एप्रिलमध्ये १४ दिवस बँका बंद! – रिझर्व्ह बँकेने सुट्यांची ही यादी प्रकाशित!- Bank Holiday in April 2024

hanuman

Active member
Bank-Holiday-in-April-2024.jpg


मित्रांनो, एप्रिल २०२४ मध्ये विविध सुट्यांमुळे देशातील बँका १४ दिवस बंद राहणार आहेत. स्थानिक सुट्यानुसार देशाच्या विविध भागांत सुट्यांची संख्या कमी-जास्त होऊ शकते. रिझर्व्ह बँकेने सुट्यांची ही यादी जारी केली असून त्यात रविवार तसेच दुसऱ्या व चौथ्या शनिवारच्या सुट्यांचा समावेश आहे.

शनिवार रविवारच्या सुट्या – ७ एप्रिल, १४ एप्रिल, २१ एप्रिल आणि २८ एप्रिल या तारखांना रविवार आहे. तसेच १३ एप्रिल रोजी दुसरा शनिवार, तर २७ एप्रिल रोजी चौथा शनिवार आहे.

एप्रिलमध्ये बँका कधी बंद राहतील? Bank Holiday in April 2024


Bank-Holiday-in-April-2024.jpg


1 एप्रिल 2024: जेव्हा जेव्हा आर्थिक वर्ष संपते तेव्हा बँकेला संपूर्ण आर्थिक वर्षासाठी खाते बंद करावे लागते. त्यामुळे देशभरातील बँकांना सुट्टी असेल.

5 एप्रिल 2024: बाबू जगजीवन राम यांच्या जयंती आणि जुम्मत-उल-विदा निमित्त तेलंगणा, जम्मू आणि श्रीनगरमध्ये बँका बंद राहतील.

9 एप्रिल 2024: बेलापूर, बेंगळुरू, चेन्नई, हैदराबाद, इंफाळ, जम्मू, मुंबई, नागपूर, पणजी आणि श्रीनगरमध्ये गुढीपाडवा/उगादी सण/तेलुगु नववर्ष आणि पहिल्या नवरात्रीच्या निमित्ताने बँका बंद राहतील.

10 एप्रिल 2024: कोची आणि केरळमध्ये ईदमुळे बँका बंद राहतील.

11 एप्रिल 2024: ईदमुळे देशभरातील अनेक बँका बंद राहतील, परंतु चंदीगड, गंगटोक, इंफाळ, कोची, शिमला, तिरुअनंतपुरम येथील बँका खुल्या राहतील.

15 एप्रिल 2024: हिमाचल दिनानिमित्त गुवाहाटी आणि शिमलामध्ये बँका बंद राहतील.

17 एप्रिल 2024: रामनवमी 17 एप्रिल रोजी आहे. रामनवमीच्या मुहूर्तावर अहमदाबाद, बेलापूर, भोपाळ, भुवनेश्वर, चंदीगड, डेहराडून, गंगटोक, हैदराबाद, जयपूर, कानपूर, लखनौ, पाटणा, रांची, शिमला, मुंबई आणि नागपूरमध्ये बँका बंद राहतील.

20 एप्रिल 2024: गर्या पूजेच्या निमित्ताने आगरतळामध्ये बँका बंद राहतील.



The post appeared first on .
 
Top
AdBlock Detected

We get it, advertisements are annoying!

Sure, ad-blocking software does a great job at blocking ads, but it also blocks useful features of our website. For the best site experience please disable your AdBlocker.

I've Disabled AdBlock