Ladki Bahin Payment Update Sep 2025 – मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील पात्र लाभार्थ्यांना सप्टेंबरचा हप्ता देण्यासाठी ४१०.३० कोटी रुपयांच्या निधीला वित्त विभागाने मंजुरी दिली आहे. त्यामुळे राज्यभरातील पात्र लाभार्थ्यांना सप्टेंबर महिन्याचा हप्ता मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. अनुसूचित जाती घटकांकरिता पात्र लाभार्थ्यांसाठी हा निधी असणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. राज्य सरकारच्या सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाने यासंदर्भातील शासन निर्णय बुधवारी जाहीर केला आहे. या शासन निर्णयानुसार मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी विभागांतर्गत ३ हजार ९६० कोटी इतका नितव्यय मंजूर करण्यात आला आहे.
त्यानंतर वित्त विभागाने सप्टेंबर महिन्यातील पात्र लाभार्थी महिलांना हप्ता देण्यासाठी निधी वितरणाची कार्यप्रणाली ठरवून दिली आहे. त्यानुसार पात्र लाभार्थ्यांना सप्टेंबर महिन्याचा हप्ता देण्यासाठी सहायक अनुदानामधील ४१०.३० कोटी निधी देण्यास महिला व बालविकास कल्याण विभागाला वित्त विभागाने मंजुरी दिली. त्यामुळे यावेळीदेखील शेवटच्या आठवड्यात महिलांच्या खात्यात १५०० रुपये जमा होण्याची शक्यता आहेत Ladki Bahin Aug Payment Date.
The post लाडक्या बहिणींना सप्टेंबरचा हप्ता कधी येणार? तारखेबद्दल माहिती आली समोर!- Ladki Bahin Payment Update Sep 2025 appeared first on महाभरती...