आरोग्यसेवक, ग्रामसेवक पदाच्या परीक्षा खोळंबल्या!! – Arogya Vibhag Exam Date 2023

hanuman

Active member
ExamDates.jpg

Arogya Vibhag Exam Date 2023 – Arogya Exam Schedule Out

जि.पच्या विविध ६२६ पदांसाठी भरती प्रक्रीया पार पडली असुन पेसातील पदाच्या कारणामुळे आरोग्य सेवक व ग्रामसेवक पदांची भरती लांबणीवर पडली व पदांच्या झालेल्या परिक्षांची तात्पुरती निवड व प्रतिक्षा यादी लावली असुन यातील पाच केडरच्या नियुक्त्या देण्यात आल्या आहे. अन्य दोन केडरच्या नियुक्त्या आता आचारसंहिता असल्यामुळे थांबल्या असुन आरोग्य पर्यवेक्षक पदाचे निकाल जाहिर झाले असले तरी त्यात पात्र उमेदवार मिळाले नाही.

राज्यभरात अमृत महोत्सव वर्षानिमित्त शासनाने जि.पच्या विविध पदांसाठी भरती प्रक्रीया राबवली होती. राज्यभरात जि.प सरळ सेवा भरती शासनाने आबीपीएसच्या माध्यमातून राबविली होती व अर्ज मागविण्यात परिक्षा घेण्यात आल्या होत्या. ऑक्टोबर व नोहेंबर महिन्यात या परिक्षा घेण्यात आल्या होत्या. त्यात आरोग्य सेवकच्या ४० टक्के ५० टक्के आरोग्य सेविका, ग्रामसेवक या पदासाठी देखील मोठ्या प्रमाणात अर्ज आले असले तरी या पदांच्या भरतीत पेसा पदांचा वाद थेट न्यायालयात गेल्याने ही भरती लांबणिवर पडली आहे.​

अर्ज अधिक पण भरती लांबणीवर
• जि. पच्या भरतीची प्रक्रीया २६ जानेवारी पर्यंत पुर्ण होईल असे सांगण्यात आले होते. मात्र प्रत्यक्षात या भरतीत सर्वाधिक अर्ज आरोग्यसेवक, आरोग्य सेविका, ग्रामसेवक या पदांसाठी आले आहेत. मात्र ही भरती न्यायलयीन कामकाजात अडकली होती. प्रशासनाकडून प्राप्त माहितीनुसार न्यायालयाने पेसाची पदे वगळता भरती प्रक्रीया सुरू करण्याचे आदेश दिले आहे. आयबीपीएस कंपनीकडून परिक्षा सेंटरचे नियोजन देखील सुरू करण्यात आले होते. मात्र अजून परिक्षांचे नियोजन झाले नसल्याने ही परिक्षा लांबणिवर पडली असल्याचे समजते.



: Arogya Vibhag Group C and D Exam Schedule and Instructions has been Out on arogya.maharashtra.gov.in. Candidates who have applied for Arogya Vibhag Mega Bharti can check Their Arogya Vibhag Exam Dates. As Per latest Notice published by Maha Health Department, Arogya Vibhag Exam is started from 30th November 2023 Till 12th December 2023. Know Full Maharashtra PHD Exam Schedule 2023 from below link:​

आरोग्य विभाग गट C आणि D परीक्षेचे नवीन वेळापत्रक आणि सूचना arogya.maharashtra.gov.in वर जाहीर करण्यात आलेली आहे. ज्या उमेदवारांनी आरोग्य विभाग मेगा भरतीसाठी अर्ज केला आहे ते त्यांच्या आरोग्य विभाग परीक्षेच्या तारखा तपासू शकतात, व वेळापत्रकात असलेले नवीन बदल काळजीपूर्वक बघावे . महाआरोग्य विभागाने प्रसिद्ध केलेल्या ताज्या सूचनेनुसार, आरोग्य विभाग परीक्षा 30 नोव्हेंबर 2023 पासून सुरु होत आहे. ही परीक्षा 12 डिसेंबर 2023 पर्यंत चालेल. खालील लिंकवरून संपूर्ण महाराष्ट्र आरोग्य विभाग परीक्षा वेळापत्रक 2023 जाणून घ्या.

newicon.gif

Exam Schedule – Public Health Department


Exam Schedule - Public Health Department



Maha Health Department Exam Date


Aarogya Vibhag Postpone New Exam Dates – The state’s public health department is filling up 10,949 class-III and IV posts for various posts in Group ‘C’ and Group ‘D’, which were postponed by the health department in 2021 under Arogya Vibhag Exam Date 2023. So far, 2.25 lakh candidates have applied for the same. The health department has rejected TCS’ proposal to conduct the exam in December for these seats. The health department said it has directed TCS to conduct the Arogya Vibhag Exams 2023 only in November.



