शिक्षक प्रशिक्षणासाठी ‘गुरुसेतू’ पोर्टल करणार सुरू’| Gurusetu Portal For Teacher Training

hanuman

Active member
teachers.jpg

Gurusetu Portal For Teacher Training: शिक्षकांच्या सर्वांगीण प्रशिक्षणासाठी ‘गुरुसेतू’ नावाचे नवे पोर्टल सुरू करण्यात येणार आहे, अशी घोषणा राष्ट्रीय शैक्षणिक तंत्रज्ञान मंचाचे (NETF) अध्यक्ष प्रा. अनिल सहस्रबुद्धे यांनी केली. या माध्यमातून शिक्षकांना प्रत्येक विषयाचा ऐतिहासिक प्रवास आणि त्या क्षेत्रातील भारतीयांचे योगदान समजण्याची संधी मिळणार आहे. रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, वैद्यकीय विज्ञान, अभियांत्रिकी अशा विविध शाखांमध्ये भारतीयांनी केलेल्या कामाची माहिती शिक्षकांना मिळेल. शिक्षणातील समानता साध्य करण्यासाठी डिजिटल तंत्रज्ञान हे प्रभावी साधन असल्याचे त्यांनी नमूद केले.

अभियांत्रिकीचा अभ्यासक्रम तुलनेने संक्षिप्त आणि चार वर्षांचा असल्याने अनेक विद्यार्थी या शाखेकडे वळत आहेत. वैद्यकीय शिक्षणात मात्र पदवी घेतल्यानंतरही तज्ज्ञ होण्यासाठी दीर्घ शिक्षण आवश्यक असते, त्यामुळे विद्यार्थ्यांना स्थैर्य प्राप्त होण्यास उशीर लागतो. त्यामुळे सध्याच्या काळात अभियांत्रिकी क्षेत्रात प्रवेश घेणाऱ्यांची संख्या वाढली आहे. यंदाच्या प्रवेश प्रक्रियेला दीड महिना लागला असून, विलंबामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत असल्याचे प्रा. डॉ. गजानन एकबोटे यांनी सांगितले. त्यांनी राष्ट्रीय स्तरावर प्रवेशप्रक्रिया वेळेत पार पाडण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची गरज व्यक्त केली.

प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी (PES)’च्या मॉडर्न अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त ‘तंत्रज्ञान व डिजिटल समावेशनाद्वारे विकसित भारताकडे’ या विषयावर आयोजित व्याख्यानात प्रा. सहस्रबुद्धे बोलत होते. या कार्यक्रमास प्रा. डॉ. गजानन एकबोटे, प्राचार्य डॉ. कल्याणी जोशी, सचिव प्रा. श्यामकांत देशमुख, सहसचिव प्रा. डॉ. ज्योत्स्ना एकबोटे आणि प्राचार्य डॉ. निवेदिता एकबोटे उपस्थित होत्या.

प्रा. सहस्रबुद्धे यांनी पुढे सांगितले की, डिजिटल दरी कमी करण्यासाठी ‘अंत्योदय’ आवश्यक आहे. देशातील दुर्गम भागातील विद्यार्थ्यांनाही गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे, हा उद्देश आहे. अरुणाचल प्रदेशपासून ते गडचिरोलीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना समान शैक्षणिक संधी मिळावी, यासाठी ‘स्वयंम्’ हे पोर्टल कार्यरत आहे. डिजिटल शिक्षणाच्या माध्यमातून शिक्षणातील समानता, प्रवेश आणि प्रगती साध्य करणे हेच आगामी काळाचे उद्दिष्ट आहे, असे त्यांनी नमूद केले.

The post शिक्षक प्रशिक्षणासाठी ‘गुरुसेतू’ पोर्टल करणार सुरू’| Gurusetu Portal For Teacher Training appeared first on महाभरती...
 
Top
AdBlock Detected

We get it, advertisements are annoying!

Sure, ad-blocking software does a great job at blocking ads, but it also blocks useful features of our website. For the best site experience please disable your AdBlocker.

I've Disabled AdBlock