आशा स्वयंसेविकांच्या मानधनवाढ थकीत रक्कम त्वरित मिळावी! । Asha Swayamsevika Bhatta Increment

hanuman

Active member
BIJ Bhandwal Yojana

Asha Swayamsevika Bhatta Increment

महाराष्ट्रातील ६९ हजार आशांना एक नोव्हेंबर २०२३ पासून दरमहा पाच हजार रुपये मानधन वाढ देण्याच्या घेतलेल्या शासन निर्णयाची त्वरित अंमलबजावणी करावी. महाराष्ट्रातील प्रत्येक आशा सेविकेस थकीत तीस हजार रुपये मानधन वाढीची रक्कम त्वरित मिळावी; अन्यथा तीव्र आंदोलन उभारणार, अशी मागणी महाराष्ट्र राज्य आशा गटप्रवर्तक व आरोग्य कर्मचारी संघटनेच्या जनरल सेक्रेटरी कॉ. सुमन पुजारी व अध्यक्ष कॉ. शंकर पुजारी यांनी केली.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत





त्यांनी याबाबत १० मे रोजी मुख्य सचिव डॉ. नितीन करीर, मिलिंद म्हैसकर, सार्वजनिक आरोग्य विभागाचे अप्पर मुख्य सचिव व धीरज कुमार राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे अभियान संचालक यांना ईमेलद्वारे निवेदन पाठविले आहे. निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्रातील आशा व गटप्रवर्तक महिलांनी १८ ऑक्टोबर २०२३ पासून मार्च २०२४ पर्यंत बेमुदत संप केल्यानंतर दि. १३ मार्च रोजी महाराष्ट्र शासनाने राज्यातील सर्व ६९ हजार आशांना दरमहा पाचशे रुपये मानधन वाढ देण्याचा निर्णय केला. निर्णय होऊन सात महिने होत आले तरीही ही रक्कम आशांना मिळालेली नाही. आशांना मिळणारे मानधन वाढत्या महागाईत अत्यंत अपुरे आहे. म्हणूनच किमान मागील सहा महिन्यांची तीस हजार रुपये मानधन वाढीची रक्कम महाराष्ट्रातील प्रत्येक आशांना त्वरित मिळावी; अन्यथा त्यांना तातडीने तीव्र आंदोलन करावे लागेल. तसेच आशांना पगारवाढ झाल्याने आरोग्य खात्यातील शासकीय अधिकारी आशांना नेमून दिलेल्या कामाशिवाय इतर कामे सांगत आहेत. अशा अधिकाऱ्यांवर सुद्धा कारवाई करावी, अशी मागणी या निवेदनात केली आहे.​




राज्यातील आशा स्वयंसेविकांना राज्य शासनाच्या नि‍धीतून दिल्या जाणाऱ्या 5 हजार रुपयांची वाढ करण्यास मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. मानधनातील ही वाढ नोव्हेंबर, 2023 या महिन्यापासून देण्यात येईल. 2023-24 या आर्थिक वर्षामध्ये नोव्हेंबर 2023 ते मार्च 2024 या कालावधीत वाढीव दराने मानधन देण्यासाठी आवश्यक असलेली 200.21 कोटी इतक्या अतिरिक्त खर्चास मान्यता देण्यात आली. तसेच 961.08 कोटीच्या वार्षिक खर्चास मान्यता देण्यात आली.


: Good News For Aasha Swayamsevika !! 7 thousand increase in salary of Asha volunteers. Similarly, Health Minister Tanaji Sawant announced that group promoters will get Rs 6,200 each and Diwali bonus of Rs 2,000 each will be given to Asha and group promoters. Know More about aasha swayamsevika Bhatta Increment at below​

आशा स्वयंसेविकांच्या मानधनात ७ हजार रुपयांची वाढ. त्याचप्रमाणे गट प्रवर्तकांना प्रत्येकी ६ हजार २०० रुपये मानधन वाढ आणि आशा व गट प्रवर्तकांना प्रत्येकी २ हजार रुपये दिवाळी बोनस देण्यात येणार असल्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी जाहीर केले.

Asha Swayamsevika Mandhan


Asha Swayamsevika Mandhan














गेल्या तीन ते चार महिन्यांपासून कोरोना महामारी सामना करण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांच्या मोबदल्यात वाढ करणारा शासन निर्णय आज झाला आहे. मोबदल्यात वाढ करावी अशी मागणी सातत्याने होत होती. या मागणीची दखल घेत राज्य सरकारने घेतली असून आशा स्वयंसेविका व गट प्रवर्तक यांना जुलैपासूनच वाढीव मोबदल्याचा लाभ मिळणार आहे.

आशा स्वयंसेविकांना केंद्र शासनाकडून नियमित चार कामांसाठी प्राप्त होणाऱ्या मोबदल्याच्या समप्रमाणात कमाल दोन हजार रुपयापर्यंत दरमहा वाढ करण्यास करण्यात आली आहे. तसेच गटप्रवर्तक यांना दरमहा तीन हजार रुपये राज्य शासनाच्या निधीतून मोबदला देण्यास मंजुरी देण्यात आली आहे. मोबदला वाढल्याने वर्षाला सरासरी 170 कोटी रुपये राज्यासाठी लागणार आहेत. या 170 कोटी रुपयांना ही मान्यता देण्यात आली आहे. 1 जुलैपासून या वाढीव मोबदल्याची अंमलबजावणी केली जाणार आहे.

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत राज्यात आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक कार्यरत आहेत. केंद्र शासनाच्या सूचना, निकष व दराप्रमाणे राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत प्रकल्प अंमलबजावणी आराखड्यात मंजूर करण्यात आलेल्या अनुदानातून आशा स्वयं सेविका व गटप्रवर्तक यांना मोबदला दिला जातो. राष्ट्रीय आरोग्य अभियानातून नेमून दिलेल्या एकूण 78 सेवा केल्यास हा मोबदला मिळतो. अशा स्वंय सेविकांच्या मोबदल्यात वाढ करावी यासाठी विविध स्तरावर व विविध ठिकाणाहून मागणी होत होती.​

The post appeared first on .
 
Top
AdBlock Detected

We get it, advertisements are annoying!

Sure, ad-blocking software does a great job at blocking ads, but it also blocks useful features of our website. For the best site experience please disable your AdBlocker.

I've Disabled AdBlock