खूशखबर! होमगार्डच्या १४३ पदांसाठी भरती प्रक्रिया होणारं!

hanuman

Active member
images-6.jpeg

होमगार्ड आणि नागरी संरक्षक यांची राज्यातील क्षमता सुमारे १५०० आहे; पण सध्या १२३० होमगार्ड सेवेत आहेत. उर्वरित २७० रिक्त पदांमधील १४३ पदे भरण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. या १४३ पदांशिवाय उर्वरित पदे देखील लवकरच भरण्यात येणार आहेत, अशी माहिती पोलिस महासंचालक आलोक कुमार यांनी दिली.

images-6.jpeg


होमगार्ड आणि नागरी संरक्षक वार्षिक दिनानिमित्त आयोजित विशेष परेड कार्यक्रमाला पोलिस महासंचालक आलोक कुमार उपस्थित होते. मुख्यालयाचे डीआयजी अजय शर्मा, डेप्युटी कमांडंट जनरल होम गार्ड अॅडलिडा डिसोझा व इतर अधिकारी उपस्थित होते.



आलोक कुमार म्हणाले की, ‘होमगार्डमध्ये कार्यरत असलेल्या १२३० पैकी ९४५ हे पुरुष तर २८५ या महिला आहेत. ही संख्या आणखी वाढण्याची गरज आहे. पोलिसांनंतर होमगार्डच समाजाच्या सुरक्षितेसाठी तत्पर असतात. होमगार्ड हे आपत्ती व्यवस्थापन, आरोग्य शिबिरे, सरकारी कार्यक्रम, किंवा एखादा धार्मिक कार्यक्रम असले तरी सदैव तत्पर राहत लोकांची मदत करत असतात. एकंदरीत त्यांचे कार्य हे समाजाची योग्य बांधणी करणे आहे. आणि हे कार्य ते निष्ठेने करतात. आगामी काळात पोलिसांसमवेत होमगार्डचीदेखील चांगल्या कामासाठी पुरस्कारसाठी शिफारस येण्याची अपेक्षा आहे.



अॅडलिडा डिसोझा यांनी सांगितले की, ‘होमगार्ड आणि नागरी संरक्षण हे लोकांच्या हितासाठी आणि पोलिसांना मदत व्हावी या हेतूने १९६७ मध्ये पोलिस खात्यांतर्गत सुरू करण्यात आले होते. नंतर १९८१ मध्ये हे स्वतंत्र खाते म्हणून काम करू लागले. जी भरती प्रक्रिया प्रलंबित आहे, त्यांना देखील सुरुवात झालेली आहे. आतापर्यंत होमगार्ड आणि नागरी संरक्षण यांनी दर्जेदार कामगिरी करत समाजात वेगळी ओळख तयार केली आहे. गेल्या वर्षात २३१ होम गार्डना विविध सरकारी कार्यक्रमादरम्यान सन्मानितही केले आहे

The post appeared first on .
 
Top
AdBlock Detected

We get it, advertisements are annoying!

Sure, ad-blocking software does a great job at blocking ads, but it also blocks useful features of our website. For the best site experience please disable your AdBlocker.

I've Disabled AdBlock