Sevak Kalyan Nidhi Yojna 2024
कोल्हापुरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाने कर्मचाऱ्यांच्या हितासाठी ‘सेवक कल्याण निधी’ योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत दरमहा कर्मचाऱ्यांकडून १०० रुपये वर्गणी स्वरूपात जमा करून गरजू कर्मचाऱ्यांना आकस्मिक खर्च, शिक्षण, व वैद्यकीय कारणांसाठी मदत केली जाणार आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत
या योजनेचे उद्दिष्ट प्रशासकीय सेवकांना तातडीच्या गरजा भागवण्यासाठी आर्थिक मदत व कर्ज उपलब्ध करून देणे आहे. कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांच्या मार्गदर्शनाखाली, प्रशासकीय व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी ही योजना राबवण्यात आली असून, ३६ हप्त्यांत पगारातून परतफेडीची सुविधा देण्यात येणार आहे. कर्जावर ६% व्याजदर असेल, आणि सभासदांच्या निधनाच्या स्थितीत ७ हजार रुपयांची मदत देण्याची तरतूद आहे.
वर्गणी स्वरूपात जमा झालेल्या रकमेपैकी ९५% रक्कम कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतर परत दिली जाईल. विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने ता. ७ जून रोजी योजनेला मंजुरी दिली असून, ता. १५ ऑक्टोबरला नियमावलीची मंजुरी देण्यात आली आहे.
The post appeared first on .