महाराष्ट्र कमांडो फोर्स भरतीची बनावट जाहिरात समाजमाध्यमांवर दिली गेली आणि ९३ उमेदवारांना ५ लाख ५८ हजार रुपयांचा गंडा घालण्यात आला. बनावट सैन्य अधिकारी बनून भामट्यांनी मैदानी चाचणीही घेतली. पोलिसांनी तिघांना अटक केली. सीबीआयमध्ये बनावट भरतीचा प्रयत्न `स्पेशल २६` चित्रपटात रंगवून दाखविला आहे. अशाच स्वरूपाचा प्रकार शहरात घडला. समाजमाध्यमांवर महाराष्ट्र कमांडो फोर्स भरतीची बनावट जाहिरात देऊन ९३ उमेदवारांना प्रत्येकी ६ हजार रुपये या प्रमाणे एकूण ५ लाख ५८ हजारांना गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला. एवढेच नाही, तर सैन्य दलाच्या अधिकाऱ्यांच्या वेशात येऊन तीन भामट्यांनी या तरुणांची सांस्कृतिक क्रीडा मंडळाच्या मैदानावर मैदानी चाचणीही घेतली! मात्र, उमेदवारांना याबाबत संशय येताच त्यांनी पोलिसांना कल्पना दिली. पोलिसांनी तत्काळ तिघांना बेड्या ठोकल्या.
आरोपींना शुक्रवारपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. प्रकरणात निखिल निंबा बागूल (वय २१, रा. जयभवानीनगर, सिल्लोड) याने दिलेल्या तक्रारीचा आशय असा बागूल याला ११ डिसेंबरला व्हॉट्सअप क्रमांकावर महाराष्ट्र कमांडो फोर्स (एमसीएफ) भरतीची जाहिरात आली. यामध्ये भरती ऑफ लाइन असल्याचे सांगण्यात आले. या जाहिरातीला प्रमाणे १७ डिसेंबरला सकाळी ६.३० वाजेच्या दरम्यान बागूल हा सांस्कृतिक क्रीडा मंडळ मैदान खडकेश्वर येथे पोचला. या ठिकाणी मैदानी चाचणी घेण्यात आली. आर्मीच्या गणवेशात आलेल्या काही जणांनी भरतीसाठी आलेल्या तरुणांना रांगेत उभे केले. ही भरती कंत्राटी स्वरूपाची असून, ११ महिन्यांचे अग्रीमेंट होईल. प्रति महिला १२ हजार रुपये वेतन दिले जाईल असे सांगितले.
यानंतर भरतीसाठी आलेल्या उमेदवारांकडून त्यांच्या शैक्षणिक पात्रतेच्या कागदपत्रांची छायांकित प्रत घेऊन, १२०० मीटर धावणे, गोळाफेक, अशा चाचण्या ही घेण्यात आल्या. या चाचणीत बागुल याला फोन करून ‘तुम्हाला ५० पैकी ४० गुण मिळाले. तुम्ही मैदानी चाचणीत उत्तीर्ण झाले आहात. तुमची एमसीएफमध्ये निवड झाली’ असे सांगितले; तसेच पुढील प्रक्रियेसाठी बुधवारी दुपारी १ वाजता सांस्कृतिक मंडळ मैदानावर बोलविण्यात आले. या भरतीपूर्वी युवकांकडून सहा हजार रुपये ऑनलाइन घेण्यात आले. भरतीसाठी ९३ मुले मैदानावर आली होती. पण, तक्रारदारासह इतर उमेदवारांना शंका आली. त्यांनी भरतीबाबत चौकशी केली. तेव्हा संस्थेने भरती घेण्यासाठी कुठलीही परवानगी घेतली नसल्याची माहिती समोर आली. तपास सहायक निरीक्षक दिलीप चंदन करीत आहेत.

The post appeared first on .