आजी माजी सैनिकांच्या मुले आणि राष्ट्रीय पातळीवरील खेळाडूंसाठी येथील मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरतर्फे युनिट मुख्यालय राखीव कोटाअंतर्गत २ जानेवारीपासून अग्निवीर सैन्य भरती मेळाव्याचे आयोजन केले आहे. यात अभिवीर जनमत डयूटी (जीडी), अग्निवीर ट्रेडमन, क्लार्क, स्टोअर किपर, टेक्निकल या जागा भरल्या जाणार आहेत. शहीद जवानांची मुले, सेवारत जवान व माजी सैनिकांच्या मुलांसाठी ही भरती प्रक्रिया आहे. मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेटल केंद्राच्या शिवाजी स्टेडियमवर भरती होणार आहे. २ जानेवारीला राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील खखेळांडूंसाठी अग्निवीर जीडी पदासाठी भरती होईल. ३ रोजी महाराष्ट्रतील अहमदनगर, जालना, कोल्हापूर, लातूर, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, बीड, भंडारा, बुलढाना, चंद्रपूर, धुळे, गडचिरोली, गोंदिया, हिंगोली, जळगाव, मुंबई शहर, मुंबई सबअर्थन भागातील उमेदवारांसाठी जोडी भरती होईल.
भांडारा, गडचिरोली, वर्धा,गोंदिया, हिंगोली, जळगाव, मुंबई शहर मुंबई सबअर्चन भागातील उमेदवारांसाठी जीडी भरतो होईल. ४ रोजी नागपूर, नदिड, नंदूरबार, नाशिक, धाराशिव, पालघर, परभणी, पुणे, रायगड, रत्नागिरी, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, सोलापूर, ठाणे, वर्धा, वाशिम, यवतमाळ येथील उमेदवारांसाठी भरती होईल. मध्य प्रदेश, छतिसगड, गोवा, गुजरात, आंध्र प्रदेश व बेळगावसह कर्नाटकातील उमेदवारांसाठी उमेदवारांसाठी ६ रोजी भरती असेल, अग्निवीर ट्रेडमन पदासाठी ७ ला भरती प्रक्रिया होणार आहे.
देशभरातील उमेदवार आजी- माजी सैनिकांची मुले यात भाग घेऊ शकतात. ८ रोजी एक दिवस सर्व ट्रेड साठी आरक्षित आहे. अग्निवीर जोडी पदासाठी उमेदवाराचे वय १७ वर्षे ६ महिने ते २९ वर्षे मयोमर्यादा आहे. उमेदवारचा जन्म १ ऑक्टोबर २००३ ते १ एप्रिल २००७ काळातील असावा, असे कळविले आहे.
ही कागदपत्रे लागणार
- अग्निवीर जीडीपदासाठी किमान ४५ टक्क्यांसह उमेदवार दहावी उत्तीर्ण असावा = ट्रेडमन पदासाठी किमान आठवी ते दहावी उत्तीर्ण आवश्यक
- सैन्य भरतीला येणारा उमेदवारांना रिलेशन सर्टिफिकेट सादर करावे लागणार रहिवासी दाखला, २५ रंगीत पासपोर्ट साईजचे फोटो
- जिल्हा पोलिस अधीक्षकांकडून वर्तणूक दाखला
- अविवाहित असल्याचे प्रमाणपत्र
- जात प्रमाणपत्र सोबत आणावे
The post appeared first on .