Jobs in Semiconductor – सेमिकंडक्टर निर्मिती आणि पूरक उद्योगांमध्ये मोठ्याप्रमाणावर गुंतवणूक वाढत आहे. चालू वर्षात या क्षेत्रात ४० ते ५० हजार रोजगारनिर्मिती होईल, तर येत्या पाच वर्षांत आठ ते दहा लाख रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत. केंद्र सरकारने नुकतीच सव्वालाख कोटी रुपयांच्या सेमीकंडक्टर प्रकल्पाला मंजुरी दिली. त्यात टाटासमूहाच्या ५० हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचाही समावेश आहे. सेमीकंडक्टर प्रकल्पामध्ये मोठी गुंतवणूक होत असल्याने २०२४मध्ये या क्षेत्रात ४० ते ५० हजार रोजगारनिर्मिती होईल, तर पाच वर्षांत दहा लाखांपर्यंत रोजगार निर्माण होतील, असे रँडस्टेंड या कामगार भरती करणाऱ्या कंपनीच्या अहवालात म्हटले आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील बेरोजगारांसाठी खूशखबर आहे. रत्नागिरीत होणाऱ्या आशिया खंडातील पहिल्या सेमी कंडक्टर प्रकल्पाच्या नोकरभरती प्रक्रियेला निवडणूक जाहीर होण्यापूर्वी सुरुवात झाली होती. उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या प्रयत्नांना अखेर यश आले आहे. पहिल्या टप्प्यात रोजगार संधी उपलब्ध होणार आहे. मंत्री उदय सामंत यांनी गेल्या पाच वर्षांत जिल्ह्यात विविध विकासकामांवर भर दिला. उद्योगमंत्री असताना अनेक उद्योगांना चालना देण्याचे काम त्यांनी केले आहे. तसेच नवनवीन उद्योग आणण्यासाठी प्रयत्न केला. रत्नागिरी येथे आशिया खंडातील पहिला सेमी कंडक्टर प्रकल्प आणला. आता या प्रकल्पाची मुहूर्तमेढ अखेर रोवली गेली आहे. नोकरभरतीच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. पहिल्या टप्प्यात काही तरुणांना संधी दिली जाणार आहे. त्यासाठी कंपनीने जाहिरातदेखील काढली आहे. तसेच या प्रकल्पांतर्गत दीड हजार तरुणांना परदेशात प्रशिक्षणासाठी पाठवण्यात येणार आहे. यामुळे जिल्ह्यातील तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. एकप्रकारे त्यांना दिलासा मिळाला आहे.
The post appeared first on .