आरोग्यसेवकांची भरती रखडल्याने ग्रामीण आरोग्य सेवा विस्कळीत, आता भरती.. – Aurangabad Aarogya vibhag Bharti 2024

hanuman

Active member
Arogya Vibhag Sindhudurg Bharti 2024

Arogya Vibhag Aurangabad Bharti 2024 @ arogya.maharashtra.gov.in




राज्यातील सर्व जिल्हा परिषदांच्या आरोग्य सेवक आणि आरोग्य सेविकांच्या मेगाभरतीला ‘पेसा’ कायद्यामुळे खीळ बसली आहे. दरम्यान, मोठ्या संख्येने ही पदे रिक्त असल्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्रे व उपकेंद्रांतर्गत ग्रामीण आरोग्य सेवा बाधित झाली आहे. यावर पर्याय म्हणून रोजंदारीवर परिचारिका नियुक्त करण्याच्या सूचना शासनाने दिल्या आहेत. परंतु, महिन्यातील केवळ चारच लसीकरणसत्रांचे वेतन अदा करण्याच्या सूचना असल्यामुळे आरोग्य केंद्रांकडे कोणी फिरकेनासे झाले आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासाठी आरोग्य सेविकांची २४४, तर आरोग्यसेवकांच्या ५७ पदांसाठी ऑगस्ट महिन्यात पदभरतीची जाहिरात निघाली होती. दरम्यान, ‘पेसा’ कायद्यांतर्गत या दोन पदांची भरती न्यायालयाच्या आदेशानुसार थांबविण्यात आली. दरम्यान, सेवानिवृत्ती आणि पदोन्नतीमुळे आज घडीला जिल्ह्यातील ५१ प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्रांत आरोग्यसेविकांची ३०० पेक्षा अधिक पदे रिक्त आहेत, तर आरोग्यसेवकांची ८०च्यावर पदे रिक्त आहेत. त्यामुळे प्रसूती, बालके व गरोदर मातांचे लसिकरणसत्र, सर्वेक्षण, गृहभेटी, गरोदर मातांची तपासणी व पोर्टलवर अपडेशन तसेच ओपीडी आदी सेवा कोलमडली आहे. याकडे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांनी पत्राद्वारे ग्रामविकास विभागाच्या सचिवांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. ज्या जिल्ह्यात ‘पेसा’चे उल्लंघन होणार नाही, तिथे आरोग्यसेवक व सेविकांची भरतीप्रक्रिया राबविण्यास हरकत नाही, असे पत्राद्वारे कळविण्यात आले होते. मात्र, त्या पत्राची सचिवस्तरावर दखल घेण्यात आली नाही. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत

जवळपास एक दशकानंतर जिल्हा परिषदेच्या रिक्त जागांसाठी भरती निघाली. यामुळे इच्छुकांनी भरभरून अर्ज केले. त्यानंतर अडथळ्यांची शर्यत पार करत परीक्षेच्या तारखा जाहीर झाल्या. मात्र, आरोग्यसेवक, सेविकांची भरती रखडली असून, ती कधी होईल, हेही कोणी सांगू शकत नाही. यातील बहुतांश उमेदवार वयांची मर्यादा ओलांडत असल्यामुळे त्यांच्यात अस्वस्थता आहे.



भरतीप्रक्रिया आचारसंहितेपूर्वीची
आचारसंहितेमुळे आता भरतीची प्रक्रिया राबविता येणार नाही, असे बोलले जाते. परंतु, ऑगस्ट २०२३ मध्येच या मेगाभरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली होती. त्यानुसार टप्प्या-टप्प्याने अनेक पदांच्या परीक्षा झाल्या. काहींचे निकाल जाहीर झाले. त्यामुळे सध्या आरोग्यसेवक व सेविकांच्या भरतीसाठी परीक्षा घ्यावी. यशस्वी उमेदवारांच्या कागदपत्रांची तपासणी करावी व आचारसंहिता संपल्यानंतर नियुक्ती आदेश द्यावेत, असे उमेदवारांचे म्हणणे आहे.

४०० रुपये रोज; पण चारच दिवस
प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रांवर लसीकरण सत्रासाठी ४०० रुपये रोज यानुसार रोजंदारीवर परिचारिका (आरोग्यसेविका) नियुक्त कराव्यात, पण एका रोजंदारी परिचारिकेला महिन्यात फक्त चारच लसीकरणसत्राचे काम देण्याच्या सूचना आहेत. त्यामुळे एकही परिचारिका रोजंदारीवर काम करण्यास तयार नाही.







: Arogya Vibhag (Public Health Department Aurangabad ) published a new advertisement today. Aurangabad health department published a new advertisement today for 470 vacancies of Medical Officer, Staff Nurse, Data Entry Operator, Constable, Health Supervisor, Drug Maker, Laboratory Technician, Leprosy Technician. Online application form starts from 29 September 2023 @ 15.00 through official portal . Last date to apply for this recruitment process is 18th September 2023. Further details are as follows:-​

Aarogya Vibhga Aurangabad Recruitment 2024

आरोग्य विभागातील 470 पदांच्या भरतीची जाहिरात आज प्रकाशित झाली आहे. या भरती अंतर्गत गट क संवर्गात परिचारिका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, आरोग्यसेवक, आस्थापनेवरील पदे यामध्ये लिपिक, टंकलेखक, वाहनचालक यासारख्या पदांचा समावेश आहे. तर ‘गट ड’ संवर्गात शिपाई, सफाई कामगार, कक्षसेवक यासारख्या पदांचा समावेश आहे. ऑनलाईन अर्ज प्रक्रिया २९ ऑगस्ट २०२३ रोजी दुपारी ३.०० पासून सुरु होत आहे, तसेच अर्ज करण्याची शेवटची तारीख १८ सप्टेंबर २०२३ आहे.
Ne.gif

Arogya Vibhag Aurangabad Vacancy 2024

  • पदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, डाटा एन्ट्री ऑपरेटर, शिपाई, आरोग्य पर्यवेक्षक, औषध निर्माता, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, कुष्ठरोग तंत्रज्ञ, इत्यादी
  • पदसंख्या – 470 पदे
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण
  • वयोमर्यादा – पदानुसार – PDF जाहिरात पहावी
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज सुरु होण्याची तारीख – २९ ऑगस्ट २०२३ दुपारी ३.०० पासून
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख१८ सप्टेंबर २०२३

Arogya Vibhag Aurangabad Bharti 2024





अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.


Important Links Aurangabad Aarogya Vibhag Bharti 2024

📑
PDF जाहिरात
📑
ऑनलाईन अर्ज लिंक
📑
सर्व जिल्ह्यांच्या जाहिराती
✅
अधिकृत वेबसाईट






Arogya Vibhag Aurangabad Recruitment 2024

Organizer NamePublic Health Department Aurangabad Division
Recruitment NameArogya Vibhag Aurangabad Recruitment 2023
Post NameMedical Officer, Staff Nurse, Data Entry Operator, Constable, Health Supervisor, Drug Maker, Laboratory Technician, Leprosy Technician & Othere. Posts
Total Number of Vacancies470 Posts
Job TypeGovernment Job
Job LocationAurangabad
Age LimitAs Per Post Refer PDF
Pay Scale / SalaryAs per Post Prefer PDF Notification
Application ModeOnline Application Forms
Last Date18th September 2023
Official Website





The post appeared first on .
 
Top
AdBlock Detected

We get it, advertisements are annoying!

Sure, ad-blocking software does a great job at blocking ads, but it also blocks useful features of our website. For the best site experience please disable your AdBlocker.

I've Disabled AdBlock