आरोग्य विभागामार्फत २०२१ मध्ये स्थगित केलेल्या गट ‘क’ व गट ‘ड’ मधील विविध पदांसाठी राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे वर्ग-३ व ४ च्या दहा हजार ९४९ जागा भरल्या जात आहेत. त्यासाठी आतापर्यंत सव्वादोन लाख उमेदवारांनी अर्ज केले आहेत. या जागांसाठी डिसेंबरमध्ये परीक्षा घ्यावी, या टीसीएस कंपनीच्या प्रस्तावास आरोग्य विभागाने नकार दिला आहे. ही परीक्षा नोव्हेंबरमध्येच घ्यावी, असे निर्देश ‘टीसीएस’ला दिल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले.



“अतिशय तत्परतेने परीक्षा प्रक्रिया राबवित आहोत. आरोग्य भरतीची परीक्षा नोव्हेंबरमध्ये घेण्यात आमची मागणी असून डिसेंबरमध्ये परीक्षा घेण्याच्या ‘टीसीएस’च्या प्रस्तावाला आम्ही नकार दिला आहे,” असे आरोग्य सेवा आयुक्त धीरज कुमार यांनी सांगितले. आरोग्य विभागाकडून रद्द झालेल्या परीक्षेच्या शुल्काचे १०० कोटींपेक्षा जास्त पैसे अडकलेले आहेत.​






राज्यातील ग्रामविकास विभागाच्या गट क अंतर्गत येणाऱ्या आरोग्य विभागाची 15 आणि 16 ऑक्टोबर रोजी होणारी परीक्षा (Maharashtra Health Department Exam) रद्द करण्यात आली आहे. याच दिवशी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (MPSC) परीक्षा होत असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. या परीक्षेसंबंधी नवीन वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.

Aarogya vibhga exam date 2022


आरोग्य विभागाची ही परीक्षा प्रत्येक जिल्ह्यात घेण्यात येणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखालील जिल्हा दुय्यम निवड मंडळामार्फत ही भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. या आधी 15 आणि 16 ऑक्टोबरला या पदांसाठी परीक्षा (Maharashtra Health Department Exam) घेतली जाणार होती. तर 17 ते 31 ऑक्टोबर दरम्यान परीक्षेचा निकाल जाहीर करून यासाठीच्या पात्र उमेदवारांची यादी सुद्धा जारी करण्यात येणार होती. आता ही परीक्षा रद्द करण्यात येणार असून नवीन वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. एबीपी माझाने (ABP Majha Impact) रखडलेल्या या भरतीबाबतचे वृत काही दिवसांपूर्वी दिले होते.



आरोग्य सेवक भरतीची ही परीक्षा मार्च 2019 पासून रखडलेली आहे. या आधी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाशी संबंधित भरतीचे (Health Department Recruitment) विस्तृत वेळापत्रक आणि त्याबद्दलचा शासन निर्णय जाहीर करण्यात आला होता. मार्च 2019 च्या जिल्हा परिषदेच्या अखत्यारीतील आरोग्य विभागाशी सबंधित गट-क पदांच्या भरती बाबतशासन निर्णय जारी करण्यात आला होता.



गट क मध्ये आरोग्य सेवक ,आरोग्य सेविका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, औषध निर्माता, आरोग्य पर्यवेक्षक या पाच पदासाठी ही मुख्यत्वे करून भरती केली जाणार आहे. जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत आरोग्य विभागाच्या सर्व रिक्त पदांसाठी ही भरती परीक्षा जिल्हा निवड मंडळामार्फत घेतली जाईल.

