आता सरकार निकषात न बसणाऱ्या लाडक्या बहिणींचा पुनर्विचार करणार! -देवेंद्र फडणवीसांचे स्पष्टीकरण!

hanuman

Active member
Ladki Bahin yojana Verification Process

मुख्यमंत्री लाडकी वहीण योजना आगामी पाच वर्षे कायम राहील. मात्र, या योजनेतील सर्व पात्र लाभार्थी महिलांच्या अर्जाची छाननी केली जाईल. योजनेच्या निकषात न बसणाऱ्या महिला लाभ घेत असतील, त्याचा विचार केला जाईल. येत्या मार्च महिन्यात अर्थसंकल्पीय अधिवेशनात लाडकी बहीण योजनेसाठी २१०० रुपये देण्यासाठीच्या निधीची तरतूद केली जाईल. त्यानंतरच १ एप्रिल २०२५ पासून लाडक्या बहिणींना २१०० रुपये दिले जातील, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी सायंकाळी केली. मंत्रिमंडळाचा विस्तार नागपूर अधिवेशनापूर्वी म्हणजेच १६ डिसेंबरपूर्वी केला जाईल, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले. राज्याचे २१वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी संवाद साधला. या वेळी फडणवीस यांनी पत्रकारांशी सविस्तर संवाद साधला. फडणवीस म्हणाले, राज्यातील जनतेने खूप मोठे बहुमत आम्हाला दिले; पण आता बहुमताबरोबरच आमची जबाबदारी वाढली आहे. लोकांनी आम्हाला बहुमत दिले याचा अर्थ त्यांना आमच्याकडून भरपूर अपेक्षा आहेत. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत



Ladki Bahin yojana Verification Process




त्यामुळे महायुती सरकारने व निवडणुकीआधी दिलेल्या आश्वासनांची आणि सर्व कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी केली जाईल. लाडक्या बहिणींचाही आमच्या विजयात मोठा वाटा राहिला आहे. लाडक्या बहिणींना २१०० रुपये देण्याचे आश्वासन निवडणुकीत दिले आहे. त्याची अंमलबजावणी अर्थसंकल्पीय अधिवेशनात निधीची तरतूद केल्यानंतर केली जाईल, असे फडणवीस म्हणाले. निकषात न बसणाऱ्या महिलाही लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतल्याच्या तक्रारी आमच्यापर्यंत आल्या आहेत. योजनेच्या निकषात बसत नसताना जर कोणी लाभ घेतला असेल, तर त्याचा पुनर्विचार करण्यात येईल. निकषात बसणाऱ्या कोणालाही कमी करणार नाही, असे यासंदर्भातील प्रश्नाला उत्तर देताना फडणवीस म्हणाले. शपथविधी सोहळ्यात केवळ मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनीच शपथ घेतली. उर्वरित मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होईल, असे विचारले असता फडणवीस म्हणाले, आमच्या महायुतीतील तिन्ही पक्षांना किती आणि कोणती खाती द्यायची हे जवळपास सर्व निश्चित झाले आहे. काही विभागासंदर्भात चर्चा सुरू आहे. महायुती सरकारच्या काळात ज्या पक्षाकडे जी खाती होती, त्यातील काही अपवाद वगळता बहुतेक तीच खाती कायम राहतील. नागपूर अधिवेशनापूर्वी (नियोजित १६ डिसेंबर) मंत्रिमंडळ विस्तार केला जाईल. आमच्यात कोणत्याही खात्यावरून मतभेद नाहीत. तसेच एकनाथ शिंदे नाराज नाहीत, ते नाराज असल्याच्या बातम्या माध्यमांनी दिल्या; पण वस्तुस्थिती तशी नाही. मुख्यमंत्री झाल्यानंतर मी उपमुख्यमंत्रीपद घेऊ नये, अशी भूमिका मी जशी २०२२ मध्ये घेतली होती, तशीच काहीशी शिंदे यांचीही आता भूमिका होती. पण माझा सरकारमध्ये सामील झाल्यानंतर अनुभव त्यांना सांगितल्यानंतर त्यांनी सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला. आमची टीम तीच आहे फक्त जबाबदारी बदलली आहे.​



काय म्हणाले फडणवीस
आगामी पाच वर्षांत बदला घेण्याचे राजकारण करणार नाही ताराम चांगला बदल करण्यासाठी काम करणार. राज्यापुढे अनेक आव्हाने; पण सर्वांना विश्वासात घेऊन संवाद साधून मार्ग काढू आमच्या सरकारने आणि निवडणुकीत आम्ही जी आश्वासने दिली त्याची अंमलबजावणी केली जाईल. सोबतच आर्थिक शिस्तही पाळली जाईल. शेतकरी कर्जमाफी केली जाईल तसेच सौरऊर्जा, जलसंपदा प्रकल्प पूर्ण करणे आणि नदीजोड प्रकल्पाला माझे आगामी पाच वर्षे प्राधान्य राहील. सन २०२६ पर्यंत १६ हजार मेगावॉट सौरऊर्जा निर्मितीचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी सर्वकष प्रयत्न केले जातील.​

The post appeared first on .
 
Top
AdBlock Detected

We get it, advertisements are annoying!

Sure, ad-blocking software does a great job at blocking ads, but it also blocks useful features of our website. For the best site experience please disable your AdBlocker.

I've Disabled AdBlock