खुशखबर! – मनरेगाच्या मजुरीत ४ ते १० टक्क्यांची वाढ! – MGnrega bharti 2024

hanuman

Active member
mgnrega-logo.jpg


MGnrega bharti 2024 – Under the Mahatma Gandhi National Rural Employment Guarantee Scheme (MGNREGA Recruitment 2024), wages have been increased by 4 to 10 percent. So now under MGNREGA the maximum wage in Haryana will be Rs 374 per day. As the model code of conduct is applicable due to the Lok Sabha elections, the Union Ministry of Rural Development on Thursday issued a notification regarding the change in wages after the approval of the Election Commission. The new rates will be applicable from April 1. The objective of MGNREGA is to provide at least 100 days of employment to unskilled labor in rural areas in a financial year under MGnrega bharti 2024.​



महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अर्थात मनरेगा अंतर्गत मिळणाऱ्या मजुरीत ४ ते १० टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे आता मनरेगा अंतर्गत हरियाणात सर्वाधिक ३७४ रुपये प्रतिदिन मजुरी मिळेल. लोकसभा निवडणुकीमुळे आदर्श आचारसंहिता लागू असल्याने निवडणूक आयोगाच्या मंजुरीनंतर केंद्रीय ग्रामविकास मंत्रालयाने मजुरीतील बदलाची अधिसूचना गुरुवारी जारी केली. १ एप्रिलपासून नवे दर लागू होतील. ग्रामीण भागातील अकुशल श्रमिकांना एका आर्थिक वर्षात किमान १०० दिवसांचा रोजगार देणे, हा मनरेगाचा उद्देश आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत



नव्या अधिसूचनेनुसार गोव्यात मजुरीत सर्वाधिक ३४ रुपयांची वाढ करण्यात आली असून, राज्यात आता ३५६ रुपये प्रतिदिन मजुरी मिळेल. आंध्रप्रदेशात मजुरी २८ रुपयांनी वाढून ३०० रुपये रोज झाली आहे. याचप्रमाणे तामिळनाडूत मजुरी २५ रुपयांनी वाढून ३१७ रुपये, तेलंगणात २८ रुपयांनी वाढून ३०० रुपये तर बिहारमध्ये १७ रुपयांनी वाढून २२८ रुपये प्रतिदिन मजुरी मिळेल. आंध्रप्रदेश, गोवा, कर्नाटक आणि तेलंगणात मनरेगाच्या मजुरीत सुमारे १० टक्के वाढ झाली आहे. हरियाणात मजुरीत ४ टक्क्यांचीच वाढ झाली असली या राज्यात देशातील सर्वाधिक ३७४ रुपये प्रतिदिन मजुरी मिळणार आहे. तर अरुणाचल प्रदेश व नागालँडमध्ये सर्वात कमी २३४ रुपये प्रतिदिन मजुरी मिळेल. सिक्कीममधील ग्नथांग, लाचुंग व लाचेन तीन ग्रामपंचायतींमध्ये मात्र हरियाणाच्या बरोबरीने ३७४ रुपये मजूरी देण्यात येते. वर्षाच्या सुरुवातीला संसदेत स्थायी समितीने एक अहवाल सादर करत मनरेगाच्या मजुरीत वाढ करून किमान ३७५ रुपये प्रतिदिन करण्याची आणि राज्यांमधील मनरेगाच्या मजुरीतील तफावत दूर करण्याची शिफारस केली होती.​




जिल्हा प्रशासनाच्यावतीने महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. यासाठी उमेदवारांकडून पोस्टाने अर्ज मागविण्यात येत आहेत. दहावी उत्तीर्ण उमेदवारांना देखील या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. पालघर जिल्हा प्रशासनाच्यावतीने महात्मा गांधी रोजगार हमी योजने अंतर्गत ‘साधन व्यक्ती’ या पदाच्या एकूण 100 रिक्त जागांची भरती केली जाणार आहे. यासाठी उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीसाठी पात्र उमेदवाराने विहित नमुन्यातील हस्तलिखीत अर्ज पालघर उपजिल्हाधिकारी ‘रोहयो’ यांच्या नावे सादर करायचा आहे. या भरतीसाठी अर्जाचा नमुना पालघर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात आला आहे.



पात्र उमेदवारांनी आपले विहित नमुन्यातील अर्ज उपजिल्हाधिकारी रुम.नं 111 पहिला मजला, रोहयो शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय पालघर या पत्त्यावर पाठवून द्यायचे आहेत. अर्ज करण्यासाठी अंतिम मुदत 22 जानेवारी 2024 पर्यंत आहे. तसेच अर्जासोबत आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करणे आवश्यक आहे. उमेदवारांचे अर्ज अपूर्ण असल्यास ते बाद ठरवले जातील.



या भरतीअंतर्गत भरती झालेल्या उमेदवारांना दैनदिन तत्वावर मानधन दिले जाणार आहे. तसेच या साधन व्यक्ती पदासाठी उमेदवार हा दहावी उत्तीर्ण असवा, तसेच उमेदवाराचे वय किमान 18, कमाल वय 50 वर्षापेक्षा जास्त नसावे. निवड झालेल्या उमेदवारांना 4 दिवसांच्या निवासी प्रशिक्षणासाठी पालघर (Palghar) जिल्हाधिकार्याल येथे उपस्थित राहावे लागणार आहे. या भरती प्रक्रियेची सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी उमेदवारांनी पुढील लिंकच्या साहाय्याने जाहिरात पाहावी.


The post appeared first on .
 
Top
AdBlock Detected

We get it, advertisements are annoying!

Sure, ad-blocking software does a great job at blocking ads, but it also blocks useful features of our website. For the best site experience please disable your AdBlocker.

I've Disabled AdBlock