जा. क्र. १२०/२०२३ सहायक वन सांख्यिक, गट-ब, महसूल व वन विभाग – अंतिम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दिनांक १४ ऑगस्ट, २०२५ रोजी आयोजित “सहायक वन सांख्यिक, गट-ब, महसूल व वन विभाग” या पदासाठी संगणक प्रणालीवर आधारित चाळणी परीक्षा २०२३ या परीक्षेची प्रथम उत्तरतालिका उमेदवारांच्या माहितीसाठी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली होती. त्यासंदर्भात उमेदवारांनी अधिप्रमाणित (Authentic) स्पष्टीकरण देऊन ऑनलाईन पध्दतीने सादर केलेल्या हरकती, तसेच तज्ज्ञांचे अभिप्राय विचारात घेऊन, आयोगाने उत्तरतालिका सुधारित केली आहे. या उत्तरतालिकेतील उत्तरे अंतिम समजण्यात येतील. यासंदर्भात आलेली निवेदने विचारात घेतली जाणार नाहीत व त्याबाबत कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही, याची कृपया नोंद घ्यावी.
The post MPSC Group B सहायक वन सांख्यिक, गट-ब, महसूल व वन विभाग – अंतिम उत्तरतालिका प्रकाशित!- MPSC Group B Answer Key Download appeared first on MahaBharti.in.