आता कागदी रेशनकार्ड होणार आता इतिहासजमा; मिळणार आता ई-शिधापत्रिका – E Shidha Patrika New Ration Card 2024

hanuman

Active member
E Shidha Patrika New Ration Card 2024

E Shidha Patrika New Ration Card 2024 – E Ration Card 2024 Updates – पूर्वीपासून सुरू असलेल्या कागदी शिधापत्रिका आता इतिहासजमा होणार आहेत. त्याऐवजी शासन आता ई-शिधापत्रिका देणार आहे. तसा शासन निर्णय झाल्याने आता यापुढे कागदी शिधापत्रिके ऐवजी ई-शिधापत्रिका मिळणार आहेत. त्यामुळे पूर्वीच्या शिधापत्रिका आता इतिहासजमा होण्याच्या अखेरच्या टप्प्यावर आल्या आहेत. समाजातील गरजूंना धान्य देण्यासाठी शासनाने शिधापत्रिका तयार केली होती. स्वस्त धान्य दुकानदारही बऱ्याचदा या कुटुंबासाठी आलेल्या धान्याची परस्पर काळ्या बाजारात विक्री करत. या गैरकृत्यांना प्रतिबंध करणे आणि गरीब कुटुंबांना धान्य मिळण्यासाठी शिधापत्रिकांना बारा अंकी क्रमांक देण्यास सुरुवात झाली.

E Shidha Patrika New Ration Card 2024




पुरवठा विभागाच्या देखरेखीखाली ही प्रक्रिया पार पाडली जात होती. ज्यांच्याकडे शिधापत्रिका आहेत. त्यांना ई-शिधापत्रिका करून घेण्याची सुविधा उपलब्ध राहणार आहे. मोबाइलवर अॅप डाऊनलोड करून या योजनेसाठी आवश्यक असणारी कागदपत्रे अपलोड करावी लागणार आहेत.

तहसील कार्यालयात पुरवठा निरीक्षक आणि तहसीलदार या कागदपत्रांची पडताळणी करून ई-शिधापत्रिका मंजूर करणार आहेत. जे नागरिक संगणक साक्षर नाहीत किंवा ज्यांना मोबाइल अॅपमध्ये कागदपत्रे अपलोड करता येणे शक्य नाही, तहसील कार्यालय किंवा सेतू केंद्रात जाऊन ई-शिधापत्रिकेसाठी कागदपत्रे अपलोड करता येणार आहेत. फाटके, गहाळ झालेले जुने कागदी शिधापत्रिका धारकांनी नवीन दुय्यम प्रत काढून घ्यावी तसेच ई-शिधापत्रिका ही काढून घ्यावी, याकरिता अॅपवर तसेच ऑफलाईन दोन्ही पर्याय खुले आहेत. त्यामुळे सेतू कार्यालयातून शिधापत्रिका काढावी.​

The post appeared first on .
 
Top
AdBlock Detected

We get it, advertisements are annoying!

Sure, ad-blocking software does a great job at blocking ads, but it also blocks useful features of our website. For the best site experience please disable your AdBlocker.

I've Disabled AdBlock