खुशखबर! निवडणूक देणार ९ लाख नोकऱ्या, अनेक नोकरीच्या संधी! – New Election Jobs 2024

hanuman

Active member
New Election Jobs 2024

New Election Jobs 2024 – सध्या देशात लोकसभा निवडणुकीचा प्रचार ऐन रंगात आला आहे. १९ एप्रिल रोजी पहिल्या टप्प्याचे मतदान पार पडले आहे. निवडणुकीच्या कामासाठी निवडणूक आयोग, पोलिस प्रशासन, सुरक्षा जवान आणि संबंधित यंत्रणा युद्धपातळीवर काम करीत आहेत; परंतु ही संपूर्ण प्रक्रिया पार पाडताना अनेक कामांसाठी तात्पुरत्या स्वरूपात कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी लागते. या निवडणुकीच्या काळात देशात नऊ लाख हंगामी नोकऱ्या दिल्या जातील, असे उद्योग क्षेत्रातील जाणकारांचे म्हणणे आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत

‘Work India’ या संस्थेचे सीईओ आणि संस्थापक नीलेश इंगरवाल यांनी सांगितले की, देशात मोठ्या प्रमाणात सुरू केलेल्या मतदान केंद्रांमधून अनेक कामांचे नियोजन करावे लागते. यात समन्वयाचे काम महत्त्वाचे असते. यासाठी मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळ नियुक्त करावे लागते. त्यामुळे या काळात किमान ९ लाख तरुणांच्या हाताला काम मिळणार आहे.



मीडिया समन्वयाची कामे
■ मनुष्यबळ पुरविणाऱ्या सीआयईएल कंपनीचे सीईओ आदित्य नारायण मिश्रा यांनी सांगितले की, निवडणुकीमुळे सहा महिन्यांत डेटा विश्लेषण तसेच वर्गीकरण करणाऱ्या संस्थांचे काम वाढले आहे.
■ डेटा विश्लेषण, नियोजन, जनसंपर्क,
■ सर्वेक्षण, मीडिया समन्वय, साहित्य डिझाइन, छपाई, सोशल मीडिया संचालन आदी संबंधित क्षेत्रांमध्ये जवळपास २ लाख रोजगार निर्माण झाले. कर्मचाऱ्यांच्या खाण्यापिण्याची सोय करण्यासाठी समांतर यंत्रणा उभारावी लागते.

जादा मनुष्यबळाची गरज

  • या काळात मतदान केंद्र अधिकारी, क्लार्क, डाटा एन्ट्री ऑपरेटर, वाहनचालक,
  • सुरक्षा रक्षक आणि इतर प्रशासकीय कामांसाठी मनुष्यबळाची नियुक्ती करावी लागते. निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाल्यापासून अंतिम निकाल हाती येईपर्यंत ही मंडळी कार्यरत असतात. सर्व कामे वेळेवर आणि पारदर्शक पद्धतीने
  • पार पाडण्यासाठी हे मनुष्यबळ गरजेचे असते.

The post appeared first on .
 
Top
AdBlock Detected

We get it, advertisements are annoying!

Sure, ad-blocking software does a great job at blocking ads, but it also blocks useful features of our website. For the best site experience please disable your AdBlocker.

I've Disabled AdBlock