नागपूर विद्यापीठ हिवाळी परीक्षा २० नोव्हेंबरनंतर, वेळापत्रक – RTMNU Winter 2025 Exam Dates Time Table UG, PG

hanuman

Active member
RTMNU Exam Dates 2025


RTMNU Summer 2025 Exam Time Table BA, BCom, BSc, BCA, BBA – Nagpur University Winter 2025 Examination timetable details are given below. The latest Updates & details Exam schedule will be available soon on MahaBharti. We will keep adding latest Updates & news on this page. For more updates keep visiting us. The RTMNU 2025 Examination will be Online or Offline is yet to declare by University, but very soon the details will be available.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या हिवाळी परीक्षा २०२५ या वर्षी २० नोव्हेंबरनंतर सुरू होण्याची शक्यता विद्यापीठ सूत्रांनी व्यक्त केली आहे. विद्यापीठाच्या परीक्षा संचालनाची जबाबदारी यावर्षी नव्या कंपनीकडे सोपविण्यात आल्याने वेळापत्रकात थोडा विलंब होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. शैक्षणिक वर्ष २०२४ मधील सत्र २, ४, ६ आणि ८ चे विद्यार्थ्यांच्या परीक्षा १५ ऑक्टोबरपासून सुरू झाल्या असताना हिवाळी परीक्षा मात्र सुमारे एक महिना उशिरा होणार आहेत. या विलंबामागचे प्रमुख कारण म्हणजे, विद्यापीठाने परीक्षा संचालनाची जबाबदारी सांभाळणाऱ्या ‘प्रोमार्क’ या कंपनीचा करार रद्द करून नवी परीक्षा व्यवस्थापन कंपनी नेमली आहे. विद्यापीठाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, नव्या कंपनीसोबत तांत्रिक समन्वय, डेटा हस्तांतरण आणि लॉजिस्टिक नियोजनासाठी काही काळ आवश्यक होता. त्यामुळे परीक्षा एक आठवडा उशिरा सुरू होतील. यापूर्वीही कंपनी बदल झाल्यामुळे विद्यापीठाला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला होता. त्या वेळी निकाल तब्बल सहा महिने रखडले होते. म्हणून यंदा देखील परीक्षा व्यवस्थापनात गोंधळ निर्माण होण्याची भीती विद्यार्थी आणि प्राध्यापक व्यक्त करत आहेत. तथापि, परीक्षा विभागाने यंदा त्रुटी टाळण्यासाठी प्रगत तंत्रज्ञानाचा वापर आणि दुहेरी पडताळणी प्रणाली लागू केली असल्याचे सांगितले आहे.

विद्यापीठाकडून मिळालेल्या माहितीनुसार, नियमित अभ्यासक्रमांच्या परीक्षा २० नोव्हेंबरनंतर तर अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या परीक्षा नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात घेतल्या जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे. व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या परीक्षा जानेवारी २०२६ मध्ये विद्यापीठ क्षेत्रातील १३६ परीक्षा केंद्रांवर या परीक्षा घेण्यात येणार आहेत. सुरुवातीला परीक्षा १६ नोव्हेंबरपासून घेण्याचे नियोजन होते, मात्र नव्या कंपनीच्या समन्वयामुळे सुमारे एका आठवड्याचा विलंब झाला आहे.



परीक्षेची तयारी अंतिम टप्यात : परीक्षा विभागाकडून सध्या प्रश्नपत्रिका, उत्तरपत्रिका आणि गुणनियंत्रण प्रक्रियेबाबत तयारी सुरू आहे. दरवर्षी परीक्षा काळात उत्तरपत्रिका पाठविण्यात होणारा गोंधळ, चुकीच्या प्रश्नपत्रिका आणि उशिरा मिळणारे निकाल याबाबत विद्यार्थ्यांच्या तक्रारी वाढतात. विद्यापीठ प्रशासनाने बैठकांचे आयोजन केले आहे.

उत्तरपत्रिकांच्या गोंधळावर नियंत्रण
दरवर्षी नवीन अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांना जुने प्रश्नपत्र संच मिळण्याच्या घटना घडतात. हा गोंधळ टाळण्यासाठी विद्यापीठाने प्रश्नपत्रिका वितरण, गुण नोंदणी आणि उत्तरपत्रिका संकलनासाठी डिजिटल ट्रॅकिंग प्रणाली लागू केली आहे. महाविद्यालयांना स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत की प्रत्येक परीक्षेसाठी वेगवेगळ्या कोडनुसार प्रश्नपत्रिका वापराव्यात.



Nagpur University ODD/Even Sem Date Sheet 2025​

Name of OrganizerRashtrasant Tukadoji Maharaj Nagpur University
Name of ExamBA, B.Sc, B.Com, MA, M.Sc, M.Com Sem Exam 2025
UG Exam DateCheck From given link
RTMNU Summer Time Table releasing dateOct 2025
Article categoryRTMNU Summer University Time Table 2025
StatusComing Soon
Official Websitewww.nagpuruniversity.ac.in

RTMNU Courses List For Timetable Download PDF–​

  • BCA
  • B.Sc
  • B.Pharm
  • B.E
  • B.Arch
  • B.Com
  • BBA
  • BA
  • LLB
  • MCA
  • M.Sc
  • M.Pharm
  • M.Com
  • MBA
  • M.Phil
  • MA
  • LLM

The post नागपूर विद्यापीठ हिवाळी परीक्षा २० नोव्हेंबरनंतर, वेळापत्रक – RTMNU Winter 2025 Exam Dates Time Table UG, PG appeared first on MahaBharti.in.
 
Top
AdBlock Detected

We get it, advertisements are annoying!

Sure, ad-blocking software does a great job at blocking ads, but it also blocks useful features of our website. For the best site experience please disable your AdBlocker.

I've Disabled AdBlock