ExamDates-800x427.jpg


महाराष्ट्र राज्य सामान्य प्रशासन विभागाच्या दि. ४ मे, २०२२ च्या शासन निर्णयातील सूचनांनुसार मार्च, २०१९ व ऑगस्ट, २०२१ ( अपंग व इतर सुधारित आरक्षणासह ) महाभरती अंतर्गत ग्रामविकास विभागाच्या अखत्यारीतील जिल्हा परिषद अंतर्गत गट – क मधील आरोग्य विभागाशी संबंधित ५ संवर्गातील पदभरती करण्याकरीता परिक्षा घेण्याबाबत वेळापत्रक दि. २६ ऑगस्ट, २०२२ च्या शासन निर्णयानुसार निश्चित करण्यात आला होता.

त्यानुसार आगामी महाभरती दि. १५ व १६ ऑक्टोबर, २०२२ या दिवशी घेण्याचे जवळपास निश्चितच होते, परंतु खालील दोन कारणांमुळे हि मेगा भरती आणखीन काही दिवस किंवा महिन्यांनी पुढे ढकलण्यात आलेली आहे. ज्या दोन कारणांमुळे या मेगा भरतीला उशीर होणार आहे ते पुढील प्रमाणे आहेत.

१) मा. मुख्य सचिव, महाराष्ट्र राज्य यांचेकडे झालेल्या बैठकीतील चर्चेनुसार येणाऱ्या मेगाभरतीत मिळालेल्या काही सूचनांचा समावेश करून नव्याने सर्वसमावेशक मार्गदर्शक सूचना पुढच्या जीआर द्वारे जाहीर केले जाईल.

२) दि. १५ व १६ ऑक्टोबर, २०२२ या दिवशी मेगा भरती होणार होती परंतु याच दिवशी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षेचा दिवस आलेला आहे, त्यामुळे उमेदवारांचे नुकसान होऊ नये म्हणून, या महाभरतीस स्थगिती देण्यात येत आहे. ZP Arogya Vibhag Exam Date बाबत सुधारित मार्गदर्शक सूचना प्राप्त झाल्यानंतर याबाबत यथावकाश कळविण्यात येईल.

Zp आरोग्य विभाग परीक्षा 15,16 ऑक्टोंबर रोजी पूर्वनियोजित तारीख रद्द करण्यात आली आहे. एक लक्षात ठेवा जे पूर्ण भरती प्रक्रिया रद्द झाली असल्या ज्या बातम्या 2-3 दिवसापूर्वी येत होत्या, की नव्याने जाहिरात प्रसिद्ध होणार हे पूर्णपणे चुकीचे आहे.

कारण या Gr मध्ये तसा कोणताही उल्लेख केलेला नाही. त्याच दिवशी MPSC ची परीक्षा येत असल्याने ही date postponed करत आहे, असे कारण दिले आहे. तरी काही लोकांनी निवेदन देऊन ही भरती मुद्दाम पुढे ढकलण्यात आली आहे. विद्यार्थी जे exam देणार आहेत त्यांना विश्वासात न घेता 4 वर्षापासून किती वेळा परीक्षा तारखा पुढे ढकलनार.

विद्यार्थ्यांमध्ये एकीचा अभाव आहे हे या निर्णयाने स्पष्ट झाले. जिल्हा परिषद भरती शासन निर्णय सरळसेवा भरती बाबत या सरकारचे नवीन धोरण/निर्देश येण्याच्या शक्यतेमुळे जिल्हा परिषद पदभरतीचे संभावित वेळापत्रक स्थगित. ZP भरतीचे नवीन वेळापत्रक यथावकाश जाहीर करण्यात येईल.

स्पर्धा परीक्षा समन्वय समितीचे नीलेश गायकवाड म्हणाले, की एमपीएसीकडून जवळपास महिनाभर आधी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले होते. त्यामुळे आरोग्य भरतीचे वेळापत्रक निश्चित करताना शासनाने त्या दिवशी अन्य परीक्षा नाहीत ना, याची खातरजमा करणे आवश्यक होते. आता दोन्ही परीक्षा एकाच दिवशी होणार असल्याने उमेदवार अडचणीत आले आहेत. त्यामुळे आरोग्य भरती परीक्षेच्या तारखा बदलण्याची आवश्यकता आहे.



The post appeared first on .
 
Top
AdBlock Detected

We get it, advertisements are annoying!

Sure, ad-blocking software does a great job at blocking ads, but it also blocks useful features of our website. For the best site experience please disable your AdBlocker.

I've Disabled AdBlock