

Active member
Gudi-5.jpg


Gudi Padwa 2024 Muhurat – Gudi Padwa 2024 Muhurat time as per panchang is given in following article. Check the auspicious time to make your new year delightful & Happy. The Muhurat details are given Marathi Below, as its Marathi New year.



गुढी पाडव्याला आपल्याकडे नववर्षाची सुरुवात होते. हिंदू दिनदर्शिकेनुसार, गुढी पाडवा हा साडेतीन शुभमुहूर्तांपैकी एक मानला जातो. चैत्र शुद्ध प्रतिपदेच्या या शुभ दिनी नव्या संकल्पांचा शुभारंभ केला जातो. या महिन्यामध्ये पौर्णिमेला चित्रा नक्षत्रात चंद्र असतो. या नक्षत्रावरुन चैत्र हे नाव पडले अशी आख्यायिका आहे. चैत्र महिन्याच्या पहिल्या दिवसाला खगोलीय गणितानुसार विशेष महत्त्व आहे. या दिवशी ब्रम्हदेवाने विश्वाची रचना केली असे म्हटले जाते. काहींच्या मते, गुढी पाडव्याच्या दिवशी सतयुगाची सुरुवात झाली होती. यंदा गुढी पाडवा ०९ एप्रिल २०२३ आहे.



चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढी पाडवा. गुढी पाडव्याच्या दिवशी हिंदू नववर्षाची सुरुवात होते. हा दिवस हिंदू दिनदर्शिकेनुसार खूप शुभ मानला जातो. म्हणून या दिवशी नव्या कामाची सुरुवात करणे फलदायी असते असे मानले जाते. महाराष्ट्रामध्ये हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. गुढी पाडव्यानिमित्त घरोघरी गुढ्या उभारलेल्या पाहायला मिळतात. शोभायात्रांसह नानाविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. अन्य राज्यांमध्येही हा सण साजरा करण्याची परंपरा आहे. गुढी पाडव्याच्या दिवशी गुढीला फार महत्त्व असते. चैत्र शुद्ध प्रतिपदेच्या शुभ मुहूर्तावर लोक पहाटे लवकर उठून स्नान करतात. त्यानंतर गुढी तयार करुन पूजा केली जाते.

The post appeared first on .
 
Top
AdBlock Detected

We get it, advertisements are annoying!

Sure, ad-blocking software does a great job at blocking ads, but it also blocks useful features of our website. For the best site experience please disable your AdBlocker.

I've Disabled AdBlock